Flipkart Big Billion Days Sale 2025: iPhone 16 Pro आणि 16 Pro Max खरेदी करण्याची हीच आहे संधी! मिस करू नका ही डिल
अनेकांचा स्वप्न असतं की एखादा तरी आयफोन खरेदी करावा. मात्र इतर स्मार्टफोनसोबत तुलना करता आयफोनच्या किंमती खूप जास्त आहेत. त्यामुळे हा स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी लोकं अनेकदा विचार करतात. तुमची देखील इच्छा आहे का, एखादा आयफोन खरेदी करावा? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर लवकरच फेस्टिव्ह सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना इतर स्मार्टफोनसोबतच आयफोन देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
फ्लिपकार्ट बिग बिलीयन डे 2025 सेलमध्ये ग्राहकांना Apple iPhones कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. कारण सेलमध्ये आयफोनच्या खरेदीवर मोठं डिस्काऊंट उपलब्ध असणार आहे. Flipkart Big Billion Days Sale 2025 मध्ये iPhone 16 Pro आणि 16 Pro Max वर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना iPhone 16 Pro आणि 16 Pro Max हे दोन्ही प्रिमियम आयफोन त्यांच्या बजेटमध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या दोन्ही डिव्हाईसवर आता मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. त्यामुळे Flipkart च्या Big Billion Days Sale मध्ये iPhone 16 Pro हा प्रिमियम आयफोन 70000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. तर 16 Pro Max हा प्रिमियम आयफोन 90000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्ट या दोन्ही फोनवर जबरदस्त डिल्स ऑफर करत आहे. चला तर मग फ्लिपकार्टच्या या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.
प्लिपकार्टची सर्वात मोठी सेल बिग बिलीयन डेज सेल 23 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या सेलमध्ये iPhone 16 Pro आणि 16 Pro Max वर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. कंपनीने सेलमधील या डिलची माहिती आधीच दिली आहे. अॅपलने 2024 मध्ये हे कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप आयफोन मॉडेल लाँच केले होते.
iPhone Air: कोण आहे अबिदुर चौधरी? ज्याने तयार केला सर्वात पातळ iPhone, फार रंजक आहे कहाणी
कंपनीने प्रो मॉडेल 1 लाख रुपयांहून अधिक किंमतीत लाँच केले होते. मात्र प्लिपकार्ट बिग बिलीयन डेज सेलमध्ये आता प्रो डिव्हाईस 69,999 रुपयांत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे, ज्यामध्ये 5,000 रुपयांच्या बँक कार्ड ऑफरचा देखील समावेश असणार आहे. त्यामुळे आता, तुम्हाला एक वर्ष जुना आयफोन प्रो मॉडेल त्याच्या नियमित किमतीपेक्षा 30,000 रुपये कमी किमतीत मिळेल. अंतिम किमतीत कोणत्याही एक्सचेंज सवलतींचा समावेश आहे की नाही हे प्लॅटफॉर्मने नमूद केलेले नाही.
अशीच एक ऑफर iPhone 16 Pro Max वर देखील उपलब्ध असणार आहे, जिथून तुम्ही हे प्रिमियम डिव्हाइस फक्त 90,000 रुपयांना खरेदी करू शकाल आणि या डीलमध्ये बँक कार्ड ऑफर देखील असेल. याचा अर्थ तुम्हाला टायटॅनियम फिनिशसह आयफोन प्रो मॅक्स 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.