चीनचं नक्की चाललंय तरी काय? वर्षभरात तयार करणार 'प्रेग्नेंट रोबोट'! मिनी रोबोट्सना नाही तर चक्क माणसांनाच देणार जन्म...
ज्याप्रमाणे माणूस एखाद्या रोबोट तयार करतो त्याचप्रमाणे जर एखाद्या रोबोटने माणसाला जन्म दिला तर काय होईल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? हा विचारच चक्रावणारा आहे. पण आता असंच एक तंत्रज्ञान चीन विकसित करत आहे या तंत्रज्ञानाच्या मदतीने चक्क रोबोट माणसांना जन्म देऊ शकणार आहेत. चीनच्या या घोषणाने जगभरातील सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. जगातील पहिला असा रोबोट असणार आहे जो मानवांना जन्म देईल. चीनने घोषणा केली आहे की ते पुढील वर्षभरात असं रोबोट तयार करतील की जो मानवांना जन्म देईल. ही टेक्नॉलॉजी अत्यंत अनोखी आहे आणि ही जगातील पहिलीच अशी टेक्नॉलॉजी आहे जी चीनने विकसित केले आहे.
5,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा… जबरदस्त फीचर्ससह Lava ने लाँच केला सुपर स्मार्टफोन, इतकी आहे किंमत
चीनमधील टेक्नॉलॉजी कंपनी काइवा टेक्नॉलॉजी (Kiwa Technology) आता एक असा रोबोट विकसित करत आहे, जो माणसांच्या मुलांना जन्म देऊ शकतो. सुमारे वर्षभरात हे तंत्रज्ञान जगासमोर सादर केलं जाणार आहे. खरं तर चीनने केलेल्या या घोषणेमुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
चीनी वेबसाइट ECNS.cn ने शेअर केलेल्या एका रिपोटर्टनुसार, काइवा टेक्नोलॉजी जगातील पहिला असा रोबोट तयार करत आहे, जो गरोदर होऊ शकतो. यामध्ये एक इन्क्यूबेशन पॉड आणि खास पद्धतीचे रोबोटिक पोट असणार आहे, हे संपूर्ण तंत्रज्ञान महिलेच्या गर्भाप्रमाणेच काम करणार आहे. यामध्ये, गर्भधारणेपासून ते प्रसूतीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया कृत्रिमरित्या पुनरावृत्ती केली जाईल. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान पारंपारिक आयव्हीएफ किंवा सरोगसीपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे.
कंपनीनुसार, या प्रेग्नेंट रोबोटची किंमत सुमारे 1 लाख युआन म्हणजेच सुमारे 13,900 अमेरिकी डॉलर किंवा 12 लाख भारतीय रुपये असू शकतात. हा रोबोट पुढील 12 महिन्यांत लाँच केला जाणार आहे.
कंपनीचे CEO झांग किफेंगनुसार, हे तंत्रज्ञान विशेषतः अशा महिला किंवा जोडप्यांसाठी विकसित केले जाणार आहे ज्यांना मुले हवी आहेत पण त्या महिला गर्भवती राहण्याच्या प्रक्रियेतून जाऊ इच्छित नाहीत. झांग यांनी 2014 मध्ये सिंगापूरमधील नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून पीएचडी प्राप्त केली आणि 2015 मध्ये ग्वांगझूमध्ये काइवा टेक्नॉलॉजीची स्थापना केली.
चीनच्या या बातमीमुळे संपूर्ण सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. बरेच लोक याला तंत्रज्ञानाचा चमत्कार आणि मुले होऊ शकत नसलेल्यांसाठी वरदान मानत आहेत. मात्र अनेकांनी या तंत्रज्ञावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेकांनी म्हटलं आहे की, रोबोटद्वारे जन्म दिलेल्या मुलांसोबत मातृत्वाची भावना जोडली जाणार नाही. याव्यतिरिक्त, या प्रक्रियेतून जन्मलेल्या मुलांच्या आरोग्य आणि मानसिक विकासाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या हे तंत्रज्ञान सुरुवातीच्या टप्प्यात आहे. मात्र पुढील वर्षभरात जगासमोर सादर केलं जाणार असल्याचं दावा करण्यात आला आहे.