तुमच्या अकाऊंटचा Password तर लिक झाला नाही ना? कसं कराल चेक? या 4 स्टेप्स करणार तुमची मदत
जगभरातील सुमारे 16 अब्ज पासवर्ड लिक झाल्याचा एक अहवाल समोर आला होता. यामध्ये Google, Facebook, Instagram, X यासारख्या प्लॅटफॉर्म्सवरील अकाउंट्सचा समावेश आहे. या अहवालानंतर अनेक सोशल मीडिया युजर्समध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. आपला पासवर्ड देखील लिक झाला नाही ना? अशी भिती आता प्रत्येक सोशल मीडिया युजरच्या मनात आहे. तुम्हाला देखील अशी भिती वाटत असेल तर चिंता करू नका, आता आम्ही तुम्हाला काही टूल्सबद्दल सांगणार आहोत. या टूल्सच्या मदतीने तुम्ही तपासू शकता की तुमचा पासवर्ड लिक झाला आहे की नाही.
Have I Been Pwned? ही एक पॉपुलर आणि विश्वसनीय वेबसाइट आहे, जिथे तुम्ही तुमचा ईमेल अॅड्रेस किंवा फोन नंबर एंटर करून चेक करू शकता की लिक झालेल्या पासवर्डमध्ये तुमच्या डेटाचा समावेश आहे की, नाही. तुम्हाला या वेबसाईटवर केवळ तुमचा ईमेल एंटर करायचा आहे. जर लिक झालेल्या कोणत्याही माहितीमध्ये तुमच्या डेटाचा समावेश असेल तर त्याबाबत तात्काळ तुम्हाला स्क्रीनवर सूचित केले जाणार आहे. येथे तुमचा पासवर्ड लिक झाला आहे की नाही हे देखील तुम्ही तपासू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
Google Chrome चा Password Manager तुम्हाला सांगणार आहे की तुमचा पासवर्ड रिस्कमध्ये आहे की नाही. जर तुम्ही Google Chrome किंवा Android फोनचा वापर करत असाल, तर त्यामधील -in Google Password Manager तुम्ही सेव्ह केलेले पासवर्ड्स चेक करतो. या टूलच्या मदतीने तुम्ही कमकूवत आणि लीक झालेले पासवर्ड बदलू शकता. याऐवजी एक मजबूत पासवर्डचा वापर करू शकता. याचा वापर करण्यासाठी Google अकाऊंटमध्ये लॉगिन असणं गरजेचं आहे.
Microsoft Edge Password Monitor हे विंडोज यूजर्ससाठी एक उत्तम फीचर आहे. जर तुम्ही विंडोज आणि Microsoft Edge ब्राउजरचा वापर करत असाल तर त्यामध्ये असलेले पासवर्ड मॉनिटर तुमचे सेव्ह केलेले पासवर्ड लीक झालेल्या डेटाबेसशी जुळवते आणि त्यांची तपासणी करते. जर यातील कोणता पासवर्ड लिक झाला असेल तर त्याबाबत ताबडतोब अलर्ट दिला जातो. हे फीचर Edge ब्राऊझरमध्ये आपोआप अॅक्टिव होतं आणि पासवर्ड सेव्ह करते.
Google ने त्यांच्या यूजर्ससाठी एक खास Dark Web Monitoring फीचर लाँच केलं आहे. हे टूल तुमचा ईमेल, मोबाईल नंबर आणि पासवर्ड यासारखी माहिती डार्क वेबवर शोधते. जर तुमच्या माहितीशी जुळत असलेला कोणताही डेटा इथे आढळला तर त्याबाबत ताबडतोब नोटिफिकेशन पाठवलं जातं. हे फीचर Google One सब्सक्राइबर्ससाठी अधिक तपशीलवार पद्धतीने उपलब्ध आहे.