
BSNL Recharge Plan: सरकारी टेलिकॉम कंपनीची अनोखी खेळी! घेतला असा निर्णय... सोशल मीडियावर भडकले यूजर्स
कंपनी बऱ्याच काळापासून दावा करत आहे की, खाजगी टेलिकॉम कंपन्यांप्रमाणे BSNL रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ करत नाही. मात्र कंपनीने व्हॅलिडीटी कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे यूजर्स नाराज झाले आहेत. काही यूजर्सनी सोशल मीडियावर BSNL वर शांतपणे दर वाढवण्याचा आरोपही केला आहे. कंपनीने कोणत्या प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली आहे, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
यापूर्वी या प्लॅनची व्हॅलिडीटी 15 दिवसांची होती. मात्र आता या प्लॅनची व्हिलीडीटी 14 दिवसांची करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि 50MB डेटा मिळतो.
यापूर्वी या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात होती. मात्र आता या प्लॅनमध्ये 22 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये 200 मिनिटे कॉलिंग आणि 3GB डेटा उपलब्ध आहे. व्हॅलिडिटी कमी झाल्यानंतर प्लॅनची किंमत 20 टक्क्यांनी वाढल्यासारेख वाटत आहे.
नए प्लान लॉन्च करते जाओ
पुराने प्लान की वैलिडिटी घटाते जाओ
मोबाइल नेटवर्क जीरो
Price hike बिल्कुल एयरटेल की तरह कर रहे है
जैसे 4G लॉन्च करके BSNL ने बड़ा तीर मार लिया हो, pic.twitter.com/x768HA5O3K — PIYUSH TIWARI 29 (@piyusht77209504) November 18, 2025
पूर्वी 25 दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या या प्लॅनची व्हॅलिडीटी आता 24 दिवस झाले आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि 5GB डेटा दिला जातो.
यापूर्वी या प्लॅनची व्हॅलिडीटी 25 दिवसांची होती. मात्र आता या प्लॅनची व्हिलीडीटी 24 दिवसांची करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये रोज 1GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे.
यापूर्वी या प्लॅनची व्हॅलिडीटी 48 दिवसांची होती. मात्र आता या प्लॅनची व्हॅलिडीटी 42 दिवसांची झाली आहे. या प्लॅनमध्ये 300 मिनिटे कॉलिंग आणि 4GB डेटा मिळणार आहे.
पूर्वी 90 दिवसांची व्हॅलिडीटी असलेल्या या प्लॅनची व्हॅलिडीटी आता 80 दिवस झाली आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग आणि 300 एसएमएस ऑफर केले जातात.
यापूर्वी या प्लॅनमध्ये 180 दिवसांची व्हॅलिडीटी ऑफर केली जात होती. मात्र आता या प्लॅनची व्हॅलिडिटी 165 दिवस झाली आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 24GB डेटा मिळतो.
Ans: होय. उदाहरणार्थ, ₹599 प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि 84 दिवसांची वैधता आहे.
Ans: होय. BSNL चे ₹2099 आणि ₹2399 असे प्लॅन्स आहेत ज्यांची वैधता 425 दिवसपर्यंत आहे.
Ans: होय, अनेक BSNL रिचार्ज प्लॅन्समध्ये अनलिमिटेड कॉल्स (लोकल / STD) आणि काहीमध्ये रोजच्या SMS सुविधा देखील आहेत.