
BSNL चा धमाका! केवळ 1 रुपयांत यूजर्सना मिळणार नवं सिम, हाय-स्पीड डेटा आणि बरंच काही... अशी आहे ऑफर
सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी Airtelचा AI कवच; ‘सेफ नेटवर्क’मध्ये मिळणार हे खास सुरक्षा फीचर्स
एक्सवर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये बीएसएनएल फ्रीडम 2.0 ऑफरची घोषणा करण्यात आली आहे. या ऑफरची किंंमत केवळ 1 रुपये आहे. म्हणजेच केवळ 1 रुपयांत यूजर्सना फ्री सिमसोबतच डेली डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस सारखे फायदे ऑफर केले जाणार आहेत. ही एक लिमिडेट टाईम ऑफर आहे. त्यामुळे तुम्हा ला 1 रुपयांत नवीन सिम खरेदी करायचे असेल तर घाई करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
What can ₹1 get you?
A whole new connection#BSNLIndia #BSNLSelfCareApp #InternetForEveryone #DigitalLife #IndiaOnline #BSNLServices #SmartIndia #EverydayConnectivity #HamaraBSNL #frc1 @CMDBSNL @robertravi21 pic.twitter.com/nEwAT2A7iW — BSNL India (@BSNLCorporate) September 25, 2026
बीएसएनएलद्वारे एक्सवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बीएसएनएल फ्रीडम 2.0 ऑफरची किंमत केवळ 1 रुपये आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना फ्रि सिम दिले जाणार आहे. तसेच यामध्ये डेली 1GB हाय स्पीड डेटा देखील मिळणार आहे. यासोबतच, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे. 1 रुपयांत मिळणाऱ्या या प्लॅनची व्हॅलिडीटी 24 दिवसांची असणार आहे.
याचा अर्थ असा आहे की, यूजर्स 24 दिवसांपर्यंत रोज 1GB हाय स्पीड डेटा आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ घेऊ शकणार आहेत. अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगमुळे तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत मनसोक्त बोलू शकणार आहात.
बीएसएनएलने एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, बीएसएनएल फ्रीडम 2.0 ऑफर 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत उपलब्ध असणार आहे. यामुळे ज्या ग्राहकांना प्रमोशनल ऑफरचा फायदा घ्यायचा आहे, त्यांना 12 ऑक्टोबर 2026 पूर्वी उपलब्धता आणि लागू अटींच्या तपशिलांसाठी अंतिम मुदतीपूर्वी बीएसएनएलशी संपर्क साधावा लागेल. ज्या यूजर्सना नवीन सिम खरेदी करायचे आहे आणि कमी किंंमतीत मोबाईल कनेक्टिविटी पाहिजे आहे, अशा यूजर्ससाठी कंपनीने ही खास ऑफर सादर केली आहे.