Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL ने उडवली टेलिकॉम कंपन्यांची झोप! सुरु केली अनोखी सर्विस, SIM कार्डशिवाय वापरता येणार 5G इंटरनेट सर्विस

BSNL New Service: Airtel-Vi चं वाढलं टेंशन! BSNL ने इतर टेलिकॉम कंपन्यांचं टेंशन वाढवलं आहे. आता कंपनीने एक अनोखी सर्विस सुरु केली आहे. यामध्ये आता युजर्स सिम कार्डशिवाय 5G इंटरनेट सर्विस वापरू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 22, 2025 | 10:20 AM
BSNL ने उडवली टेलिकॉम कंपन्यांची झोप! सुरु केली अनोखी सर्विस, SIM कार्डशिवाय वापरता येणार 5G इंटरनेट सर्विस

BSNL ने उडवली टेलिकॉम कंपन्यांची झोप! सुरु केली अनोखी सर्विस, SIM कार्डशिवाय वापरता येणार 5G इंटरनेट सर्विस

Follow Us
Close
Follow Us:

देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कंपनीने देशातील आघाडीच्या आणि खाजगी टेलिकॉम कंपन्यांची झोप उडवली आहे. कारण कंपनीने त्यांच्या युजर्ससाठी एक अनोखी सर्विस सुरु केली आहे. ही एक अशी सर्विस आहे, ज्याची युजर्स गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होते. कंपनीने सांगितलं आहे की, आता युजर्स सिम कार्डशिवाय 5G इंटरनेट सर्विसचा वापर करू शकणार आहेत.

तुमच्या अकाऊंटचा Password तर लिक झाला नाही ना? कसं कराल चेक? या 4 स्टेप्स करणार तुमची मदत

BSNLने हैदराबादमध्ये अधिकृतपणे त्यांची नवीन Quantum 5G सेवा सुरु केली आहे. या सर्विसला Q-5G असं नाव देण्यात आलं आहे. कंपनीने ही सर्विस सुरु करून देशातील इतर टेलिकॉम कंपन्यांना मोठं आव्हान दिलं आहे. ही सेवा लवकरच बंगळुरु, पुणे, विशाखापत्तनम, चंडीगड आणि ग्वालियर यासांरख्या शहरात देखील सुरु केली जाणार आहे. ही सेवा युजर्ससाठी अत्यंत खास असणार आहे, कारण यामध्ये युजर्सना सिम कार्डशिवाय 5G इंटरनेट सर्विसचा वापर करता येणार आहे.

कंपनीने सुरु केलेल्या या नवीन सर्विसअंतर्गत युजर्स कोणत्याही सिम कार्ड आणि वायरिंगशिवाय हाय-स्पीड इंटरनेटचा वापर करू शकणार आहेत. या सर्विसअंतर्गत कंपनीने दोन प्लॅन लाँच केले आहेत. ज्यांची किंमत 999 रुपये आणि 1,499 रुपये आहे. युजर्सना 999 रुपयांत 100Mbps आणि 1,499 रुपयांत 300Mbps स्पीडचा प्लॅन ऑफर केला जाणार आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणत्याही फायबर लाईन किंवा कॉलिंग सुविधेची आवश्यकता नाही. (फोटो सौजन्य – Pinterest) 

काय आहे BSNL ची Q-5G FWA सेवा?

BSNL ची ही Quantum 5G सेवा विशेष करून भारताच्या टियर-2 आणि टियर-3 शहरांसाठी सुरु करण्यात आली आहे. जिथे आजही ऑप्टिकल फायबरची पोहोच खूपच मर्यादित आहे. ही सेवा सुरु करण्यामागील उद्देश म्हणजे छोटे व्यवयास आणि ऑफीस इंटरनेटने जोडणे. Q-5G तंत्रज्ञान पूर्णपणे भारतात विसकित करण्यात आलं आहे. यासाठी वापरण्यात आलेले डिव्हाईस देखील स्वदेशी आहेत. ही सेवा फिक्स्ड वायरलेस अ‍ॅक्सेस (FWA) तंत्रज्ञानाद्वारे प्रदान केली जाईल, ज्यामुळे यूजर्सना कोणत्याही वायर किंवा लँडलाइनशिवाय इंटरनेटची सुविधा मिळेल.

I’m not a robot: एका वाक्यावर क्लिक करताच कसं समजतं तुम्ही माणूस आहात की रोबोट? या स्मार्ट प्रोसेसमध्ये दडलंय बरंच काही

कोणत्याही सिम आणि वायरशिवाय मिळणार 5G इंटरनेट

BSNL च्या या नवीन सर्विसमध्ये युजर्स केवळ इंटरनेट डेटाचा वापर करू शकणार आहेत, कॉलिंगचा नाही. ही सर्विस Airtel Xstream Fiber आणि Jio AirFiber प्रमाणेच आहे. मात्र याचे वैशिष्ट्य असं आहे की, याचा वापर करण्यासाठी युजर्सना सिम कार्डची गरज भासणार नाही. यासाठी, तुमच्या घराच्या छतावर कस्टमर प्रिमाइसेस इक्विपमेंट (CPE) बसवले जाईल जे जवळच्या BSNL 5G टॉवरमधून सिग्नल पकडेल आणि तुमच्या घरातील राउटरवर ट्रान्सफर करेल.

Web Title: Bsnl launched unique service now users can use 5g internet service without sim card tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 10:20 AM

Topics:  

  • bsnl
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
1

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
2

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
3

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या
4

Jio युजर्सना झटका! कंपनीने गुपचूप बंद केला हा बजेट-फ्रेंडली प्लॅन, आता दुसरा ऑप्शन कोणता? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.