
Jio Recharge Plan: अनलिमिटेड कॉलिंग आणि बरेच फायदे... केवळ इतक्या रुपयांत मिळणार तब्बल 90 दिवसांची व्हॅलिडीटी
कंपनीच्या पोर्टफोलिओमधील 90 दिवसांच्या रिचार्ज प्लॅनची किंमत 899 रुपये आहे. कंपनी त्यांच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड फ्री कॉलिंग ऑफर करते. यासोबतच यूजर्सना फ्री नॅशनल रोमिंगची सुविधा देखील मिळणार आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये डेली 2GB हाई स्पीड डेटा आणि 100 फ्री एसएमएस देखील मिळणार आहेत. याशिवाय कंपनी त्यांच्या यूजर्सना 20GB एक्स्ट्रा डेटा ऑफर करते. एवढंच नाही तर या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड 5G डेटा ऑफर केला जातो. (फोटो सौजन्य – Pinterest)
या प्रीपेड प्लॅनमध्ये मिळणाऱ्या इतर फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर कंपनी यूजर्सना जिओ एआय क्लाऊड आणि जिओ टिव्हीचा फ्री एक्सेस दिला जातो. जियो एआई क्लाउडमध्ये 50GB फ्री स्टोरेज ऑफर केला जातो. कंपनीने अलीकडेच गुगलसोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे वापरकर्त्यांना जेमिनी प्रो सबस्क्रिप्शनचा अॅक्सेस मिळतो, ज्याची किंमत 35,100 रुपये आहे.
899 रुपयांच्या या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल थोडक्यात सांगायचे झाले तर यूजर्सना 90 दिवसांच्या व्हॅलिडीटसह संपूर्ण भारतात अनलिमिटेड फ्री कॉलिंग, फ्री नेशनल रोमिंग आणि डेली 2GB हाई स्पीड डेटा मिळतो. तसेच यूजर्सना 20GB एक्स्ट्रा डेटा आणि अनलिमिटेड 5G डेटा देखील दिला जाणार आहे. कंपनीचा हा प्लॅन यूजर्सना जियो एआई क्लाउडमध्ये 50GB स्टोरेज ऑफर करतो. कंपनीचा हा प्लॅन यूजर्सना गुगल जेमिनी प्रोचे फ्री सब्सक्रिप्शन देखील दिले जाते.
Samsung ची मोठी ऑफर! यूजर्सना फ्री मिळणार 10 हजारांचं Amazon गिफ्ट कार्ड, फक्त करावे लागणार ‘हे’ काम
899 रुपयांच्या प्लॅनव्यतिरिक्त कंपनीकडे आणखी एक स्वस्त रिचार्ज प्लॅन देखील आहे, ज्यामध्ये 98 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जाते. या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड फ्री कॉलिंग, फ्री नेशनल रोमिंगसह डेली 2GB हाई स्पीड डेटा आणि 100 फ्री एसएमएसची सुविधा दिली जाते. जिओच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 999 रुपये आहे.