ChatGPT ने रचला नवा रेकॉर्ड, बनले मार्चमध्ये जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेले अॅप! युजर्सचा आकडा वाचून अवाक् व्हाल
टेक कंपनी openai ने लाँच केलेला Chatgpt हा जगातील पहिला AI चॅटबोट आहे. Chatgpt च्या लाँचिंग नंतर अनेक टेक कंपन्यांनी त्यांचे स्वतःचे AI लाँच करण्यास सुरूवात केली आणि जगातील पहिल्या AI ल कठीण स्पर्धा निर्माण झाली. Apple, Samsung, Meta, Google यासारख्या अनेक कंपन्यांनी त्यांचे AI चॅटबोट लाँच केले. या सर्व गर्दीत जगातील पहिला AI मागे पडू लागला आणि लोकांचं त्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं. त्यामुळेच कंपनाच्या सीईओने एक नवीन अपडेट आणलं आणि या अपडेटने जगभरात धुमाकुळ घातला. यामुळे जगातील पाहिल्या चॅटबोट Chatgpt चा दमदार कमबॅक झाला.
देशभरात UPI डाऊन, ऑनलाइन पेमेंटमध्ये युजर्सना येतेय अडचण! हे आहेत पर्यायी मार्ग
गेल्या महिन्यात Chatgpt ने त्यांच्या युजर्ससाठी Ghibli स्टाईल इमेज जनरेस्टर अशा प्रकारचे एक नवीन फीचर सुरू केले. हे फीचर अत्यंत मजेदार आहे. Chatgpt च्या या फिचरने नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत सर्वांना वेड लावलं. प्रत्येकजण त्यांची Ghibli स्टाईल इमेज बनवून सोशल मीडियावर अपलोड करू लागला. लोकं त्यांच्या Ghibli स्टाईल इमेज तयार करण्यासाठी chatgpt ॲप डाउनलोड करू लागली आणि बघत बघता जगातील पाहिल्या चॅटबोट Chatgpt चे पुन्हा एकदा कमबॅक झालं. सुमारे तासाभरातच chatgpt च्या युजर्सची संख्या लाखोंनी वाढली. (फोटो सौजन्य – Pinterest)
जगातील पाहिल्या चॅटबोटने आता आणखी एक नवा रेकॉर्ड रचला आहे. Chatgpt मार्च महिन्यात जगातील सर्वाधिक डाउनलोड झालेला ॲप ठरला आहे. ही सर्व कमाल Ghibli स्टाईल इमेज जनरेटरची आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) कंपनी ओपनएआयच्या चॅटजीपीटीने मार्चमध्ये इंस्टाग्राम आणि टिकटॉकला मागे टाकत जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेले ॲप बनले आहे. डाउनलोड्समध्ये ही वाढ कंपनीने अलिकडेच नवीन इमेज जनरेशन टूल सादर केल्यामुळे झाली आहे, ज्यामुळे युजर्सनी Ghibli स्टुडिओ स्टाईल इमेज फोटो तयार करण्याचा व्हायरल ट्रेंड निर्माण केला आहे.
अॅप फिगर्सच्या अहवालानुसार , मार्चमध्ये 46 दशलक्ष लोकांनी चॅटजीपीटी डाउनलोड केल्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये iOS वर 1.3 कोटी आणि अँड्रॉइड वर 3.3 कोटी लोकांनी डाउनलोड केले आहे. इंस्टाग्रामने जवळपास 46 दशलक्ष डाउनलोड्स गाठले आहेत, ज्यामध्ये iOS वर 5 दशलक्षाहून अधिक आणि Android वर 41 दशलक्षाहून अधिक डाउनलोड्स आहेत. टिकटॉक 45 दशलक्ष डाउनलोडसह इंस्टाग्रामच्या खाली आहे, ज्यामध्ये iOS वर 8 दशलक्ष आणि Android वर 37 दशलक्ष डाउनलोड आहेत.
चॅटजीपीटीची वाढती लोकप्रियता नाकारता येत नाही. फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत अॅपच्या डाउनलोडमध्ये 28 टक्क्यांनी वाढ झाली. 2024 च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 2025 च्या या कालावधीत 148% वाढ झाली. ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रॅड लाइटकॅप यांनी अलीकडेच डेटा शेअर केला आहे ज्यामध्ये असे दिसून आले आहे की चॅटजीपीटीमध्ये इमेज जनरेशन फीचर सुरू झाल्यानंतर एका आठवड्यात 1.3 कोटींहून अधिक वापरकर्त्यांनी 700 दशलक्षांहून अधिक प्रतिमा तयार केल्या आहेत.