Samsung Galaxy A07, Galaxy F07 आणि Galaxy M07 4G हे तीन स्मार्टफोन्स भारतात लाँच करण्यात आले आहेत. नवीन सॅमसंग हँडसेट्समध्ये एकसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये केवळ कलर्स आणि किंमतीचा फरक आहे. Galaxy A07, Galaxy F07 आणि Galaxy M07 ची विक्री देशात रिटेल चॅनल्सद्वारे केली जाणार आहे.
Samsung Galaxy A07 4G ची किंमत भारतात 8,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन तीन रंगात लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये ब्लॅक, ग्रीन आणि लाइट वायलेट यांचा समावेश आहे. हे व्हेरिअंट Samsung Online Store वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. Galaxy F07 4G ची किंंमत 7,699 रुपये ठेवण्यात आली आहे. हा हँडसेट केवळ हिरव्या रंगात लाँच करण्यात आला आहे. ग्राहक हा स्मार्टफोन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात. Galaxy M07 4G एक Amazon-एक्सक्लूसिव फोन आहे, ज्याची किंमत 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन काळ्या रंगात खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. सर्व हँडसेट 4GB रॅम आणि 64GB ऑनबोर्ड स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये येतात. (फोटो सौजन्य – X)
कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या नवीन सॅमसंग हँडसेटमध्ये एकसारखे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. यामध्ये 6.7-इंच HD+ (720 x 1600 पिक्सेल) PLS LCD स्क्रीन देण्यात आली आहे, जी 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. डायमेंशन्सच्या बाबतीत, हे हँडसेट 167.4 x 77.4 x 7.6 मिमी मोजतात आणि 184 ग्रॅम वजनाचे आहेत. ते IP54 रेटिंगसह येतात, जे धूळ आणि पाण्याचे प्रतिरोधक आहेत.
Galaxy A07, Galaxy F07 आणि Galaxy M07 4G हे तिन्ही स्मार्टफोन्स MediaTek Helio G99 चिपसेटने सुसज्ज आहे. या स्मार्टफोन्सला 4GB रॅम आणि 64GB ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. या हँडसेट्समध्ये microSD कार्डद्वारे 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. हे सॅमसंग फोन Android 15-आधारित One UI 7 वर चालतात आणि कंपनीने सहा प्रमुख ओएस अपडेट्स आणि सहा वर्षांच्या सुरक्षा अपडेट्सचे आश्वासन दिले आहे.
फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर Galaxy A07, Galaxy F07 आणि Galaxy M07 4G मध्ये डुअल रियर कॅमेरा सिस्टम देण्यात आला आहे. ज्यामध्ये f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा आणि f/2.4 अपर्चर के साथ 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. फ्रंटला 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, जो व्हिडीओ कॉलिंगला सपोर्ट करतो. या नवीन सॅमसंग हँडसेटमध्ये कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 4G LTE, ब्लूटूथ 5.3, Wi-Fi 5, Wi-Fi Direct, GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB टाइप-C पोर्ट यांचा समावेश आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे जी 25W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.