Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tinder ने ‘या’ राशीच्या लोकांना दिली Good News! सुरु केला Astrology Mode, डेटिंग होणार सोपी?

Tinder ने भारतातील तरुणांसाठी नवीन ‘अॅस्ट्रोलॉजी मोड’ लाँच करत डेटिंगला अधिक वैयक्तिक आणि अर्थपूर्ण स्वरूप दिले आहे. सिंह, वृश्चिक आणि तूळ या राशी सर्वाधिक लोकप्रिय असल्याचेही समोर आले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 15, 2026 | 03:19 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

Tinder ने भारतातील तरुणांसाठी नवीन ‘अॅस्ट्रोलॉजी मोड’ सादर करत डेटिंगच्या बदलत्या ट्रेंडला नवा आयाम दिला आहे. आजची तरुण पिढी फक्त कॅज्युअल डेटिंगपेक्षा भावनिक स्पष्टता, प्रामाणिकपणा आणि सुसंगततेला अधिक महत्त्व देत असल्याचे Tinder च्या ‘इअर इन स्वाइप २०२५’ अहवालातून समोर आले आहे. अहवालानुसार, ६४ टक्के तरुण डेटिंगमध्ये भावनिक प्रामाणिकपणाला महत्त्व देतात, तर ७३ टक्के तरुणांना समोरच्या व्यक्तीसमोर स्वतःसारखे नैसर्गिक राहता आले तरच नातं अर्थपूर्ण वाटतं.

WhatsApp Update: यूजर्सची प्रायव्हसी होणार आणखी मजबूत! कंपनी घेऊन आली नवं फीचर, AI चॅट्स आता पूर्णपणे सुरक्षित

याच बदलत्या मानसिकतेमुळे ज्योतिषशास्त्र तरुणांच्या डेटिंग संस्कृतीचा महत्त्वाचा भाग बनत आहे. राशी, नक्षत्र आणि व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांच्या माध्यमातून तरुण स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करत आहेत आणि संभाव्य जोडीदारासोबतची सुसंगतता तपासत आहेत. Chandni Tugnait यांच्या मते, आजची पिढी नातेसंबंधांबाबत अधिक स्व-जागरूक झाली असून विचार आणि स्वभाव जुळत नसलेल्या नात्यांमध्ये वेळ घालवण्याची तयारी कमी झाली आहे.

Tinder चा ‘अॅस्ट्रोलॉजी मोड’ वापरकर्त्यांना त्यांची जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मस्थानाच्या आधारे ‘बिग ३’ म्हणजे सूर्य रास, चंद्र रास आणि लग्न रास जाणून घेण्याची सुविधा देतो. यामुळे व्यक्तिमत्त्व, भावनिक प्रवृत्ती आणि सामाजिक प्रतिमा याबद्दल अधिक माहिती मिळते. तसेच ‘व्ह्यू कॉम्पॅटिबिलिटी’ फीचरच्या मदतीने संभाव्य मॅचसोबत भावनिक ताळमेळ, संवादशैली आणि आकर्षण यांचे विश्लेषणही करता येते. भारतातील Tinder वर सिंह, वृश्चिक आणि तूळ या राशी सर्वाधिक लोकप्रिय असल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. कंपनीच्या मते, ज्योतिषशास्त्र आता फक्त भविष्य सांगण्यापुरते मर्यादित न राहता स्वतःला समजून घेण्याचे आणि समोरच्या व्यक्तीशी अर्थपूर्ण नातं निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम बनले आहे.

Jio vs Airtel: किंमत एकच पण फायदे वेगळे… व्हॅलिडीटी अन् डेटासह कोण ठरणार खरा किंग? जाणून घ्या

डॉ. Chandni Tugnait यांनी तरुणांना सल्ला देताना सांगितले की, राशी आणि सुसंगतता ही फक्त संवादाची सुरुवात असू शकते, अंतिम निर्णय नाही. एखादं नातं टिकण्यासाठी परस्पर संवाद, समजूतदारपणा, सातत्य आणि वर्तन यांनाच अधिक महत्त्व असते. डेटिंग अधिक हेतूपूर्ण आणि बहुआयामी होत असताना, Tinder चा हा नवीन अॅस्ट्रोलॉजी मोड तरुणांना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाशी प्रामाणिक राहून अधिक नैसर्गिक आणि अर्थपूर्ण नातेसंबंध निर्माण करण्यासाठी मदत करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Web Title: Astrology mode started in tinder good news for indians

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 03:19 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.