
AI Update: ChatGPT मध्येही दिसणार जाहिराती? बीटा वर्जनमध्ये मिळाले संकेत! युजर्स म्हणाले, आता अॅप बोअरिंग...
ChatGPT चे हे बीटा वर्जन 1.2025.329 नंबरसह पाहायला मिळाले आहे. हे बीटा वर्जन अद्याप कोणत्याही यूजरसाठी उपलब्ध नाही. मात्र या नवीन अपडेटमुळे आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. OpenAI जाहिरातींद्वारे त्यांच्या चॅटबॉटचे व्यावसायिकीकरण कसे करणार आहे, याबाबत सर्वत्र चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच The Information ने एका रिपोर्टमध्ये OpenAI, ChatGPT जाहिराती जोडण्याचा विचार करत आहे, असा दावा केला होता. त्यानंतर आता याबाबत अपडेट्स समोर येत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
OpenAI चे सिईओ सॅम ऑल्टमॅन यांनी यापूर्वी काही मुलाखतींमध्ये जाहिरातींबाबत त्यांचं मत व्यक्त केलं होतं. Harvard Business School मध्ये त्यांनी सांगितलं होतं की, AI आणि जाहिरातींचे मिश्रण एक विचित्र अनुभव असू शकतो. हा आमच्यासाठी शेवटचा पर्याय असू शकतो. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, बिजनेस मॉडेलला टिकाऊ बनवण्यासाठी जर जाहिराती गरजेच्या असतील तर कंपनी या दिशेने पाऊलं उचलणार आहे. याशिवाय, OpenAI च्या पॉडकास्टमध्ये देखील त्यांनी सांगितलं होतं की, कंपनी जाहिरातींचा वापर करण्यात मागे नाही. मात्र जाहिराती कुठे आणि कशा दाखवायच्या आहेत, याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.
लीक झालेल्या कोडवरून असा अंदाज लावला जात आहे की, जाहिराती फ्री वर्जनमध्ये दाखवल्या जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. फ्री यूजर्सना आधीपासूनच यूसेज लिमिट, स्लोअर परफॉर्मेंस आणि लो प्रायोरिटी रिस्पॉन्स मिळतात. अशा परिस्थितीत जाहिराती जोडून OpenAI त्यांचा ऑपरेशन कॉस्ट कमी करण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे, कारण AI मॉडेल चालवणं अतिशय महाग आहे. OpenAI ने या बदलाबाबत अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी केलं नाही. सध्या चॅटजीपीटीचे जाहिरात फीचर बीटमध्ये आहे. अद्याप हे फीचर यूजर्ससाठी लाईव्ह करण्यात आलं नाही. तसेच हे फीचर कधी लाँच केलं जाणार याची कोणती टाइमलाइन देखील जारी करण्यात आली नाही.
Ans: होय, बीटा वर्जनमध्ये जाहिराती आणि स्पॉन्सर्ड सजेशन्स दिसल्याचे काही युजर्सनी रिपोर्ट केले आहे. अजून अधिकृत घोषणा नाही, पण टेस्टिंग सुरू असल्याचे संकेत आहेत.
Ans: यासाठी ठरलेली तारीख नाही. बीटा टेस्टिंगनंतरच कंपनी अधिकृत रोलआउट करेल.
Ans: अंदाजानुसार Ads फक्त Free Users साठी असू शकतात. पेड प्लॅन्समध्ये (Plus, Pro इ.) जाहिराती नसण्याची शक्यता जास्त आहे.