Nothing Phone 3: सेलपूर्वीच स्वस्त झाला Nothing चा प्रिमियम स्मार्टफोन, तब्बल 33 हजार रुपयांनी कमी झाली किंमत
लवकरच Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु होणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, 23 सप्टेंबरपासून Amazon ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये गॅझेट्स आणि स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट उपलब्ध असणार आहे. म्हणजेच ग्राहकांना त्यांच्या बजेटमध्ये प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. मात्र आता हा सेल सुरु होण्यापूर्वीच ग्राहकांना एक प्रिमियम स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी Amazon देत आहे.
Amazon वर लेटेस्ट फ्लॅगशिप, Nothing Phone 3 वर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. म्हणजेच सेलपूर्वीच हा स्मार्टफोन स्वस्त झाला आहे. काही महिन्यांपूर्वी कंपनीने हा प्रिमियम स्मार्टफोन 79,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता हे डिव्हाईस Amazon वर 47,000 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. म्हणजेच या स्मार्टफोनची किंमत प्रचंड कमी झाली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या डीलमुळे Phone (3) ची किंमत Nothing Phone (2) च्या 44,999 रुपयांच्या लाँच किमतीच्या जवळ येते. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्हाला जास्त खर्च न करता फ्लॅगशिप डिव्हाईस खरेदी करायचा असेल, तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. आता तुम्ही तुमच्या बजेटमध्ये प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहात. Nothing Phone 3 वर उपलब्ध असलेल्या ऑफर्स आणि डिल्सबाबत जाणून घेऊया.
सध्या Amazon वर Nothing Phone 3 हा प्रिमियम स्मार्टफोन 46,579 रुपयांच्या किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे. ही किंमत स्मार्टफोनच्या लाँच किंमतीपेक्षा 33,420 रुपयांनी कमी आहे. या डिस्काऊंट किंमतीमध्ये काही बँक ऑफर्सचा देखील समावेश करण्यात आला आहे. तसेच ग्राहक त्यांचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून 42,350 रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट मिळवू शकतात. तसेच या स्मार्टफोनच्या खरेदीसाठी EMI पर्यायाची देखील निवड केली जाऊ शकते. याच्या किंमती 2,258 रुपये/मंथ अशा आहेत. यामध्ये नो-कॉस्ट EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहे.
Nothing Phone 3 मध्ये 6.67-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये HDR10+, 120Hz अडॅप्टिव रिफ्रेश रेट आणि 4,500 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे, याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i ने प्रोटेक्ट करण्यात आले आहे. या डिव्हाईसमध्ये लेटेस्ट Snapdragon 8s Gen 4 चिपसेट देण्यात आला आहे, जो 16GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेजसह येतो. हे गेमिंग, मल्टीटास्किंग आणि डिमांडिंग अॅप्ससाठी फ्लॅगशिप-ग्रेड परफॉर्मन्स देते. हे 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,500mAh बॅटरीद्वारे समर्थित आहे. फोटोग्राफीसाठी, Nothing Phone 3 मध्ये 50MP प्रायमरी सेन्सर, 50MP पेरिस्कोप लेन्स (3एक्स ऑप्टिकल झूम) आणि 50MP अल्ट्रावाइड सेन्सर आहे. समोर 50MP सेल्फी कॅमेरा आहे.