I’m not a robot: एका वाक्यावर क्लिक करताच कसं समजतं तुम्ही माणूस आहात की रोबोट? या स्मार्ट प्रोसेसमध्ये दडलंय बरंच काही
तुम्ही इंटरनेटवर एखाद्या विषयावरील माहिती शोधताना तुम्ही ‘I’m not a robot’ वर नक्कीच क्लिक केलं असेल. या वर क्लिक केल्यानंतर काही वेळानंतर तुमच्या समोर वेबसाईट ओपन होते. पण ही प्रोसेस पूर्ण करताना आपल्याला अनेकदा हा प्रश्न पडतो की एका बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर कम्प्युटरला कस समजतं आपण माणूस आहे की रोबोट? ही प्रोसेस पूर्ण करणं जेवढं सोप आहे तेवढीच ही प्रोसेस स्मार्ट देखील आहे. या एका प्रोसेसमध्ये अनेक रहस्य दडले आहेत.
9000mAh बॅटरीसह लाँच झाला Redmi Pad 2, केवळ इतकी आहे सुरुवातीची किंमत; वाचा स्पेसिफिकेशन्स
या प्रकाराच्या टेस्टला CAPTCHA (कम्पलीटली ऑटोमेटेड पब्लिक ट्यूरिंग टेस्ट टू टेल कंप्यूटर्स एंड ह्यूमन्स अपार्ट) असं म्हणतात. या प्रकाराच्या टेस्टचा उद्देश बॉट्सला थांबवणं आणि केवळ माणसांना वेबसाईट वापरण्यासाठी प्रोत्साहन देणं हा आहे. जेव्हा तुम्ही ‘I’m not a robot’ चेकबॉक्सवर क्लिक करता, तेव्हा सिस्टीम डायरेक्ट तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. बॉक्सवर क्लिक करण्यापूर्वी आणि दरम्यान तुमच्या वर्तनाचे शांतपणे विश्लेषण करण्यास सुरुवात केली जाते. म्हणजेच सिस्टीम तुमचे वर्तन ट्रॅक करते. (फोटो सौजन्य – Pinterest)
या संपूर्ण प्रोसेसला बिहेवियरल एनालिसिस असं म्हटलं जातं. बॉट्स सहसा सरळ रेषेत किंवा खूप लवकर हालचाल करतात, तर मानवी वर्तन थोडे इम्परफेक्ट असते, ज्यामुळे फरक ओळखणे सोपे होते.
तुमच्या माऊसच्या मूवमेंट्सव्यतिरिक, Google किंवा दूसरे CAPTCHA प्रोवाइडर्स तुमची ब्राउजर हिस्ट्री आणि कुकीज देखील चेक करतात. जर तुम्ही फेमिलियर ब्राउजरचा वापर करत, Google मध्ये लॉग इन केले असेल किंवा नियमित वेब वापराचा इतिहास असेल, तर हे एक मजबूत संकेत देते की तुम्ही एक व्यक्ती आहात. जर तुम्ही क्लीन ब्राउजर किंवा इनकॉग्निटो मोडचा वापर करत असाल तर तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. जसं की स्ट्रीट साइन्स किंवा ट्रॅफिक लाइट्सच्या इमेज ओळखणे इत्यादी.
Tech Tips: पावसाळ्यात किती असावं फ्रिजचं तापमान? अशी आहे रेफ्रिजरेटर वापरण्याची योग्य पद्धत
कधीकधी, चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतरही जर सिस्टमला खात्री नसेल की तुम्ही माणूस आहात, तर ते अतिरिक्त चाचण्या करते – जसे की क्रॉसवॉक असलेल्या ईमेजवर क्लिक करणे किंवा डिस्टॉर्टेड शब्द टाइप करणे. बॉट्ससाठी या चाचण्या सोडवणे कठीण असते. थोडक्यात सांगायचे झाले तर, चेकबॉक्सवर टिक केल्याने तुमच्या ऑनलाइन वर्तनाची, ब्राउझर डेटाची आणि पइंटरॅक्शन पॅटर्न्सटचे बॅकग्राउंडची तपासणी सुरू होते. हे सर्व तुमचा वेळ वाया न घालवता तुम्ही एक व्यक्ती आहात याची पुष्टी करण्यासाठी केले जाते
स्पॅम रोखण्यात, हॅकिंग रोखण्यात आणि वेबसाइट्सना दुर्भावनापूर्ण बॉट्सपासून वाचवण्यात कॅप्चा महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी केवळ काही प्रश्न विचारले जातात. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही त्या चेकबॉक्सवर क्लिक कराल तेव्हा लक्षात ठेवा की ते फक्त एक टिक नाही, ही एक स्मार्ट प्रोसेस आहे जी वेबसाईटला सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करते.