
BSNL Recharge Plan: 1 महिना रिचार्जची चिंता नाही! 100GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार हे फायदे, वाचा किंमत
कंपनीने लाँच केलेल्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनची किंमत 1 महिन्याची आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना BiTV चा एक्सेस देखील दिला जात आहे. या नव्या आणि स्वस्त रिचार्ज प्लॅनची किंमत 300 रुपयांपेक्षा कमी आहे. म्हणजेच तुम्हाला अत्यंत कमी किंमतीत एका महिन्याची व्हॅलिडीटी असलेला रिचार्ज प्लॅन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही बीएसएनएल यूजर असाल तर एका महिन्याच्या व्हॅलिडीटीसह 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीत रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर हा नवीन रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन ठरणार आहे. या प्लॅनबाबत सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Stay connected without limits! Unlock BSNL’s All-Access Digital Festive Pass with 100GB high-speed data, unlimited calls, 100 SMS/day, and FREE BiTV all with 30 days validity. Get unbeatable value at just ₹251 and enjoy reliable, affordable connectivity across Bharat.… pic.twitter.com/xVt0N2OVwm — BSNL India (@BSNLCorporate) January 25, 2026
बीएसएनएलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत या नवीन रिचार्ज प्लॅनची माहिती दिली आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत 251 रुपये आहे. कंपनीने लाँच केलेल्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये 100GB हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाते. या प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 100 एसएमसएस पाठवण्याची सुविधा ऑफर केली जाते. ही प्लॅन ऑफर 31 जानेवारीपर्यंत मर्यादित आहे.
कंपनीने ग्राहकांसाठी ऑल-अॅक्सेस डिजिटल फेस्टिव्ह पास सादर केला आहे, ज्यामध्ये यूजर्सना केवळ 251 रुपयांत अनेक फायदे मिळणार आहेत. हा प्लॅन मर्यादित वेळेनंतर बंद केला जाणार आहे. बीएसएनएलने म्हटले आहे की यूजर्स बीएसएनएलच्या चॅटबॉट “बीआरईएक्स” द्वारे देखील हा प्लॅन रिचार्ज करू शकतात. ग्राहक बीएसएनएलच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला भेट देऊन ते सहजपणे सक्रिय करू शकतात.