UPI फ्रॉडपासून बचाव करण्यासाठी BharatPe ने लाँच केले नवीन फीचर, अशा प्रकारे करणार युजर्सची सुरक्षा
सध्या ऑनलाईन पेमेंटचा काळ आहे. पैसे संभाळणं आणि सुट्ट्या पैशांची कटकट या सगळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी ऑनलाईन पेमेंट एक चांगला पर्याय आहे. यामध्ये युजर्सना कूपण आणि रिवॉर्डस देखील मिळतात. पण या सगळ्यासोबतच धोका असतो फ्रॉड आणि स्कॅमचा.
कूपण आणि रिवॉर्ड्समुळे युजर्सचा फायदा तर होतोच पण फ्रॉड आणि स्कॅममुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. या सगळ्या फ्रॉड आणि स्कॅमपासून वाचण्यासाठी BharatPe ने एक नवीन फीचर लाँच केलं आहे. BharatPe Shield Feature असं या फीचरचं नाव आहे.
BharatPe ने अलीकडे शील्ड नावाचे नवीन फीचर लाँच केलं आहे. हे नवीन फीचर वापरकर्त्यांना UPI फ्रॉडपासून वाचवण्यासाठी आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्यासाठी सुरू करण्यात आलं आहे. ही सेवा वापरकर्त्यांना फसवणूक, फिशिंग हल्ले आणि अनधिकृत व्यवहारांपासून संरक्षण प्रदान करते. ज्यामुळे युजर्सचं नुकसान होत नाही. एवढेच नाही तर ही सेवा वापरकर्त्यांना कव्हरेज देखील देते. याचा अर्थ असा की जर तुमची ऑनलाइन फसवणूक झाली असेल तर कव्हरेज देखील प्रदान केले जाईल. याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया.
आम्ही तुम्हाला सांगतो की BharatPe च्या BharatPe Shield Feature अंतर्गत युजर्सना 30 दिवसांचा चाचणी कालावधी मिळतो. या कालावधीत वापरकर्ते BharatPe Shield Feature सेवा विनामूल्य वापरू शकतात. मात्र यानंतर युजर्सना या फीचरचा वापर करायचा असेल तर त्यांना ठरावीक शुल्क भरावे लागणार आहे.
Realme 14 Pro Series 5G: लवकरच लाँच होणार Realme ची नवीन सिरीज, पाणी आणि धुळीपासून राहणार सेफ
चाचणी कालावधी संपल्यानंतर, वापरकर्त्यांना BharatPe Shield Feature चा वापर करायचा असेल तर त्यांना दरमहा 19 रुपये शुल्क भरावे लागणार. तुम्ही BharatPe Shield Feature चा वापर करत असाल आणि तरी देखील तुमची फसवणूक झाली तर हा प्लॅन तुम्हाला 5 हजार रुपयांपर्यंत कव्हरेज दिलं जाणार आहे. त्यामुळे हा प्लॅन युजर्ससाठी फायद्याचा ठरणार आहे.
जर एखाद्या वापरकर्त्याची फसवणूक झाली असेल, तर तो कव्हरेजसाठी दावा करू शकतो. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी BharatPe ने OneAssist सोबत भागीदारी केली आहे. दावा दाखल करण्यासाठी, वापरकर्ते OneAssist ॲप डाउनलोड करू शकतात किंवा टोल-फ्री नंबर 1800-123-3330 वर कॉल करू शकतात. नुकसान झाल्यानंतर तुम्हाला कव्हरेजचा दावा करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 10 दिवसांच्या आत तक्रार करावी लागणार आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वापरकर्त्यांना काही कागदपत्रेही सादर करावी लागतील. वापरकर्त्यांना UPI स्टेटमेंट, पोलीस रिपोर्ट किंवा FIR, दावा फॉर्म, UPI खाते ब्लॉक केल्याचा पुरावा सादर करावा लागेल. त्यानंतर कव्हरेजची प्रक्रिया तात्काळ सुरु करावी लागणार आहे.