
10 दिवसांचा बॅटरी बॅकअप, 120 हून अधिक स्पोर्ट्स मोड्स अन् बरंच काही... Honor ची नवी स्मार्टवॉच बाजारात दाखल! काय आहे खास?
ऑनर वॉच 6 प्रो स्मार्टवॉचच्या ब्लॅक फ्लोरोइलास्टोमर स्ट्रॅप ऑप्शनची किंमत EUR 379 म्हणजेच सुमारे 38,000 रुपये आणि सिल्वर स्टिल स्ट्रॅप ऑप्शनची किंमत EUR 429 म्हणजेच सुमारे 43,000 रुपये ठेवण्यात आली आहे. चीनमध्ये स्टेनलेस स्टील वर्जनची किंमत CNY 1,600 म्हणजेच सुमारे 22,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हे डिव्हाईस फ्रांस, जर्मनी, इटली आणि स्पेनमध्ये प्री-सेलसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य: Honor)
31 डिसेंबर 2026 पर्यंत, दोन्ही व्हेरिअंट्स अनुक्रमे EUR 279 आणि EUR 329 या सवलतीच्या प्रोमो किमतींत उपलब्ध असतील. जरी ऑनर जागतिक स्तरावर अधिकृतपणे केवळ स्टील आणि सिलिकॉन स्ट्रॅपचे पर्याय विकत असले, तरी विक्रीच्या कालावधीत कंपनी एक 22 मिमी लेदर स्ट्रॅप मोफत देणार आहे. दोन्ही ऑप्शन्समध्ये 32MB रॅम आणि 4GB स्टोरेज मिळणार आहे.
स्ट्रॅप व्हेरिअंट्सव्यतिरिक्त, हे वॉच ब्लॅक आणि सिल्व्हर स्टिल ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. दोन्ही केस मेटलचे आहेत, ज्यांचा कर्ण आकार 46.3 मिमी आहे. याची जाडी 11.6 मिमी आहे. स्ट्रॅपशिवाय केसचे वजन 50.9 ग्रॅम आहे आणि यामध्ये एक फंक्शनल ऑक्टागोनल क्राउन व एक साइड बटन देण्यात आले आहे. मजबूतीसाठी या केसला 5ATM, IP68, IP69 आणि IP69K रेटिंग मिळणार आहे.
ब्रँडनुसार, फ्रंटला 1.5-इंच टँडेम ओएलईडी डिस्प्ले आहे, जो 5,500 निट्सच्या पीक ब्राइटनेसपर्यंत पोहोचू शकते. या स्मार्टवॉचमध्ये कोणता चिपसेट देण्यात आला आहे, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिली नाही. यामध्ये ऑनर पोलारिस पोजिशनिंग सिस्टिम मिळणार आहे, जो आउटडोर लवर्सना स्थिर सिग्नल देण्यासाठी डुअल-फ्रीक्वेंसी, थ्री-एंटीना डिझाईनचा वापर करतो. कंपनीने असा दावा केला आहे की, सतत पोजिशनिंग ट्रॅकिंग चालू ठेवल्यास घड्याळ 21 तासांपर्यंत चालू शकते. हे 120 हून अधिक स्पोर्ट्स ट्रॅक करू शकते आणि यामध्ये प्रोफेशनल रनिंग कोच, आउटडोर ट्रेल रनिंग, प्रोफेशनल फुटबॉल आणि बॅडमिंटन मोड्स समाविष्ट आहेत.
ना फोन, ना ईअरबड्स! Nothing चा नवा प्रयोग… स्क्रीनशिवाय येणार रहस्यमयी AI डिव्हाईस; लाँच तारीख जाहीर
या स्मार्टवॉचमध्ये 500mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, हे डिव्हाईस अल्ट्रा-लॉन्ग बॅटरी मोडमध्ये 18 दिवस, सामान्य वापरात 10 दिवस आणि ऑलवेज-ऑन डिस्प्ले (AOD) फीचर चालू ठेवल्यास 7 दिवसांपर्यंत चालू शकते. यामध्ये एक नवीन ऑप्टिकल हार्ट रेट सेंसर देखील जोडण्यात आले आहे. ऑनर वॉच 6 प्रो अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींना सपोर्ट करते. हे एकाच वेळी आयफोन आणि अँड्रॉईड डिव्हाइसशी कनेक्ट राहू शकते आणि दोन्ही उपकरणांवरील नोटिफिकेशन्स, मेसेज व येणारे कॉल दर्शवू शकते.
Ans: Honor Watch 6 Pro च्या ब्लॅक फ्लोरोइलास्टोमर स्ट्रॅप व्हेरिअंटची किंमत EUR 379 (सुमारे 38,000 रुपये), तर सिल्व्हर स्टील स्ट्रॅप व्हेरिअंटची किंमत EUR 429 (सुमारे 43,000 रुपये) आहे.
Ans: या स्मार्टवॉचमध्ये 1.5 इंचाचा Tandem OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याची पीक ब्राइटनेस 5,500 निट्सपर्यंत आहे.
Ans: यामध्ये 500mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, अल्ट्रा-लाँग बॅटरी मोडमध्ये 18 दिवस, सामान्य वापरात 10 दिवस आणि AOD सुरू ठेवल्यास 7 दिवस बॅटरी टिकते.