Siri झाली आणखी स्मार्ट! iPhone युजर्ससाठी Apple चं नवीन अपडेट रिलीज; मिळणार हे खास फीचर्स
ॲपलने नव्या iOS 27.2 अपडेटमध्ये सिरीसाठी काही अपग्रेड जारी केले आहेत. आता Siri पूर्वीच्या चॅट्समधील डिटेल्स लक्षात ठेऊ शकणार आहे. त्यामुळे यूजर्स आधी विचारण्यात आलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं पुन्हा वाचू शकतात. तसेच, सिरी आता मेसेजमध्ये अटॅच करण्यात आलेल्या फोटो, कॅलेंडर ईव्हेंटमधील लोगो आणि वॉइसमेलमधून देखील डिटेल्स गोळा करू शकणार आहे. इतकंच नाही तर, सफारीच्या हिस्ट्री आणि रीडिंग लिस्टचे रिझल्ट्स देखील सुधारण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य: Pinterest)
एआय फीचर्सवर यूजर्सना अधिक चांगला कंट्रोल मिळावा यासाठी एक्स्क्लुडेड ॲप्स (वगळलेली ॲप्स) सेटिंग देखील जोडण्यात आली आहे. याच्या मदतीने यूजर्स ठरवू शकणार आहेत की, एआय कोणत्या ॲप्सचा वापर करू शकतो. तसेच, ‘ग्रॅन्युलर टेक्स्ट सिलेक्शन’ फीचरद्वारे यूजर्स सिरीच्या उत्तरातील एखादा विशिष्ट भाग निवडू शकतात आणि कॉपी देखील करू शकतात.
ॲपलने जारी केलेल्या या अपडेटमध्ये ॲपल म्युझिक आयकॉन आणि यूजर इंटरफेसमध्ये सर्वात मोठा बदल पाहायला मिळत आहे. मेसेज ॲपमध्ये जलद रिप्लाय करण्यासाठी पर्याय सूचना मिळतील. फोटोजच्या शेअर्ड अल्बम फीचरमध्ये देखील अपग्रेड करण्यात आले आहे. पॉडकास्ट ॲपमध्ये नवीन एपिसोड्स आणि कंटिन्यू प्लेईंगसाठी एक वेगळे सेक्शन जोडण्यात आले आहे.
गेम्स ॲप अलीकडे खेळलेल्या गेम्स आणि मित्रांशी संबंधित सूचना देईल. याशिवाय, ग्रुप कॉलमध्ये फेस टाईम ड्युअल कॅप्चर फीचर जोडण्यात आले आहे. ॲपल टिव्ही आणि फेस टाईममध्ये देखील काही बदल करण्यात आले आहेत. एआयने तयार केलेल्या कंटेटसाठी SynthID वॉटरमार्किंगचा सपोर्ट देखील जोडण्यात आला आहे.
Ans: या अपडेटमध्ये Siri AI मध्ये सुधारणा, Apple Music च्या डिझाइनमध्ये बदल आणि Messages, Photos, Podcasts, Games व FaceTime यांसारख्या ॲप्समध्ये नवीन फीचर्स समाविष्ट करण्यात आल्याचे दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
Ans: Siri जुन्या चॅट्समधील माहिती लक्षात ठेवू शकणार आहे. तसेच, मेसेजमधील फोटो, कॅलेंडर इव्हेंट्स आणि व्हॉइसमेलमधून माहिती मिळवण्याची क्षमता सुधारण्यात आली आहे.
Ans: या सेटिंगच्या मदतीने यूजर्सना AI फीचर्ससाठी कोणत्या ॲप्सचा वापर करता येईल, हे नियंत्रित करता येणार आहे.






