Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsung चा मोठा निर्णय! ‘या’ 6 बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत 3,000 रुपयांपर्यंत वाढ, ग्राहकांना बसला धक्का

सॅमसंगने त्यांच्या 6 स्वस्त स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या 6 स्वस्त स्मार्टफोनच्या किंमती सुमारे 3 हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. कंपनीने जाहिर केलेल्या नवीन किंमती जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 08, 2026 | 12:01 PM
Samsung चा मोठा निर्णय! ‘या’ 6 बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत 3,000 रुपयांपर्यंत वाढ, ग्राहकांना बसला धक्का

Samsung चा मोठा निर्णय! ‘या’ 6 बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत 3,000 रुपयांपर्यंत वाढ, ग्राहकांना बसला धक्का

Follow Us
Close
Follow Us:
  • स्वस्त स्मार्टफोनच्या किंमती वाढवल्या
  • गॅलेक्सी M36 आणि गॅलेक्सी F36 स्मार्टफोनच्या किंमतीत 1,500 रुपयांपर्यंत वाढ
  • टिप्स्टर अभिषेक यादवने पोस्ट शेअर करत दिली माहिती
टेक कंपनी सॅमसंगने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांच्या 6 बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे. रिपोर्टनुसार, दक्षिण कोरियाई टेक कंपनी सॅमसंगने गॅलेक्सी A, गॅलेक्सी M आणि गॅलेक्सी F सीरीजच्या स्वस्त स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सांगितलं आहे की, या स्मार्टफोनच्या किंमती 3 हजार रुपयांपर्यंत वाढवल्या जाणार आहेत. विवो आणि ओप्पोने यापूर्वी त्यांच्या काही फोनच्या किमती वाढवल्या आहेत. ओप्पोने ए6 प्रो, ए6एक्स आणि रेनो 15 सीच्या किमती त्यांच्या लाँच किमतींपेक्षा 2,500 रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. यानंतर आता सॅमसंगने त्यांच्या स्वस्त स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतात सुरु झाली Tecno Pop X ची विक्री! 9 हजारांहून कमी आहे किंमत, 120Hz डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरीने सुसज्ज

सॅमसंगच्या या 6 स्मार्टफोनच्या किंमती वाढल्या

सॅमसंगने गेल्यावर्षी लाँच केलेल्या गॅलेक्सी M36 आणि गॅलेक्सी F36 स्मार्टफोनच्या किंमतीत 1,500 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, गॅलेक्सी M17 आणि Galaxy F17 ची किंमत 1,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, गॅलेक्सी A17 च्या किंमतीत 3 हजार रुपयांची आणि गॅलेक्सी A06 च्या किंमतीत 1,500 रुपयांची वाढ केली आहे. टिप्स्टर अभिषेक यादवने त्यांच्या एक्स अकाऊंटवर याबाबत माहिती देत पोस्ट शेअर केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

स्मार्टफोनच्या नवीन किंमती जाणून घेऊया

सॅमसंग गॅलेक्सी M36 5G चे 8GB + 128GB व्हेरिअंट 21,499 रुपयांत लाँच करण्यात आले होते. मात्र आता या व्हेरिअंटची किंमत 500 रुपयांनी वाढली असून नवीन किंमत स्मार्टफोन 21,999 रुपये झाली आहे. स्मार्टफोनच्या 8GB + 256GB या व्हेरिअंटची लाँच किंमत 24,499 रुपये होती. मात्र आता ही किंमत 1,500 रुपयांनी वाढली असून नवीन किंमत 25,999 रुपये झाली आहे.

2026 is not a good year for the smartphone industry. 🥲 Samsung smartphones getting a price hike in India 🇮🇳 New prices effective March 5, 2026. Also hearing that OPPO A6 Pro, A6x, and Reno 15C could see a price hike soon. Samsung revised prices:
• Galaxy M36 (8/128GB) –… pic.twitter.com/HlWpW3CDVo
— Abhishek Yadav (@yabhishekhd) March 5, 2026

सॅमसंग गॅलेक्सी F36 5G च्या 8GB +128GB व्हेरिअंटची लाँच किंमत 21,499 रुपये आहे. मात्र आता ही किंमत 500 रुपयांनी वाढली असून स्मार्टफोन 21,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर 8GB + 256GB व्हेरिअंटची लाँच किंमत 24,999 रुपये होती. मात्र आता ही किंमत 1,500 रुपयांनी वाढली असून नवीन किंमत 25,999 रुपये झाली आहे. सॅमसंग गॅलेक्सी A06 5G स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची लाँच किंमत 15,499 रुपये होती. मात्र कंपनीने ही किंमत 500 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असून नवीन किंमत 15,999 रुपये झाली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी M17 5G चे 6GB + 128GB व्हेरिअंट आता 15,999 रुपयांऐवजी 16,499 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. ही किंमत 500 रुपयांनी वाढली आहे. तर 8GB + 128GB ची किंमत देखील 1 हजार रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता हा व्हेरिअंट 17,499 रुपयांऐवजी 18,499 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

सॅमसंग गॅलेक्सी F17 5G चे 4GB + 128GB व्हेरिअंट 16,499 रुपयांत लाँच करण्यात आले होते. मात्र आता या व्हेरिअंटची किंमत 500 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता हे स्मार्टफोन व्हेरिअंट 16,999 रुपयांत खरेदी केले जाऊ शकते. 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 1,000 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता हे व्हेरिअंट 17,999 रुपयांऐवजी 18,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. 8GB + 128GB व्हेरिअंट 19,999 रुपयांत लाँच करण्यात आले होताे. मात्र आता ही किंमत 1 हजार रुपयांनी वाढली असून डिव्हाईस 20,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

7000mAh बॅटरीसह नव्या Motorola स्मार्टफोनने भारतात केली एंट्री! प्रोसेसर आणि कॅमेरा आहे जबरदस्त, वाचा किंमत

सॅमसंग गॅलेक्सी A17 5G स्मार्टफोनचे 6GB + 128GB व्हेरिअंंट 18,999 रुपयांत लाँच करण्यात आले होते. मात्र आता या व्हेरिअंटची किंमत 1,500 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे हे व्हेरिअंट आता 20,499 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. 8GB + 128GB व्हेरिअंंट 20,499 रुपयांत लाँच करण्यात आले होते. मात्र आता या व्हेरिअंटची किंमत 2,000 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे हे व्हेरिअंट आता 22,499 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. 8GB + 256GB व्हेरिअंंट 23,499 रुपयांत लाँच करण्यात आले होते. मात्र आता या व्हेरिअंटची किंमत 3,000 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे हे व्हेरिअंट आता 26,499 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

Web Title: Samsung increase these 6 budget smartphones price upto 3 thousand know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

भारतात सुरु झाली Tecno Pop X ची विक्री! 9 हजारांहून कमी आहे किंमत, 120Hz डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरीने सुसज्ज
1

भारतात सुरु झाली Tecno Pop X ची विक्री! 9 हजारांहून कमी आहे किंमत, 120Hz डिस्प्ले आणि 5,000mAh बॅटरीने सुसज्ज

OpenAI चा मोठा धमाका! GPT-5.4 लाँच; आता AI स्वतः संगणक चालवणार, फोन आणि वेबवर सपोर्ट
2

OpenAI चा मोठा धमाका! GPT-5.4 लाँच; आता AI स्वतः संगणक चालवणार, फोन आणि वेबवर सपोर्ट

Flipkart वर सुरु झाला Big Saving Days Sale! मोबाईल, लॅपटॉपसह अनेक वस्तूंवर 75% पर्यंत डिस्काऊंट, ऑफर मिस करू नका
3

Flipkart वर सुरु झाला Big Saving Days Sale! मोबाईल, लॅपटॉपसह अनेक वस्तूंवर 75% पर्यंत डिस्काऊंट, ऑफर मिस करू नका

युनिक लुक आणि पॉवरफुल फीचर्स! लाँच होताच सुरु झाली Nubia स्मार्टफोनची चर्चा, 80W चार्जिंग सपोर्टने सुसज्ज
4

युनिक लुक आणि पॉवरफुल फीचर्स! लाँच होताच सुरु झाली Nubia स्मार्टफोनची चर्चा, 80W चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.