
दिवाळीत BSNL ची मेगा ट्रीट! केवळ 1 रुपयात नवीन सिम आणि मिळणार 4G डेटासह जबरदस्त बेनिफिट्स
बीएसएनएल असे सांगितले आहे की, Diwali Bonanza 2025 ही एक लिमिटेड टाइम ऑफर आहे. ग्राहक या ऑफरचा फायदा 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2025 या काळामध्ये घेऊ शकतात. सरकारी टेलिकॉम कंपनी नव्या ग्राहकांना 4G सेवा प्रदान करत आहे. त्यामुळे या कंपनीच्या नव्या ग्राहकांसाठी नवीन सिम खरेदी करण्याची ही एक उत्तम ऑफर आहे. या ऑफरअंतर्गत केवळ एका रुपयात नवीन सिम खरेदी करण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांचा फायदाच होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
बीएसएनएलच्या दिवाळी ऑफर अंतर्गत कंपनी त्यांच्या नवीन ग्राहकांना केवळ एका रुपयांत BSNL 4G सिम ऑफर करत आहे. या एका रुपयांच्या प्लॅनमध्ये बीएसएनएलच्या ग्राहकांना कोणते फायदे ऑफर केले जाणार आहेत, याबाबत आता आपण जाणून घेऊया.
अनलिमिटेड कॉलिंग – या प्लॅनअंतर्गत बीएसएनएल त्यांच्या ग्राहकांना देशातील कोणत्याही नेटवर्कवर 30 दिवसांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग ऑफर करत आहे.
हाय स्पीड इंटरनेट – या प्लॅनमध्ये बीएसएनएल ग्राहकांना रोज 2GB 4G डेटा ऑफर करत आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 60GB डेटा मिळणार आहे.
बीएसएनए्चेया या प्लॅनमध्ये ग्राहकांना फ्री सिम कार्ड मिळणार आहे. ग्राहकांना केवाई प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सिम कार्ड दिले जाणार आहे. या प्लॅनची वैलिडिटी 30 दिवसांची असणार आहे. ही ऑफर खास बीएसएनएलच्या नव्या ग्राहकांसाठी लाँच करण्यात आली आहे. ही ऑफर अशा लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे जे लोक पहिल्यांदा कंपनीच्या 4G सेवेचा वापर करणार आहेत. अशा परिस्थितीत या ग्राहकांना जास्त पैसे न खर्च करता नेटवर्क वापरण्याची संधी मिळणार आहे.