13 वर्षांपूर्वीच लिहीली होती चीन-अमेरिकेच्या ट्रेड वॉरची स्क्रिप्ट, या व्हिडीओ गेमची भविष्यवाणी होतेय व्हायरल
भविष्य कोण पाहू शकते का? आतापर्यंत अनेकवेळा आपण बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी तुम्ही ऐकल्या असतील. बाबा वेंगा यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील भविष्यवाणी केल्या आहेत. यातील अनेक भविष्यवाणी खऱ्या देखील ठरल्या आहेत. पण आता आम्ही तुम्हाला एका भविष्यवाणीबद्दल सांगणार आहोत, जी एका व्हिडीओ गेमच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
तुम्हाला कॉल ऑफ ड्यूटी: ब्लॅक ऑप्स II नावाच्या गेमबद्दल आठवतयं का? हा गेम 2012 मध्ये रिलीज झाला होता. आता हा गेम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सध्या अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या संघर्षाशी मिळता जुळता हा गेम आहे. गेममध्ये दाखवलेल्या काल्पनिक घटना आजच्या वास्तविक जगाच्या भू-राजकारणाशी खूप जुळत आहेत. त्यामुळे सुमारे 13 वर्षांपूर्वीच कॉल ऑफ ड्यूटी: ब्लॅक ऑप्स II च्या डेव्हलपरला अमेरिका आणि चीनमधील संघर्षाबद्दल समजलं होतं का? अशी चर्चा आता सुरु झाली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कॉल ऑफ ड्यूटी: ब्लॅक ऑप्स II ची कथा 2025 च्या काल्पनिक जगावर आधारित आहे. त्यावेळी, तो फक्त एक थ्रिलर गेम वाटत होता, ज्यामध्ये हाय-टेक शस्त्रे, ड्रोन हल्ले आणि जागतिक आर्थिक युद्ध यासारखे घटक होते. पण आता, वास्तविक जगात 2025 मध्ये आपल्याला हा गेम सत्यात उतरताना पाहायला मिळत आहे.
गेममध्ये एक दृश्य आहे ज्यामध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेवर सायबर हल्ला होताता आणि बदल्यात चीन काही खनिजांचा पुरवठा थांबवतो. ज्यावर जगाचा तंत्रज्ञान उद्योग अवलंबून आहे. आता जर आपण वास्तविक जगाकडे पाहिले तर, चीन हा खरोखरच दुर्मिळ पृथ्वी धातूंचा सर्वात मोठा पुरवठादार आहे आणि यावरून अमेरिकेशी त्याचा तणाव वाढत चालला आहे. याचा थेट परिणाम तंत्रज्ञान क्षेत्रावर, विशेषतः मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगावर होत आहे.
गेममध्ये दाखवले आहे की व्यापार आणि तंत्रज्ञानावरून दोन प्रमुख महासत्ता एकमेकांशी कशा प्रकारे वाद घालतात. आता अमेरिका आणि चीनमध्ये एक प्रकारचे ‘आर्थिक युद्ध’ सुरू आहे, ज्यामध्ये टॅरिफ, सायबर हेरगिरी आणि पुरवठा साखळी राजकारण यांचा समावेश आहे, लोकांना असे वाटू लागले आहे की कदाचित गेम डेव्हलपर्सना त्यावेळीच माहित होते की पुढे काय होणार आहे! काहींनी सोशल मीडियावर पोस्ट देखील केल्या आहेत की, अमेरिकेचे परराष्ट्र धोरण कदाचित व्हाईट हाऊसने नव्हे तर कॉल ऑफ ड्यूटीच्या कथेने बनवले जात आहे.
इतकेच नाही तर गेममध्ये दाखवलेल्या तारखा, विशेषतः 19 आणि 20 एप्रिल, देखील आजच्या परिस्थितीशी जोडलेल्या दिसतात. जसजसे या तारखा जवळ येत गेल्या तसतसे सोशल मीडियावर गेमच्या ‘भाकितां’बद्दल चर्चा सुरू झाली. काही लोक याला निव्वळ योगायोग मानतात, परंतु बरेच लोक असे मानतात की व्हिडीओ गेम आता फक्त टाईमपास राहिलेले नाहीत, तर विचारपूर्वक लिहिलेले स्क्रिप्टिंग करून ते येणाऱ्या भविष्याचा आरसा देखील बनू शकतात.
आज, जेव्हा जग एआय, बिग डेटा आणि सायबर वॉर सारख्या गोष्टींशी झुंजत आहे, तेव्हा कॉल ऑफ ड्यूटी: ब्लॅक ऑप्स II सारखे गेम फक्त अॅक्शन आणि मनोरंजनापुरते मर्यादित ठेवणे योग्य ठरणार नाही. हे खेळ अनेकदा त्या विचाराची झलक देतात जे भविष्यात वास्तवात येऊ शकते.