Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL New Plans: दोन SIM वापरणाऱ्यांची चिंता मिटली! BSNL चे ‘हे’ तीन स्वस्त व्हॉइस प्लॅन लॉन्च

BSNL ने डेटा न वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ₹172, ₹184 आणि ₹190 असे तीन नवीन व्हॉइस रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS ची सुविधा मिळते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 19, 2026 | 03:35 PM
BSNL New Plans: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

BSNL New Plans: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • BSNL चे 172, 184 आणि ₹190 चे तीन नवीन व्हॉइस प्लॅन लॉन्च.
  • तिन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मोफत.
  • इंटरनेट डेटा नको असणाऱ्या आणि दोन SIM वापरणाऱ्या ग्राहकांसाठी फायदेशीर पर्याय.
BSNL Launches Three New Voice: आजकाल रिचार्जचे भाव बघून डोकं दुखतंय ना? प्रत्येक कंपनी रोज नवा प्लॅन आणते, पण त्यात डेटा सक्तीचा. आपल्याला डेटा लागतच नाही, तरी पण 300-400 रुपये मोजावे लागतात. हीच अडचण लक्षात घेऊन BSNL ने आता 3 नवे प्लॅन काढलेत. 172, 184 आणि 190. यात नेट अजिबात नाही, फक्त बोलणं आणि मेसेज.

खरं तर TRAI ने सगळ्या कंपन्यांना सांगितलं होतं, ज्यांना नेट नकोय त्यांच्यासाठी वेगळे प्लॅन काढा. Jio, Airtel ने काढले पण ते महागच होते. BSNL ने मात्र एकदम खिशाला परवडेल असे प्लॅन आणलेत. त्यामुळे म्हातारी माणसं, शेतकरी, किंवा ज्यांच्याकडे घरी वायफाय आहे, त्यांना आता फायदा होणार आहे.

काय मिळतंय ‘या’ 3 प्लॅनमध्ये?

तिन्ही प्लॅनमध्ये जवळपास सेमच सुविधा आहे. फरक फक्त दिवसांमध्ये आहे.सगळ्यात पहिला प्लॅन आहे 172 रुपयांचा. यात तुम्हाला 28 दिवस चालेल. रोजचा हिशोब केला तर 6 रुपये 14 पैसे पडतो. म्हणजे एक चहा पण येत नाही तेवढ्या पैशात दिवसभर बोला.

दुसरा प्लॅन आहे 184 रुपयांचा.
यात 30 दिवस मिळतात. रोजचा खर्च 6 रुपये 13 पैसे. 172 पेक्षा 12 रुपये जास्त द्या आणि 2 दिवस जास्त मिळवा, असं गणित आहे.

तिसरा प्लॅन आहे 190 रुपयांचा.
हा सगळ्यात भारी आहे कारण यात कॅलेंडर महिना मिळतो. म्हणजे तुम्ही 1 तारखेला मारला तर पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपर्यंत चालेल. महिना 30 दिवसांचा असो किंवा 31 दिवसांचा, रोजचा खर्च 6 रुपये ते 6 रुपये 33 पैशाच्या आसपास जातो.

How to Use an Old Smartphone: कपाटात पडलेल्या जुन्या मोबाईलचा करा स्मार्ट वापर! 3 भन्नाट आयडिया पाहून व्हाल थक्क

तिन्ही प्लॅनमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. दिवसाला 100 SMS फ्री. आणि भारतात कुठेही, कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉलिंग. लोकल असो, STD असो, किंवा रोमिंग असो, टेन्शन नाही.

कोणासाठी ‘हे’ प्लॅन कामाचे?

आजकाल बऱ्याच लोकांकडे 2 सिम असतात. एक मेन नंबर, दुसरा बँक वगैरेसाठी. दुसरा नंबर फक्त चालू ठेवायचा असतो. त्यासाठी 300 रुपयांचा डेटा प्लॅन घेणं म्हणजे पैशाचा अपव्यय. त्यांच्यासाठी हा 172 चा प्लॅन एकदम परफेक्ट आहे.

दुसरं म्हणजे कीपॅड मोबाईल वापरणारे आजोबा-आजी. त्यांना व्हॉट्सअॅप, युट्युब काही नको असतं. त्यांना फक्त पोरांशी बोलायचं असतं. त्यांना हा प्लॅन बेस्ट आहे.तिसरं म्हणजे ज्यांच्या घरी किंवा दुकानात वायफाय आहे. त्यांना मोबाईल डेटा कशाला पाहिजे? त्यांनी हा प्लॅन घेतला की काम झालं.

Jio, Airtel पेक्षा कसा स्वस्त?

आता तुलना करून बघा. Jio चा असाच बिना डेटाचा प्लॅन 177 रुपयांपासून सुरू होतो. Airtel चा 28 दिवसांचा प्लॅन 185 रुपयाला आहे. त्या मानाने BSNL चा 172 रुपयांचा प्लॅन स्वस्तात पडतोय. सरकारी कंपनी असून पण तिने प्रायव्हेट कंपन्यांना टक्कर दिलीय.

Gaming News : १३ वर्षाची प्रतीक्षा संपली; GTA ६ अखेर गेमर्सच्या भेटीला जगातील सर्वात महागड्या गेमची चर्चा

BSNL कडे आता 9.4 कोटीपेक्षा जास्त ग्राहक आहेत. त्यांनी वेबसाईटवर आणि अॅपवर TRAI Mandated Packs म्हणून वेगळा भाग पण ठेवलाय, जेणेकरून लोकांना हे प्लॅन लगेच सापडतील. याशिवाय 99 आणि 439 चे जुने व्हॉइस प्लॅन पण अजून चालू आहेत.थोडक्यात सांगायचं तर, जर तुम्हाला फक्त कॉलिंग पाहिजे असेल आणि डेटा नको असेल, तर उगाच महागडे रिचार्ज मारू नका. हा 172, 184 किंवा 190 चा प्लॅन मारा आणि पैसे वाचवा.

💡

Frequently Asked Questions

  • Que: BSNL चे नवीन व्हॉइस प्लॅन किती रुपयांचे आहेत?

    Ans: BSNL ने 172, 184 आणि ₹190 असे तीन नवीन व्हॉइस प्लॅन आणले आहेत.

  • Que: BSNL च्या 172 प्लॅनची वैधता किती आहे?

    Ans: या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे.

  • Que: BSNL च्या 184 प्लॅनमध्ये किती दिवस मिळतात?

    Ans: 184 च्या प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता मिळते.

Web Title: Bsnl new voice recharge plans 172 184 190 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • bsnl
  • BSNL plan
  • Recharge plan

संबंधित बातम्या

Jio Free Recharge: फ्री फ्री फ्री!  Jio ची भन्नाट ऑफर,  ग्राहकांना मिळणार फ्री रिचार्ज, कसं ते जाणून घ्या…
1

Jio Free Recharge: फ्री फ्री फ्री! Jio ची भन्नाट ऑफर, ग्राहकांना मिळणार फ्री रिचार्ज, कसं ते जाणून घ्या…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.