दिवाळीची साफसफाई करण्याची चिंता मिटली! हे स्वस्त रोबोट्स मिनिटांतच साफ करतील तुमचं घर, फेस्टिव्हि सेलमधून कमी किंमतीत करा खरेदी
येत्या काही दिवसातच दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. दिवाळीचा सण म्हटलं की प्रत्येक घरात सुरू होते साफसफाई. घरातील साफसफाई करताना प्रत्येकालाच वैताग येतो आणि खूप वेळही लागतो. दरवर्षी दिवाळीची साफसफाई करताना दोन ते तीन दिवस वाया जातात. यामुळे इतर काम बघा रखडतात. तसेच प्रचंड मेहनत करावी लागते.
विचार करा की तुमच्या घरातील दिवाळीची साफसफाई अगदी काही मिनिटातच पूर्ण झाली तर… आणि यासाठी तुम्हाला काहीही मेहनत करावी लागणार नाही आणि हे सर्व शक्य आहे रोबोट्समुळे. रोबोट वॅक्यूम क्लिनर तुमच्या घरातील दिवाळीची साफसफाई अगदी काही मिनिटातच पूर्ण करू शकतात आणि यासाठी तुमची मेहनत देखील लागणार नाही. ज्या लोकांचं घर खूपच मोठं आहे आणि त्यांना दिवाळीची साफसफाई करताना अनेक दिवस लागतात अशा लोकांसाठी हे रोबोट वॅक्यूम क्लिनर अतिशय फायद्याचं ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
फेस्टिव्ह सीझन सेलमधून रोबोटिक वॅक्यूम क्लिनर खरेदी केल्यास तुमचे दोन फायदे होतील पहिला म्हणजे तुमच्या घरातील साफसफाई अगदी काही मिनिटात पूर्ण होईल तसेच दुसरा फायदा म्हणजे तुमचे पैसे देखील वाचतील. याशिवाय तुम्हाला महागडे व्याक्युम क्लिनर कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळेल. हे रोबोटिक वॅक्यूम क्लिनर दिसायला छोटे असले तरी देखील खूपच शक्तिशाली आहेत. यांच्या मदतीने लादी आणि घरातील असे कोपरे येथे तुमचा हात पोहोचत नाही तेही अगदी सहज स्वच्छ केली जाऊ शकतात. फेस्टिव्ह सीजन सेलमध्ये कोणत्या रोबोटिक वॅक्यूम क्लिनरवर डिस्काउंट ऑफर केलं जात आहे याबाबत आता जाणून घेऊया.
जर तुम्हाला जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर तुमच्यासाठी ILIFE V20 रोबोटिक वॅक्यूम क्लिनर अतिशय बेस्ट पर्याय ठरणार आहे. या डिवाइसची किंमत फ्लिपकार्ट सीजन सेलमध्ये 12900 रुपये आहे. खरंतर या डिवाइसची खरी किंमत 49,999 रुपये आहे. मात्र सेल दरम्यान या डिवाइसच्या खरेदीवर बंपर डिस्काउंट ऑफर केलं जात आहे. तसेच तुम्ही हे डिवाइस खरेदी करताना ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुम्हाला 1250 रुपयांचे अधिक डिस्काउंट दिले जाणार आहे. यामध्ये SoF नेविगेशन, एंटी वेक्टेरियल क्लिनिंग आणि वाई-फाई कनेक्टिविटी सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
या यादीतील दुसरे नाव ड्रीम एफ 10 रोबोट व्याक्युम क्लिनर. सध्या हे डिवाइस ॲमेझॉनवर ऑफर्ससह 16,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या डिवाइसची लाँच किंमत 38,990 रुपये आहे. मात्र सेलदरम्यान त्याची किंमत फारच कमी झाली आहे. या वॅक्यूम क्लिनरच्या खास फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही बोलून देखील हे डिवाइस कंट्रोल करू शकता. या डिवाइसमध्ये स्मार्ट LiDAR नेविगेशन देण्यात आले आहे. याचे वजन 3.71 किलोग्राम आहे. एवढेच नाही तर एसबीआय कार्डद्वारे पेमेंट केल्यास या डिवाइसवर आणखी तीन हजार रुपयांचे डिस्काउंट दिले जाणार आहे.
Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
याशिवाय तुम्ही S10 रोबोटिक फ्लोर क्लिनर खरेदी करण्याचा विचार देखील करू शकता. या व्याक्युम क्लिनरची किंमत 34,990 रुपये आहे. या व्याक्युम क्लिनरची खास गोष्ट म्हणजे हे वायफायसह चालते, याला फोनसोबत कनेक्ट करून अगदी सहज कंट्रोल केले जाऊ शकते. तुम्हाला घराची साफसफाई करण्यासाठी याची मदत होणार आहे.