ChatGPT Global Outage: OpenAI चा चॅटबोट झाला डाऊन, एक्सवर तक्रारींचा पाऊस! युजर्स वैतागले
टेक कंपनी OpenAI चा AI चॅटबोट चॅटजीपीट आज 10 जून रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास जगभरात डाऊन झाला आहे. चॅटजीपीटी अचानक डाऊन झाल्यामुळे युजर्समध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. गेल्या 40 ते 50 मिनिटांपासून चॅटजीपीटी डाऊन आहे. याबाबत युजर्स गुगलवर आणि सोशल मीडियावर सर्च करत आहे. अनेक युजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर OpenAI ला टॅग करून तक्रार देखील करत आहे. याशिवाय अनेकांनी यासंबंधित मिम्स देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
युजर्स गेल्या 40 ते 50 मिनिटांपासून सतत तक्रार नोंदवत आहेत. डाउनडिटेक्टरवरील तक्रारींमध्ये वाढ झाली आहे, यूकेमध्ये 1,000 हून अधिक आणि अमेरिकेत जवळजवळ 500 तक्रारी आहेत. ज्या युजर्सनी चॅटजीपीमध्ये लॉगिन करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांना स्क्रीनवर वेगवेगळे मेसेज पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये नेटवर्क एरर आली. कृपया तुमचे कनेक्शन तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा आणि हम्म… काहीतरी चूक झाली आहे असं वाटतंय यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
चॅटजीपीमधील ही समस्या अधूनमधून येत असल्याचे दिसून येत आहे, काही युजर्स अजूनही प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकतात तर काहींना व्यत्यय येत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी ओपनएआयच्या मदत केंद्राला (help.openai.com) सूचित केले गेले आहे, परंतु अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.
तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर सर्वात आधी तुम्ही पेज रिफ्रेश करा किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी तपासा. याशिवाय तुम्ही अपडेट्ससाठी OpenAI च्या मदत केंद्राला भेट देऊ शकता किंवा रिअल-टाइम रिपोर्ट्ससाठी डाउनडिटेक्टर किंवा सोशल मीडियाचे निरीक्षण देखील करू शकता.
Samsung करणार मोठा धमाका! लवकरच लाँच करणार पहिला ट्राय-फोल्ड स्मार्टफोन, किंमतही आली समोर
डाउनडिटेक्टरच्या डेटावरून असे दिसून येते की नोंदवलेल्या समस्यांपैकी 93 टक्के समस्या विशेषतः चॅटजीपीटीशी संबंधित होत्या, त्यानंतर 7 टक्के ओपनएआय अॅपशी संबंधित आणि 1 टक्के लॉगिन अडचणींशी संबंधित होत्या. दुपारी 2:45 च्या सुमारास या तक्रारी वाढू लागल्या आणि भारतीय प्रमाणानुसार दुपारी 3.00 वाजता त्या शिखरावर पोहोचल्या.
chatgpt is down like bitch i was using that for my finals rn fml pic.twitter.com/d5C9jr7gmN
— whatever (@chiewyuqing) June 10, 2025
Me when Chat GPT is down:😔😣#ChatGPT #OpenAI pic.twitter.com/vXKXL6Ix03
— Sarcasm (@sarcastic_us) June 10, 2025
ChatGPT is down how will I answer if someone asks me my name pic.twitter.com/BJgl3KBOY8
— Altaf 😉 (@altaaaf10) June 10, 2025