OnePlus च्या स्टाइलिश स्मार्टवॉचची ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री, एका चार्जवर 16 दिवस चालणार बॅटरी! तब्बल इतकी आहे किंमत
स्मार्टफोन कंपनी Oneplus ने त्यांचे नवीन स्मार्टवॉच ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केलं आहे. नवीन स्मार्टवॉच Oneplus watch 3 या नावाने लाँच करण्यात आलं आहे. हे स्मार्टवॉच प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आलं आहे. म्हणजेच एखाद्या बजेट स्मार्टफोनइतकी वनप्लसच्या या स्मार्टवॉचची किंमत आहे.
Oneplus watch 3 मध्ये 1.5 इंचाचा AMOLED LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे. मागील घड्याळाच्या तुलनेत, त्याची ब्राइटनेस जास्त आहे. त्यात अनेक नवीन वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत, तर काही वैशिष्ट्ये अपग्रेड करण्यात आली आहेत. Oneplus watch 3 ची किंमत एखाद्या बजेट स्मार्टफोनच्या किंमती इतकी आहे. या स्मार्टवॉचमध्ये कोणते फीचर्स देण्यात आले आहेत, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Oneplus)
या स्मार्टवॉचमध्ये एक नवीन रोटेटिंग क्राउन आहे. एमराल्ड टायटॅनियम घड्याळात सिल्व्हर टायटॅनियम बेझल आणि स्टेनलेस स्टील बॉडी तसेच स्टेनलेस स्टीलच्या बकलसह हिरव्या रंगाचा फ्लोरोरबर स्ट्रेप आहे. एमराल्ड टायटॅनियम फिनिश निसर्गापासून प्रेरित आहे. Oneplus watch 3 मध्ये मिल्ट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी आहे. पाणी आणि धूळ यांच्यापासून संरक्षणासाठी हे स्मार्टवॉच IP68 रेटिंगसह सुसज्ज आहे. यात 100+ स्पोर्ट्स मोड्स आहेत.
या स्मार्टवॉचमध्ये मनगटाचे तापमान मोजण्यासाठी एक नवीन टेंपरेचर सेंसर आणि 8-चॅनेल ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर आहे. यात 16-चॅनेल ब्लड ऑक्सिजन सेन्सर आहे. उंच इमारती असलेल्या भागात चांगल्या मॅप्ससाठी ‘सर्कुलर पोलराइज्ड अँटेना’ असलेला एक नवीन GPS देखील आहे. त्यात एक EKG पर्याय देखील आहे जो 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत युरोपमध्ये येईल.
या स्मार्टवॉचमध्ये 631mAh बॅटरी आहे, जी एकदा चार्ज केल्यावर 120 तास बॅटरी लाइफ देण्याचा दावा केला जातो. पॉवर सेव्हर मोडमध्ये त्याचा बॅटरी बॅकअप 16 दिवसांपर्यंत असू शकतो. Oneplus watch 3 मध्ये VOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील आहे. फक्त 10 मिनिटांच्या जलद चार्जिंगसह ते अनेक तास चालू शकते. Oneplus watch 3 हे OHealth अॅपशी जोडले जाऊ शकते.
Oneplus watch 3 एमराल्ड टायटॅनियम आणि ऑब्सिडियन टायटॅनियम रंगांमध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत 329.99 डॉलर म्हणजेच अंदाजे 28,690 रुपये आहे. ही किंंमत मागील मॉडेलपेक्षा 30 अमेरिकी डॉलर जास्त आहे. युरोपमध्ये त्याची किंमत 299 युरो म्हणजेच अंदाजे 312 अमेरिकी डॉलर म्हणजेच अंदाजे 27,170 रुपये आहे. हे अमेरिका आणि युरोपमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. त्याची विक्री 25 फेब्रुवारीपासून सुरू होईल. भारतात त्याच्या लाँचिंगबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही. मात्र असा अंदाज वर्तवला जात आहे की, हे स्मार्टवॉच लवकरच भारतात लाँच केलं जाणार आहे.