Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना...
अनेक लोकांची सवय असते की ते दिवसाभराततून अनेक वेळा त्यांचा फोन चार्जिंगला लावतात. चार्जिंग ८० असो किंवा ९० काही लोकं सतत त्यांचा फोन चार्जिंगला लावून ठेवतात. कारण असे काही यूजर्स असतात ज्यांना त्यांचा फोन सतत १०० टक्के चार्ज पाहिजे असतो. यासाठीच युजर्स त्यांचा फोन सतत चार्जिंगला लावून ठेवतात. पण सतत फोन चार्ज करणं महागात पडू शकतं. कारण तुमच्या या सवयीमुळे फोन लवकर खराब होऊ शकतो.
Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
वारंवार फोन चार्जिंगला लावल्यास फोनची बॅटरी खराब होते त्यासोबतच फोनच्या परफॉर्मेंसवर देखील परिणाम होऊ शकतो. लोक बऱ्याचदा या नुकसानांकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा समस्या स्पष्ट होते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. जर तुम्हाला अनावश्यक दुरुस्तीवर पैसे वाया घालवायचे नसतील, तर काही चुका टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वारंवार फोन चार्ज केल्यास काय नुकसान होऊ शकतं, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
तुम्हाला दिर्घकाळासाठी तुमच्या स्मार्टफोनचा वापर करायचा असेल तसेच तुमची इच्छा असेल की फोनच्या बॅटरीवर कोणताही परिणाम होऊ नये, तर यासाठी काही छोट्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. वारंवार चार्जिंग टाळा, योग्य चार्जिंग मर्यादा पाळा आणि नेहमी मूळ चार्जर वापरा. या नियमांचा वापर केल्यास तुमच्या फोनचा परफॉर्मंस देखील चांगला राहिल. या सोप्या पायऱ्यांमुळे बॅटरीचे आयुष्य तर वाढेलच पण अनावश्यक दुरुस्तीवरही तुमचे पैसे वाचतील.