
BSNL Recharge Plan: सरकारी कंपनीची खास ऑफर! 200Mbps स्पीडसह मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री ओटीटी अॅक्सेस
IRCTC च्या बीटा वेबसाईटवरून तत्काळ तिकीट बुक करायची? आधी करा ही दोन कामं, जाणून घ्या सविस्तर
बीएसएनएलने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर या प्लॅनची घोषणा केली आहे. या प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना ऑप्टिकल फाइबरवाले ब्रॉडबँड कनेक्शन ऑफर केले जाणार आहे. कंपनीने लाँच केलेल्या या प्लॅनची किंमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये अनेक फायदे ऑफर केले जाणार आहेत. या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाते. तसेच, यूजर्सना या प्लॅनमध्ये 200Mbps च्या स्पीडने इंटरनेट ऑफर केले जाते. कंपनीने यूजर्ससाठी 5000GB ची फेअर युसेज पॉलिसी (FUP) मर्यादा निश्चित केली आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
भारत संचार निगम लिमिटेडने या प्लॅनमध्ये यूजर्सना ओटीटी ॲप्सचा मोफत ॲक्सेस दिला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना जियो हॉटस्टार, हंगामा ओटीटी, झी 5, शेमारू ओटीटी, सोनी लिव सारख्या ओटीटी ॲप्सचा ॲक्सेस ऑफर केला जाणार आहे. हा कंपनीचा मंथली प्लॅन आहे, ज्यामध्ये इंटरनेट डेटा, ओटीटी आणि कॉलिंगचे फायदे मिळतात.
सरकारी टेलिकॉम कंपनीने अलीकडेच त्यांच्या यूजर्ससाठी एक फ्रीडम ऑफर सादर केली आहे. बीएसएनएल यूजर्सना फ्रीडम ऑफरअंतर्गत सोनी लिव्ह, जिओ हॉटस्टार आणि झी5 या तिन्ही ओटीटी ॲप्सचा ॲक्सेस केवळ 150 रुपयांत ऑफर केला जाणार आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची आहे. भारत संचार निगम लिमिटेडने हा प्लॅन एंटरटेनमेंट पॅक स्वरुपात लाँच केला आहे. ही ऑफर कंपनीच्या नवीन आणि जुन्या अशा सर्व ब्रॉडबँड यूजर्ससाठी आहे. या पॅकची किंमत 199 रुपये आहे. फ्रीडम ऑफरमध्ये हा प्लॅन 49 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
बीएसएनएलने त्यांच्या 51 रुपयांच्या प्लॅनची मर्यादा 31 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. या प्लॅनमध्ये नवीन यूजर्सना केवळ 51 रुपयांत नवीन बीएसएनएल सिम ऑफर केले जाणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण एका महिन्यासाठी डेली 2GB हाई स्पीड डेटा आणि 100 फ्री एसएमएस मिळणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या या प्लॅनमध्ये, यूजर्सना संपूर्ण भारतात अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि मोफत नॅशनल रोमिंगचा लाभ मिळणार आहे.