Apple Update Alert: एक अपडेट… आणि लाखो युजर्स अडचणीत! iPhone मध्ये क्रॅश झाले अॅप्स, नक्की काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर
यूजर्सने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत संगितलं आहे की, आयफोन 16 प्रोसह अनेक आयफोन मॉडेल्समध्ये काही अॅप्सचा वापर करण्यात अडचण येत आहे. व्हॉट्सअॅप कॉलदरम्यान इंस्टाग्रामचा वापर केल्यास कॉल आपोआप डिसकनेक्ट होत आहे. यासोबतच अपडेट जारी केल्यानंतर काही अॅप्स वारंवार क्रॅश होत आहेत. तथापी, दुसऱ्या बाजूला टेक दिग्गजने आतापर्यंत या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हे प्रकरण नक्की काय आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
अॅपल कम्युनिटी फोरमवर यूजरने पोस्ट केलेल्या माहितीनुसार, iOS 26.2.1 अपडेट इंस्टॉल केल्यानंतर यूजर्सना सतत अॅप क्रॅश, सिस्टम फ्रीज आणि कनेक्टिव्हिटी अयशस्वी झाल्याचा अनुभव पाहायला मिळत आहे. आयफोनमध्ये अपडेटनंतर येणाऱ्या समस्यांबाबत सांगताना एका यूजरने म्हटलं आहे की, iOS 26.2.1 ला सुमारे 30GB फ्री स्टोरेजची गरज असते आणि वारंवार अॅप्स आणि फाइल्स डिलीट केल्यानंतरही ही समस्या कायम राहते. त्यामुळे कंपनीने या समस्येवर लवकरात लवकर उपाय शोधावा, अशी विनंती यूजर्सनी केली आहे.
यूजर्सचे सुमारे सर्वच अॅप्स क्रॅश होत आहे, फ्रीज होत आहेत आणि काहीवेळेस पूर्णपणे बंद होत आहेत. पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, आयफोन रीबूट करणे हा एकमेव उपाय आहे, परंतु 10 मिनिटांत तीच समस्या परत येते. त्यामुळे यूजर्स प्रचंड वैतागले आहेत. दुसऱ्या एका यूजरने कम्युनिटी फोरमवर लिहिले आहे की, iOS 26.2.1 कार्यक्षमता आणि वापरण्यायोग्यता लक्षणीयरीत्या कमी करते. त्यांनी अॅपलला ही समस्या सोडवण्याची विनंती देखील केली. कंपनी आता या समस्येवर प्रतिक्रिया देणार का, या समस्येवरील उपाय कधी येणार, याची प्रतिक्षा आता यूजर्सना लागली आहे.






