IRCTC च्या बीटा वेबसाईटवरून तत्काळ तिकीट बुक करायची? आधी करा ही दोन कामं, जाणून घ्या सविस्तर
आयआरसीटीसीची नवीन वेबसाईट यूजर फ्रेंडली बनवण्यासाठी यामध्ये अनेक सेक्शन एकत्रित करण्यात आले आहेत, ज्यामुळे यूजर्सना एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळणार आहे. नवीन बीटा वेबसाईटमध्ये यूजर्स अगदी सहजपणे नेव्हिगेशन करू शकतात. इतकंच नाही तर या वेबसाईटची सुरक्षा देखील अधिक मजबूत करण्यात आली आहे. बीटा वेबसाईटवरून तत्काळ तिकीट बुक करण्यासाठी तुम्हाला काही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
पहिल्यांदा आयआरसीटीसी वेबसाईटमध्ये लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचा ई-मेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर व्हेरिफाय करावा लागणार आहे. व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही नवीन वेबसाईटवरून कोणतेही तिकीट बुक करू शकणार नाहीत. व्हेरिफिकेशनची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तुम्ही या वेबसाईटवरून तिकीट बुक करू शकणार आहात.






