
दिर्घकाळ चालणारी बॅटरी आणि दमदार परफॉर्मंस... हे आहेत बेस्ट Gaming Smartphones, किंमत 20 हजार रुपयांहून कमी
ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये एमोलेड डिस्प्ले आणि बॅलेंस्ड परफॉर्मंस देण्यात आला आहे. Oppo K13 5G अशा यूजर्ससाठी एक चांगला ऑप्शन आहे, ज्यांना गेमिंगसह डिस्प्ले क्वालिटी देखील पाहिजे आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच एमोलेड स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेट आणि हाय ब्राइटनेसला सपोर्ट करते. यामध्ये स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 प्रोसेसर डेली गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी अधिक चांगला परफॉर्मंस देण्यात आला आहे. ऑफर्स आणि डिस्काऊंटसह या स्मार्टफोनची किंमत 19,920 रुपये होते. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर दिर्घकाळ चालणाऱ्या गेमिंग सेशनला तुम्ही प्राधान्य देत असाल तर यासाठी तुम्हाला मोठी बॅटरी असलेल्या स्मार्टफोनची गरज असते. अशावेळी तुम्ही iQOO Z10X ची निवड करू शकता. यामध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 7300 चिपसेट देण्यात आला आहे, जो या सेगमेंटमध्ये स्टेबल परफॉर्मंससाठी ओळखला जातो. या डिव्हाईसमध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6500mAh बॅटरी दिली आहे. या डिव्हाईसची किंमत 14,888 रुपये आहे.
हा स्मार्टफोन 144Hz डिस्प्लेसह स्मूद गेमिंग परफॉर्मंस ऑफर करतो. Realme P4 अशा यूजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे, ज्यांना हाई रिफ्रेश रेट डिस्प्ले पाहिजे आहे. यामध्ये 6.77-इंच एमोलेड पॅनल आहे, जो 144Hz रिफ्रेश रेट आणि जास्त ब्राइटनेस ऑफर करतो. स्मार्टफोन मीडियाटेक डेमेन्सिटी 7400 प्रोसेसर गेमिंगदरम्यान एक चांगली फ्रेम रेट बनवण्यासाठी मदत करतो. या स्मार्टफोनची किंमत 18,499 रुपये आहे.
Vivo T4x अशा यूजर्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे, ज्यांना सिंपल मात्र पावरफुल गेमिंग फोन पाहिजे आहे. या डिव्हाईसमध्ये डेमेन्सिटी 7300 प्रोसेसर, 120Hz डिस्प्ले आणि 6500mAh बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 18,499 रुपये आहे.
गेमर्सचा विचार करून हा स्मार्टफोन डिझाईन करण्यात आला आहे. यामध्ये 6.78-इंच एमोलेड डिस्प्ले आणि 144Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. डिव्हाईसची किंमत 19,499 रुपये असून हा फोन गेमिंग लुक आणि फीचर्स दोन्हीमध्ये बेस्ट आहे.