Hasselblad कॅमेरा आणि AMOLED स्क्रीन Oppo चे नवीन Smartphone लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेसिफिकेशन्स
Oppo पुन्हा एकदा त्याचं नवीन स्मार्टफोन मॉडेलसह बाजारात धुमाकुळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीने त्यांची नवीन स्मार्टफोन सीरिज Oppo Find X8s चीनमध्ये लाँच केली आहे. अलीकडेच कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Find X8 Ultra लाँच केला होता. आता कंपनीने पुन्हा एकदा त्यांचे नवीन स्मार्टफोन यूजर्सच्या भेटीला आणले आहेत. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोन सीरिजमध्ये Oppo Find X8s आणि Find X8s+ यांचा सामावेश आहे.
ईमेजवर क्लिक करताच रिकामं होणार बँक अकाऊंट! WhatsApp वर सुरु झालाय नवा Scam, अशी करा तुमची सुरक्षा
लाँच करण्यात आलेले दोन्ही स्मार्टफोन कूल डिझाइन आणि हटके फिचर्सने सुसज्ज आहेत. Oppo Find X8s series सीरीजमध्ये 50-मेगापिक्सलचा हॅसलब्लॅड-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट देखील आहे. Oppo Find X8s सीरिजमधील दोन्ही मॉडेल 80W SuperVOOC वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात. (फोटो सौजन्य – X)
Oppo Find X8s च्या बेस मॉडेल 12GB + 256GB कॉन्फिगरेशनची किंमत CNY 4,199 म्हणजेच सुमारे 49,000 रुपयांपासून सुरू होते. स्मार्टफोनच्या टॉप-एंड 16GB + 1TB मॉडेलची किंमत CNY 6,499 म्हणजेच सुमारे 65,000 रुपये असू शकते. हा स्मार्टफोन होशिनो ब्लॅक, मूनलाइट व्हाइट, आइलँड ब्लू आणि चेरी ब्लॉसम पिंक या रंगामध्ये उपलब्ध आहे. सरप्राइजिंग फॅक्टर म्हणजे Oppo Find X8s+ ची किंमत स्टँडर्ड मॉडेल इतकीच आहे आणि हा स्मार्टफोन होशिनो ब्लॅक, मूनलाइट व्हाईट आणि हाइसिंथ पर्पल कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. या सीरिजमधील दोन्ही स्मार्टफोन चीनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे आणि त्यांची डिलिव्हरी 16 एप्रिलपासून सुरू होणार आहे.
OPPO FIND X8S. 👀#OPPO #OPPOFINDX8S pic.twitter.com/eroyHMSCYu
— Ravikumar 𝕏 🧑💻 (@ravi3dfx) April 12, 2025
डुअल सिमवाल्या Oppo Find X8s मध्ये 6.32 इंचाची फुल-एचडी+ (2,640 × 1,216 पिक्सेल) AMOLED स्क्रीन आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सँपलिंग रेट आणि डॉल्बी विजन सपोर्ट आहे. यामध्ये ओप्पो शील्ड प्रोटेक्शन देखील आहे. Oppo Find X8s+ मध्ये 6.59 इंचाचा फुल-एचडी+ (2,640 × 1,216 पिक्सेल) AMOLED स्क्रीन आहे, ज्यामध्ये स्टँडर्ड मॉडलसारखे स्पेसिफिकेशन्स आहेत.
दोन्ही हँडसेट 3nm MediaTek Dimensity 9400+ चिपसेट वर चालतात, जे 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.0 ऑनबोर्ड स्टोरेजसह येतात. ग्राफिक्सला Immortalis-G925 GPU द्वारा हँडल केले जात आहे. नवीन ओप्पो फोन Android 15 वर बेस्ड ColorOS 15 वर चालतात.
Oppo Find X8s आणि Find X8s+ मध्ये हॅसलब्लॅड-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये 24mm फोकल लेंथ, f/1.8 अपर्चर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) वाला 50-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, 3x ऑप्टिकल झूम आणि 120x डिजिटल झूम, डुअल-एक्सिस OIS आणि f/2.6 अपर्चरवाला 50-मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि f/2.0 अपर्चर वाला 50-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल शूटर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी f/2.4 अपर्चरवाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील दिला आहे. फोन 10-बिट HDR ला सपोर्ट करतात.
Oppo Find X8s सिरिजमध्ये Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.4, Beidou (B1I+B1C+B2a+B2b), GPS (L1+L5), GLONASS, Galileo, QZSS, dual-antenna NFC आणि USB Type-C हे कनेक्टिव्हिटी फिचर्स देण्यात आले आहेत.
फोनला डस्ट आणि वाटर रेजिस्टेंससाठी IP68 + IP69 रेटिंग देण्यात आली आहे. Oppo Find X8s मध्ये 5,700mAh बॅटरी देण्यात आली आहे आणि Find X8s+ मध्ये 6,000mAh बॅटरी दिली आहे, जी 80W सुपरVOOC (वायर्ड) आणि 50W (वायरलेस) फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.