Jio Recharge Plan: एकमेव प्लॅन जो ऑफर करतो रोज 1GB डेटा, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी! असे आहेत इतर फायदे
असे अनेक यूजर्स असतात ज्यांना इंटरनेट डेटाची जास्त गरज नसते, असे यूजर्स 1GB डेली डेटावाला प्लॅन शोधत असतात. आता आम्ही तुम्हाला जिओच्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत जो यूजर्सना 1GB डेली डेटा ऑफर करतो. हा कंपनीचा असा एकमेव प्लॅन आहे, ज्यामध्ये यूजर्सना 1GB डेली डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनची किंमत 209 रुपये आहे. कंपनीचा हा रिचार्ज प्लॅन केवळ MyJio अॅपवर उपलब्ध आहे, म्हणजेच Jio.com वर हा प्लॅन लिस्टेड नाही. यूजर्सना हा प्लॅन व्हॅल्यू प्लॅन्स कॅटेगरीअंतर्गत अफोर्डेबल पॅक्स विभागात मिळू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
जिओच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 209 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना रोज 1GB हाय-स्पीड डेटा ऑफर केला जातो. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 22 दिवसांची आहे, या संपूर्ण कालावधीत यूजर्सना एकूण 22GB डेटा मिळतो. या पॅकमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, दररोज 100 SMS आणि बंडल्ड OTT बेनिफिट्ससाठी JioTV आणि JioAICloud स्टोरेजचे अॅक्सेस दिलं जाणार आहे. एकदा दैनंदिन हाय-स्पीड कोटा संपला की, उर्वरित दिवसासाठी डेटा स्पीड 64 Kbps पर्यंत कमी होतो.
जिओने MyJio आणि Jio.com दोन्ही प्लॅटफॉर्मवरून त्यांचा एंट्री-लेवल 249 रुपयांचा प्लॅन काढून टाकला होता. या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडीटीसह रोज 1GB डेटा ऑफर केला जात होता. मात्र कंपनीने गुपचूप हा प्लॅन MyJio आणि Jio.com दोन्ही प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला होता. एका अहवालानुसार, ऑनलाइन डिलिस्टेड असूनही, 249 रुपयांचा पॅक रिटेल आउटलेटवर उपलब्ध असल्याचे वृत्त आहे.
Ans: Jio 1GB/1.5GB/2GB डेली डेटा प्लॅन्स, अनलिमिटेड कॉलिंग आणि 28–84 दिवस वैधता असलेले प्लॅन्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत.
Ans: सर्वात स्वस्त प्लॅन सामान्यतः कोणत्याही data-free किंवा कमी validity प्लॅनपासून सुरू होतो, जसे ₹98 किंवा ₹119 प्रकारचे बेसिक प्लॅन्स (प्रदेशानुसार बदलू शकतात).
Ans: Jio मध्ये 1GB/day प्लॅन्स साधारणत: 24–28 दिवस, 56 दिवस किंवा 84 दिवस validity मध्ये उपलब्ध असतात.






