संग्रहित फोटो
रविवारी याबाबतची माहिती तेलंगणा पोलिसांनी पुणे पोलिसांना कळवली. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन शिंदे हे पुणे पोलीस दलातील कर्मचारी असून त्यांची नेमणूक वाहतूक शाखेमार्फत विश्रामबाग वाहतूक विभागात होती. दरम्यान ते 8 ऑक्टोबर पासून वैद्यकीय रजेवर गेले होते. त्यानंतर रविवारी तेलंगणा पोलिसांकडून पुणे पोलिसांना नितीन शिंदे यांना रेल्वेतून 12 किलो गांजाची तस्करी करताना पकडण्यात आल्याची माहिती कळवण्यात आली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. नितीन शिंदे हे नेमके गांजा घेऊन कुठे येत होते किंवा त्यांच्यासोबत अन्य कोणी आहे का आणि इतर माहिती समजू शकलेली नाही मात्र पुढे पोलीस दलातील कर्मचारीच गांजाची तस्करी करत असल्याचे उघडकीस आल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.
एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदारालाच अटक!
मिरा-भाईंदर शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात कारवाई सुरू असतानाच, पोलीस दलातील एका हवालदारालाच एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस हवालदार प्रकाश पवार आणि त्यांचा कथित साथीदार अखिलेश कुमार यांच्याकडून एमडी ड्रग्स, रोख रक्कम, दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण १ लाख ३२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. पोलीस आयुक्त अनिकेत कौशिक यांनी मिरा-भाईंदर अंमली पदार्थमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला असताना, पोलिसांच्याच कर्मचाऱ्यावर अंमली पदार्थ विक्रीचा आरोप झाल्याने या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मिरा-भाईंदर शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीचा प्रश्न गंभीर बनलेला असताना, त्याविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यावरच एमडी ड्रग्स विक्रीचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.
Ans: नितीन ज्ञानू शिंदे (वय ३३, रा. पुणे) असे पकडण्यात आलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे.
Ans: नितीन शिंदे यांना रेल्वेने १२ किलो गांजाची तस्करी करताना तेलंगणा राज्यात पकडण्यात आले.
Ans: नितीन शिंदे यांच्याविरुद्ध तेलंगणा राज्यातील नेकुंडा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.






