Cheapest Jio Plan: 'हा' आहे Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन, 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह कॉलिंग-डेटा-SMS सर्व काही उपलब्ध
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Jio चे करोडो युजर्स आहे. Jio त्यांच्या युजर्ससाठी अनेक नवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. काही रिचार्ज प्लॅन स्वस्त आणि परवडणाऱ्या किमतीत असतात तर काही रिचार्ज प्लॅनची किंमत खूपच जास्त असते. असे देखील अनेक रिचार्ज प्लॅन आहेत, जे छोटा पॅकेट बडा धमाका आहे. म्हणजेच कंपनी त्याच्या काही स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये बरेच फायदे ऑफर करते. अशाच एका कंपनीच्या स्वस्त प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Jio चा हा प्लॅन त्यांच्या युजर्सना 28 दिवसांची व्हॉलिडिटी ऑफर करतो, ज्यामध्ये एसएमएस, इंटरनेट डेटा आणि कॉलिंग या सर्व सुविधा मिळतात. चला तर मग Jio च्या या स्वस्त आणि फायदेशीर रिचार्ज प्लॅन बद्दल जाणून घेऊया. जर तुम्ही Jio चे ग्राहक असाल आणि 28 दिवसांच्या व्हॉलिडिटी असलेला प्लॅन शोधत असाल तर. तर आम्ही तुम्हाला कंपनीच्या सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅनबद्दल सांगणार आहोत जो 28 दिवसांच्या व्हॉलिडिटीसह ऑफर केला जात आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेटा, एसएमएस आणि कॉलिंगसारखे अनेक फायदे दिले जातात. या प्लॅनची किंमत 249 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Jio च्या या 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 1 जीबी डेटा ऑफर केला जातो. हाय स्पीड लिमिट संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग @ 64 Kbps पर्यंत कमी होतो. म्हणजेच, एक प्रकारे ग्राहकांना या प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये डेटा व्यतिरिक्त ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगचे फायदे देखील ऑफर केले जातात. याव्यतिरिक्त, या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 एसएमएस देखील दिले जातात.
या सर्वांव्यतिरिक्त, जिओच्या 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना जिओटीव्ही, जिओसिनेमा आणि जिओक्लाउड सारख्या अॅप्सचा मोफत अॅक्सेस देखील दिला जातो. त्यामुळे एकूणच हा प्लॅन छोटा पॅकेट बडा धमाका मानला जातो. तथापि, या जिओ प्लॅनमध्ये JioCinema प्रीमियम समाविष्ट नाही. Jio चा हा प्लॅन पॉप्युलर प्लॅन्स कॅटेगरीत सूचीबद्ध आहे.
Jio शी संबंधित इतर बातम्यांबद्दल बोलायचे झाले तर, Jio ने अलीकडेच स्मार्ट टीव्हीसाठी त्यांची जिओटेल ओएस सादर केली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हे टीव्ही चॅनेल तसेच लोकप्रिय ओटीटी अॅप्सना सपोर्ट देण्यासाठी डिझाइन केले आहे. ऑपरेटरने सांगितलं आहे की जिओटेल ओएसवर चालणाऱ्या स्मार्ट टीव्हीवर क्लाउड-आधारित गेम देखील समर्थित असतील. युजर्स एकाच रिमोटवरून या सर्व वैशिष्ट्यांवर नियंत्रण ठेवू शकतील.
कंपनीने सांगितलं आहे की ती तिच्या स्मार्ट टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमसाठी नियमित सॉफ्टवेअर अपडेट्स देईल जेणेकरून नवीन अॅप्स आणि कंटेंट फॉरमॅटसाठी सपोर्ट मिळेल. या अपडेट्समध्ये सुरक्षा पॅचेस देखील समाविष्ट असण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे नवीन ओएसवर चालणाऱ्या स्मार्ट टीव्हीची सुरक्षा सुधारेल.