Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

18 वर्षांहून कमी वयाच्या युजर्ससाठी लवकरच लाँच होणार ChatGPT चं नवं वर्जन! कंपनीने का घेतला निर्णय? हे आहे कारण

ChatGPT Teen Safe Version: OpenAI आणि ChatGPT च्या टीमने एक निर्णय घेतला आहे. आता ज्या युजर्सचं वय 18 वर्षांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी एक नवीन ChatGPT वर्जन लाँच केले जाणार आहे. याचं कारण जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 17, 2025 | 11:05 AM
18 वर्षांहून कमी वयाच्या युजर्ससाठी लवकरच लाँच होणार ChatGPT चं नवं वर्जन! कंपनीने का घेतला निर्णय? हे आहे कारण

18 वर्षांहून कमी वयाच्या युजर्ससाठी लवकरच लाँच होणार ChatGPT चं नवं वर्जन! कंपनीने का घेतला निर्णय? हे आहे कारण

Follow Us
Close
Follow Us:

OpenAI ने लाँच केलेले AI चॅटबोट ChatGPT प्रत्येक युजरसाठी फायद्याचे ठरत आहे. शाळेतील असाईंमेंट असो नाहीतर ऑफीसमधील कामं, ChatGPT त्यांच्या युजर्सना सर्व कामात मदत करतो. मात्र अलीकडेच ChatGPT वर काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. असं सांगितलं जात होतं की, ChatGPT मुळे एका 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली. याबाबत अनेक दावे प्रतिदावे देखील करण्यात आले आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेत आता ChatGPT ने 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या युजर्ससाठी ChatGPT चे नवीन वर्जन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.

Nothing Phone 3: सेलपूर्वीच स्वस्त झाला Nothing चा प्रिमियम स्मार्टफोन, तब्बल 33 हजार रुपयांनी कमी झाली किंमत

ChatGPT चं नवीन वर्जन होणार लाँच

अशी माहिती समोर आली आहे की, OpenAI आता 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या युजर्ससाठी एक नवीन ChatGPT वर्जन लाँच करण्याची तयारी करत आहे. Microsoft-बॅक्ड या AI कंपनीने सांगितलं आहे की, स्टँडर्ड चॅटबॉट वर्जनवर 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या युजर्सचा अ‍ॅक्सेस रोखण्यासाठी ऐज-प्रेडिक्शन टेक्नोलॉजीचा वापर केला जाणार आहे. ही घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा नवीन संशोधन आणि एका प्रकरणामुळे किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर AI च्या परिणामाबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)

नक्की प्रकरण काय?

एप्रिल महिन्यात 16 वर्षांच्या ॲडम रेन याने आत्महत्या केल्याचं समोर आलं. या प्रकरणानंतर त्याच्या पालकांनी ऑगस्ट महिन्यात OpenAI विरोधात खटला दाखल केला. यावेळी OpenAI आणि ChatGPT वर असे आरोप करण्यात आले होते की, ChatGPT ने रेन ला आत्महत्येचे प्लॅनिंग करण्यासाठी एखाद्या ‘कोच’ सारखी मदत केली आहे. तक्रारीत असं सांगण्यात आलं आहे की, चॅटबॉटने ॲडम रेनला सांगितले की चिंता आणि नकारात्मक विचारांशी झुंजणाऱ्या अनेक लोकांना ‘एस्केप हॅच’ सारखी कल्पना केल्यास आराम मिळतो. कारण यामुळे त्यांना पुन्हा नियंत्रण मिळवण्याची भावना देते.

या प्रकरणानंतर OpenAI ने अनेक नवीन अपडेट्स सादर केले आहेत. यामध्ये आत्महत्येशी संबंधित संभाषणांसाठी सुधारित सुरक्षा उपाय, नवीन पालक नियंत्रणे आणि दीर्घकाळ चालणाऱ्या चॅट हाताळण्यासाठी नवीन सिस्टमचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने असं देखील सांगितलं आहे की, जर त्यांचे टूल्स एखाद्या युजरचे वय आत्मविश्वासाने सांगू शकत नसतील, तर अंडर-18 वर्जन बाय डीफॉल्ट सक्रिय करेल.

ChatGPT चे नवीन टीनेज वर्जन कसे काम करेल?

ChatGPT च्या या नवीन वर्जनमध्ये पालक त्यांचे अकाऊंट मुलांच्या अकाऊंटसोबत लिंक करू शकणार आहेत. यामुळे ते चॅटबॉट इंटरॅक्शन त्यांच्या वयानुसार आणि योग्य नियमांनुसार मॅनेज करू शकतील. मेमरी आणि चॅट हिस्ट्रीसारखे फीचर्स पालक ऑन/ऑफ करू शकणार आहेत. जर चॅटबोटला वाटलं की, मुलगा चिंतेत आहे, तर यासंबंधित अलर्ट देखील पालकांना दिला जाणार आहे. एक असा पर्याय देखील असेल जिथे पालकांना ‘ब्लॅकआउट ऑवर्स’ सेट करण्याची परवानगी दिले जाते. यावेळी मुले ChatGPT वापरू शकत नाहीत.

Flipkart Big Billion Days Sale 2025: फ्लिपकार्ट सेलमध्ये 60 हजारांहून कमी किंमतीत मिळणार Samsung Galaxy S24 Ultra? काय आहे ऑफर?

OpenAI नेहमी हेच सांगतो की, ChatGPT केवळ 13 वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या युजर्ससाठी उपलब्ध आहे. वॉशिंग्टन, डीसी येथे किशोरांसाठी AI चॅटबॉट्समधील रिस्कवर चर्चा करणारी सिनेट सुनावणी सुरू असताना नवीनतम अपडेट आली आहे. यात जोश हॉलीसह अनेक रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक सिनेटर उपस्थित आहेत.

Web Title: Chatgpt is planning to launch new version for users below 18 years tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 11:05 AM

Topics:  

  • chatgpt
  • openai
  • Tech News

संबंधित बातम्या

लवकरच होणार धमाका! Xiaomi चे Snapdragon 8 Elite 5 प्रोसेसर वाले दोन नवीन 5G फोनची होणार एंट्री, हे असणार खास फीचर्स
1

लवकरच होणार धमाका! Xiaomi चे Snapdragon 8 Elite 5 प्रोसेसर वाले दोन नवीन 5G फोनची होणार एंट्री, हे असणार खास फीचर्स

Samsung Galaxy S25 सीरीजसाठी रोलआऊट झाले Android 16 वाले लेटेस्ट One UI 8 अपडेट, या युजर्सना होणार फायदा
2

Samsung Galaxy S25 सीरीजसाठी रोलआऊट झाले Android 16 वाले लेटेस्ट One UI 8 अपडेट, या युजर्सना होणार फायदा

Awe Dropping ईव्हेंटनंतर Apple पुन्हा करणार मोठा धमाका! वर्षाच्या अखेरीस लाँच होणार अनेक नवीन प्रोडक्ट्स, वाचा संपूर्ण यादी
3

Awe Dropping ईव्हेंटनंतर Apple पुन्हा करणार मोठा धमाका! वर्षाच्या अखेरीस लाँच होणार अनेक नवीन प्रोडक्ट्स, वाचा संपूर्ण यादी

AI सोबत शेअर करताय तुमचे वैयक्तिक फोटो? या महत्वाच्या गाईडलाईन्स नक्की वाचा, अन्यथा निर्माण होईल मोठा धोका
4

AI सोबत शेअर करताय तुमचे वैयक्तिक फोटो? या महत्वाच्या गाईडलाईन्स नक्की वाचा, अन्यथा निर्माण होईल मोठा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.