काय सांगता! भारताच्या या शेजारी देशात नाही मिळणार Apple चा सर्वात पातळ iPhone Air, कारण वाचून तुम्हीही व्हाल हैराण
9 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये Apple ने iPhone 17 सिरीज लाँच केली होती. या सिरीजमधील पातळ आयफोनची सर्वात जास्त चर्चा आहे. जगभरात आयफोन 17 सिरीजची विक्री 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. मात्र भारताच्या शेजारील असा एक देश आहे, जिथे पातळ आयफोन म्हणजेच iPhone Air ची विक्री 19 सप्टेंबरपासून सुरु होणार नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताच्या शेजारील देश चीनमध्ये अद्याप हा आयफोन लाँच करण्यात आला नाही. चीन हा देश अॅपलच्या सर्वात मोठ्या आणि महत्वपूर्ण बाजारपेठेपैकी एक आहे. मात्र तरी देखील कंपनीने या देशात iPhone Air ची लाँचिंग टाळण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कपंनी या लांचिंगसाठी रेगुलेटरी अप्रूवलची वाट बघत आहे. त्यामुळे iPhone Air ची लाँचिंग चीनमध्ये कधी केली जाणार आहे, यासाठी आणखी किती प्रतिक्षा करावी लागणार आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
चीनमध्ये Apple वेबसाईटद्वारे आफोन एअर ऑर्डर केला जाऊ शकत नाही. कारण या स्मार्टफोनच्या पातळ डिझाईनमुळे यामध्ये फिजिकल सिम कार्ड स्लॉट उपलब्ध नाही. त्यामुळे हा फोन केवळ ई-सिम सपोर्टवर आधारित असणार आहे आणि याचं फीचरमुळे चीनमध्ये या आयफोनच्या लाँचिंगला विलंब होत आहे. या आयफोनच्या लाँचिंगसाठी कंपनीला अद्याप चीनमधून मंजूरी मिळाली नाही. कंपनीने सांगितलं आहे की, चायना मोबाईल, चायना टेलिकॉम आणि चायना युनिकॉर्न या तिन्ही सरकारी सेवा प्रदात्या आयफोन एअरला ई-सिम सपोर्ट देतील, परंतु मंजुरी मिळेपर्यंत या फोनचे रिलीज थांबवण्यात येत आहे. याबाबत Apple सरकारी संस्थांशी संपर्कात आहे. कंपनीला सरकारकडून मंजूरी मिळताच चीनमध्ये देखील पातळ आयफोन लाँच केला जाऊ शकतो. मात्र यासाठी काही कालावधी लागू शकतो. त्यामुळे हा आयफोन चीनमध्ये कधी लाँच केला जाऊ शकतो, याबाबत अद्याप कोणताही अंदाज लावला जाऊ शकत नाही.
आठवड्याच्या सुरुवातीला टेक जायंट कंपनीने एका मोठ्या ईव्हेंटचे आयजोन केले होते. कंपनीने या ईव्हेंटमध्ये त्यांची बहुप्रतिक्षित सिरीज आयफोन 17 लाँच केली आहे. या सिरीजमध्ये ऑल न्यू iPhone 17, iPhone 17 प्रो आणि iPhone 17 प्रो मॅक्स यासोबतच iPhone Air चा देखील समावेश आहे. यासोबतच कंपनीने या ईव्हेंटमध्ये त्यांचे इतर प्रोडक्ट्स देखील लाँच केले. आयफोन 17 सिरीजमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. या सिरीजमध्ये कंपनीने त्यांच्या सर्वात पातळ आयफोनचा देखील समावेश केला आहे.
Moto Pad 60 Neo: 7040mAh बॅटरीसह लाँच झाला Motorola चा नवाॉ टॅब्लेट, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
iPhone Air हा या सिरीजमधील सर्वात पातळ आयफोन आहे. याची जाडी केवळ 5.6mm आहे. या पातळ आयफोनमध्ये 6.6 इंच प्रोमोशन डिस्प्ले देण्यात आला आहे. या आयफोनमच्या रियरमध्ये 48MP सिंगल कॅमेरा आणि फ्रंटला 18MP सिंगल स्टेज लेंस देण्यात आला आहे. Apple ने यात A19 प्रो चिपसेट लावला आहे. प्रो मॉडेल्समध्येही हाच चिपसेट देण्यात आला आहे. Apple चे म्हणणे आहे की, या फोनची बॅटरी पातळ असूनही, ती संपूर्ण दिवस सहज चालू शकते. भारतात आयफोन एअरची सुरुवातीची किंमत 1,19,900 रुपये ठेवण्यात आली आहे.