फोटो सौजन्य सोशल मीडिया
GTA ५ हा गेम २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता . त्यानंतर चाहत्यांना मालिकेच्या पुढील भागाची प्रतीक्षा होती . अखेर GTA ६ ची घोषणा झाल्यानंतर गेमर्समध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली . मात्र विकासातील अडचणीमुळे गेमची रिलीज तारीख दोन वेळा पुढे ढकलण्यात आली . त्यातच गेमशी संबंधित काही गोपनीय माहिती आणि व्हिडीओ ऑनलाईन लीक झाल्याने चर्चेला आणखी उधाण आले . आता अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा गेम लॉन्च होत आहे .
Google Drive ला टक्कर देणार! WhatsApp आणतंय भन्नाट फीचर, चॅट्सचा बॅकअप घेण्याची पद्धत बदलणार
या नव्या गेमची कथा अमेरिकेतील फ्लोरीडापासून प्रेरीत असलेल्या लिओनिडा या काल्पनिक राज्यात घडते . त्यामध्ये व्हाईस सिटी हे प्रमुख ठिकाण आहे . लुसिया आणि जेसन या प्रमुख पात्रांभवती गेमची कथा फिरते . गुन्हेगारी विश्व , साहसी मोहीम , वाहन चालवणे आणि विस्तृत खुल्या जगाचा अनुभव अशा अनेक गोष्टींमुळे हा गेम खास ठरणार आहे . मागील काही भागांच्या तुलनेत अधिक वास्तववादी वातावरण आणि सुधारित ग्राफिक्सचा अनुभव खेळाडूंना मिळणार आहे .
GTA ६ हा आत्तापर्यंत विकसित झालेल्या सर्वात महागड्या व्हिडीओ गेम्सपैकी एक मानला जात आहे . त्याच्या निर्मितीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे . गेमच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे लॉन्चपूर्वीच विक्री आणि कमाईबाबत मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत . यापूर्वी GTA ५ ने विक्रीचे अनेक विक्रम प्रस्थापित केले होते . त्यामुळे नव्या भागांकडूनही गेमिंग उद्योगाला मोठ्या अपेक्षा आहेत .
हा गेम केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता गेमिंग बाजारपेठेतील कमाईचे नवे आणि मोठे विक्रम प्रस्थापित करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे . तसेच GTA ६ च्या निर्मितीवर तब्बल १ ते १.५ अब्ज डॉलर खर्च झाल्याचा दावा आणि अंदाज या उद्योगातील तज्ज्ञांचा आहे . भारतीय चलनात ही रक्कम सुमारे ८ हजार ते १२ हजार ५०० कोटी रुपयांच्या आसपास आहे . मात्र रॉकस्टार गेम्सने अद्याप अधिकृत बजेट जाहीर केलेले नाही . या प्रचंड खर्चामागे अनेक गेम डेव्हलपमेंट , हजारो काम , अत्याधुनिक ग्राफिक्स , गेममधील वास्तववादी आणि मोठ्या प्रमाणावरील तांत्रिक संशोधन आहे .






