Samsung करणार मोठा धमाका! लवकरच लाँच करणार पहिला ट्राय-फोल्ड स्मार्टफोन, किंमतही आली समोर
स्मार्टफोन कंपनी सॅमसंग मार्केटमध्ये धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी आता लवकरच त्यांचा पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन लाँच करणार आहे. अनेक वर्षांपासून सुरु असलेली चाचणी आणि पेटेंटनंतर आता कंपनी लवकरच त्यांचा पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन बाजारात लाँच करणार आहे. हा कंपनीचा पहिला ट्राय फोल्ड स्मार्टफोन गॅलेक्सी जी फोल्ड या नावाने लाँच केला जाऊ शकतो. स्मार्टफोनची लाँच डेट काय असणार, स्मार्टफोनचं डिझाईन कसं असणार आणि त्याचे फीचर्स काय असतील याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही.
खुशखबर! iPhone 16 Plus खरेदी करण्याची सुवर्णसंधी, इथे मिळतंय तब्बल 11 हजार रुपयांच डिस्काऊंट
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, आगामी हाय-एंड डिव्हाईस 25W चार्जिंग सपोर्टसह लाँच केले जाऊ शकते. मात्र अॅडव्हान्स डिव्हाईसमध्ये एवढी स्लो चार्जिंग सपोर्ट दिल्यास कंपनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा मागे पडू शकते. सॅमसंग मिड-रेंज फोनमध्ये आधीच इतरांपेक्षा मागे आहे, आता जर कंपनीने 25W चार्जिंग सपोर्ट ट्राय फोल्ड फोनमध्ये दिला तर ती आणखी मागे पडू शकते. याशिवाय आगामी डिव्हाईसमध्ये 10-इंचाचा डिस्प्ले आणि एक ट्रिपल-फोल्ड मॅकेनिज्म दिला जाण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
डिजिटल चॅट स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार, सॅमसंगचा हा फोन पूर्णपणे ओपन केल्यानंतर 9.96 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो Huawei च्या Mate XT च्या 10.2 इंच स्क्रीनपेक्षा थोडा छोटा असू शकतो. यात ड्युअल इनर-फोल्डिंग डिझाइन असू शकते, जे दोन्ही बाजूंनी आतील बाजूस फोल्ड होईल, जे बंद केल्यावर प्रायमरी डिस्प्लेला अतिरिक्त संरक्षण प्रदान करेल.
फोनचा फॉर्म फॅक्टर S पेन सपोर्टचे संकेत देखील देत आहे. कारण काही पेटेंट फाइलिंगमध्ये स्टाइलससाठी जागा देण्यात आली आहे. जो टॅबलेट आणि स्मार्टफोनमधील अंतर अजून कमी करणार आहे. यामुळे सॅमसंगचा नवीन G Fold प्रोडक्टिविटी, डिजिटल आर्ट आणि मीडिया कंजप्शनसाठी एक पावरफुल डिव्हाईस बनू शकतं.
सॅमसंगचा पहिला ट्रायफोल्ड फोन ग्लोबल लेव्हलवर लाँच केला जाऊ शकतो. असा अहवाल देखील समोर आला आहे की, गॅलेक्सी जी फोल्ड सुरुवातीला चीन आणि दक्षिण कोरियासारख्या निवडक प्रदेशांमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हाय प्रोडक्शन कॉस्ट असल्यामुळे कंपनी असं करण्याची शक्यता आहे. असं सांगितलं जात आहे की, जर फीडबॅक चांगला असला तरी कंपनी 2026 मध्ये त्याची उपलब्धता वाढवण्याचा विचार करू शकते.
सॅमसंग गॅलेक्सी जी फोल्डची किंमत लाखोंच्या घरात असण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, हे डिव्हाईस $3,000 आणि $3,500 दरम्यानच्या किंंमतीत लाँच केले जाऊ शकते. म्हणजेच या डिव्हाईसची किंमत 2.56 लाख रुपये ते 2.99 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. आगामी ट्राय फोल्ड फोन फोल्डेबल गॅलेक्सी S25 अल्ट्रा किंवा अॅपलच्या आयफोन 16 प्रो मॅक्स सारख्या प्रीमियम डिव्हाइसपेक्षा खूपच चांगला असू शकतो.