Jio vs Airtel: किंमत एकच पण फायदे वेगळे... व्हॅलिडीटी अन् डेटासह कोण ठरणार खरा किंग? जाणून घ्या
देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओच्या पोर्टफोलिओमध्ये 349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. तसेच हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना डेली 2GB फास्ट इंटरनेटची सुविधा मिळते. म्हणजेच या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 56GB डेटा मिळतो. तसेच यूजर्सना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस देखील मिळतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
349 रुपयांच्या जिओ प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंगव्यतिरिक्त इतर फायदे देखील मिळतात. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना तीन महिन्यांसाठी मोफत जिओहॉटस्टारचे मोबाईल सब्सक्रिप्शन आणि 50GB जिओएआय क्लाउड स्टोरेज मिळते. तसेच या रिचार्ज प्लॅनमध्ये कंपनी 35,100 रुपयांच्या किंमतीचा 18 महीन्यांचा गूगल जेमिनी प्रो प्लॅन देखील ऑफर करते. यामध्ये 5000GB क्लाउड स्टोरेज आणि नॅनो बनाना यासांरख्या AI फीचर्सचा समावेश आहे. यासोबतच या प्लॅनमध्ये जिओटिव्ही आणि जिओक्लाऊडचा अॅक्सेस देखील मिळतो.
टेलिकॉम कंपनी एअरटेल देखील त्यांच्या यूजर्सना 349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन ऑफर करते. या प्लॅनची व्हॅलिडीटी देखील 28 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग ऑफर केली जाते. यासोबतच यामध्ये रोज 1.5GB डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनमध्ये यूजर्सना 100 एसएमएस देखील मिळणार आहेत. मात्र, कंपनी यूजर्सना 50 रुपये जास्त खर्च करून 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅन खरेदी करण्याचा सल्ला देते. एयरटेलच्या 399 रुपयांच्या प्लॅनमध्ये फिक्स्ड डेली लिमिटऐवजी अनलिमिटेड डेटा एक्सेस ऑफर केला जातो. 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सना एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम आणि 6 महिन्यांपर्यंतचे ॲपल म्युझिक ऑफर केले जाते.
कोणता प्लॅन तुमच्यासाठी योग्य ठरणार हे पूर्णपणे तुमच्या गरजांवर अवलंबून असते. जर तुम्हाला चांगली सर्विस, क्लाऊड स्टोरेज किंवा गुगल जेमिनी प्रोचा अॅक्सेस पाहिजे असेल तर तुम्ही जिओ रिचार्ज प्लॅनची निवड करू शकता. कारण यामध्ये अधिक चांगले डिजिटल फीचर्स आणि सर्विस ऑफर केली जाते. तर, तुम्हाला जास्त इंटरनेट डेटा आणि एंटरटेनमेंट पाहिजे असेल तर तुम्ही एअरटेल रिचार्ज प्लॅनची निवड करू शकता.






