Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात सुरु झाली Tecno Pop X ची विक्री! 9 हजारांहून कमी आहे किंमत, 120Hz डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरीने सुसज्ज

Tecno Pop X Sale Starts: टेक्नोने अलीकडेच लाँच केलेल्या स्मार्टफोनची विक्री आता सुरु झाली आहे. हा स्मार्टफोन एका सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 08, 2026 | 11:09 AM
भारतात सुरु झाली Tecno Pop X ची विक्री! 9 हजारांहून कमी आहे किंमत, 120Hz डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरीने सुसज्ज

भारतात सुरु झाली Tecno Pop X ची विक्री! 9 हजारांहून कमी आहे किंमत, 120Hz डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरीने सुसज्ज

Follow Us
Follow Us:
  • Tecno Pop X स्मार्टफोन 4GB + 64GB या सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच
  • डिव्हाईसची सुरुवातीची किंमत 9 हजारांहून कमी
  • स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच HD+ (720×1,600 पिक्सेल) LCD स्क्रीन
काही दिवसांपूर्वीच टेक कंपनीने टेक्नोने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला होता. हा स्मार्टफोन Tecno Pop X या नावाने लाँच करण्यात आला आहे. हा Transsion ब्रँडचा एक एंट्री-लेवल स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनची विक्री आता सुरु झाली आहे. कंपनीने लाँच केलेल्या या एंट्री-लेवल स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटवाली LCD स्क्रीन देण्यात आली आहे. Tecno Pop X मध्ये धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP64 रेटिंग दिले आहे. अलीकडेच लाँच झालेल्या इतर स्मार्टफोन मॉडेल्सप्रमाणे, Tecno Pop X स्मार्टफोन देखील यूजर्सना त्यांचा हँडसेट सेल्युलर नेटवर्कशी कनेक्ट नसतानाही, जवळच्या इतर यूजर्सना फोन कॉल करण्याची परवानगी देतो.

boAt महिलांसाठी घेऊन आला खास स्मार्टवॉच! स्टायलिश लूकपासून फिटनेस ट्रॅकिंगपर्यंत मिळणारे हे फीचर्स, इतकी आहे किंमत

Tecno Pop X ची भारतात किंमत आणि उपलब्धता

Tecno Pop X स्मार्टफोन 4GB + 64GB या सिंगल रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला असून या डिव्हाईसची सुरुवातीची किंमत 9 हजारांहून कमी आहे. Tecno Pop X स्मार्टफोनचे 4GB + 64GB व्हेरिअंट 8,499 रुपयांत लाँच करण्यात आले आहे. हा स्मार्टफोन चिली ग्रीन आणि फ्लेयर व्हाइट अशा दोन रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. ग्राहक अ‍ॅमेझॉनवरून हा स्मार्टफोन खरेदी करू शकतात. Tecno Pop X स्मार्टफोनच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉनवर बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. याशिवाय, येथे 299 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ईएमआय पर्याय देखील दिले जात आहेत. (फोटो सौजन्य – Tecno) 

Tecno Pop X चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Tecno Pop X एक डुअल सिम हँडसेट आहे, जो अँड्रॉईड 15 वर चालतो. या डिव्हाईसमध्ये कंपनीचा HiOS 15 यूजर इंटरफेस आहे. हे डिव्हाईस 12nm ऑक्टा कोर Unisoc T7250 चिपवर चालते. ज्यामध्ये 4GB LPDDR4x रॅम आणि 64GB eMMC स्टोरेज आहे. कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच HD+ (720×1,600 पिक्सेल) LCD स्क्रीन आहे, जी 120Hz वर रिफ्रेश रेट ऑफर करते. ज्याची पिक्सेल डेंसिटी 260ppi आहे.

Tecno Pop X च्या रिअर पॅनलमध्ये दोन सेंसर आहेत. यामध्ये f/1.85 अपर्चरवाला एक 13-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. सेल्फीसाठी Tecno Pop X स्मार्टफोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. Tecno Pop X मध्ये IP64 रेटिंग दिली आहे. याचा अर्थ असा आहे की, हा टेक्नो स्मार्टफोन धूळ आणि पाण्याच्या शिंतोड्यांपासून संरक्षित आहे. Tecno Pop X मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे आणि स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, ज्याला 15W वर चार्ज केले जाऊ शकते. फोन 10W एडॉप्टरसह उपलब्ध आहे.

Flipkart वर सुरु झाला Big Saving Days Sale! मोबाईल, लॅपटॉपसह अनेक वस्तूंवर 75% पर्यंत डिस्काऊंट, ऑफर मिस करू नका

फोन 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, जीपीएस आणि यूएसबी टाइप-C कनेक्टिविटीला सपोर्ट करतो. टेक्नोने या डिव्हाइसमध्ये एक IR ट्रान्समीटर देखील समाविष्ट केला आहे, जो घरगुती उपकरणे नियंत्रित करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. कंपनीच्या मते, या स्मार्टफोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक देखील आहे. त्याचे माप 167.79×77.97×8.18mm आहे आणि वजन 182.6g आहे. ते नो-नेटवर्क कम्युनिकेशनला देखील सपोर्ट करते.

Web Title: Tecno pop x smartphone sale starts in india price in less than 9 thousand know about the features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 11:09 AM

Topics:  

  • amazon
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?
1

Samsung Galaxy A18 4G लॉन्च! सुपर AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी; किती आहे किंमत?

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार
2

OnePlus N6 Lite: पॉवरफुल बॅटरीसह बरंच काही, एंटरटेनमेंटचा धमाका; पॉवर बँकची गरजही नाही भासणार

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले
3

iPhone 18 Pro: उद्यापासून सुरू होणार विक्री, A20 Pro चिपसेट, 48MP कॅमेरा आणि 6.9 इंच डिस्प्ले

5 Smart Fitness Gadgets:  Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!
4

5 Smart Fitness Gadgets: Fitnessचा नाद असेल तर ‘हे’ 5 गॅझेट्स तुमच्या बॅगेत हवेतच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.