Chromecast 2nd Gen outage: Google ची ही सेवा अचानक झाली ठप्प, कंटेंट कास्ट करण्यात युजर्सना येतायत अडचणी
जर तुम्ही गुगल Chromecast 2nd Gen किंवा Chromecast ऑडिओ वापरत असाल, तर तुम्हाला देखील सध्या काही समस्यांचा सामना करावा लागत असेल. कारण गुगल Chromecast 2nd Gen किंवा Chromecast ऑडिओ या दोन्ही सेवा डाऊन झाल्या आहेत. ही समस्या केवळ तुम्हालाच नाही तर जगभरातील युजर्सना निर्माण झाली आहे. युजर्सना अचानक कंटेंट कास्ट करण्यात अडचण येत असल्याचं समोर आलं आहे.
Pixel 9a Update: Google च्या आगामी स्मार्टफोनचा फोटो लीक, अशी असेल डिझाइन; कलर ऑप्शनही आले समोर
जगभरातील अनेक युजर्सना ऑथेंटिकेशन एररचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे युजर्स त्यांच्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटवरून कास्ट करू शकत नाहीत. एका अहवालानुसार, ही समस्या मोठ्या प्रमाणात युजर्सना प्रभावित करत आहे. त्यामुळे युजर्स प्रचंड वैतागले आहेत. शिवाय यासंबंधित अनेक मिम्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
ही समस्या प्रथम r/googlehome subreddit वर समोर आली, जिथे अनेक युजर्सनी तक्रार केली की त्यांचे Chromecast (2nd Gen) कनेक्ट होत नाही. युजर्सनी या समस्येवरील उपाय म्हणून अनेक ट्रबलशूटिंग पद्धती वापरून पाहिल्या, जसे की:
पण, यापैकी कोणत्याही पद्धती समस्येचे निराकरण करू शकल्या नाहीत. यामुळे युजर्सला अजूनही या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
काही यूजर्सना ‘Untrusted device: [name] couldn’t be verified’ असा एरर मेसेज दिसत आहे. हे जुन्या डिव्हाइस फर्मवेअरमुळे असू शकते. या एरर मेसेजनंतर, युजर्सकडे फक्त डायलॉग बॉक्स बंद करण्याचा पर्याय उरतो, ज्यामुळे ते कास्टिंग करू शकत नाहीत. ही समस्या फक्त जुन्या Chromecast मॉडेल्समध्ये दिसून येते, ज्यामध्ये Chromecast (2nd Gen) आणि Chromecast Audio यांचा समावेश आहे. तर, Chromecast (3rd Gen) आणि Chromecast Ultra कोणत्याही समस्येशिवाय काम करत आहेत.
Google #Chromecast huge global outage.
It’s not you, it’s Google. Here’s what they say: pic.twitter.com/96T6vwhV2g
— Roshan Rinaldi (@Roshan_Rinaldi) March 9, 2025
Looks like all Gen2 Chromecasts stopped working because Google forgot to renew a certificate. 😆 pic.twitter.com/2zK3nWwtnu
— Phelps-san (@phelpssan) March 10, 2025
Hats off to @Google for bricking millions of Chromecasts with no advance warning and no useful error messages in an attempt to force people to buy a replacement device with unneeded features at 3-4x the cost pic.twitter.com/cnDg9yIP5t
— Mr. Potato Hedge (@potato_hedge) March 9, 2025
#Chromecast is down worldwide.
Millions of users are prevented from watching TV.
But don’t worry, #Google has a crack team of technicians diligently working to solve the problem. pic.twitter.com/a1cVEpJAMu
— Roshan Rinaldi (@Roshan_Rinaldi) March 10, 2025
Google, WTF?! 2nd gen chromecast got shit update a while ago. Instead of “upgrade,” the user is getting a downgrade. Not just me, a hundred of users in reddit are getting the same problem too. pic.twitter.com/hhp5M2lXBb
— Angga and 125 others (@parantigaul) March 9, 2025
अनेक युजर्सना शंका आहे की गुगलने Chromecast (2nd Gen) आणि क्रोमकास्ट ऑडिओसाठी सपोर्ट बंद केला आहे. जर आपण गुगल मागील निर्णयांबाबत विचार केला तर, ही कंपनीने यापूर्वीही काही डिव्हाईस अचानक बंद केली होती. तथापि, या प्रकरणात एरर मेसेज सूचित करतो की तो सॉफ्टवेअर बग देखील असू शकतो, जो Google भविष्यातील अपडेटद्वारे दुरुस्त करू शकते.
Tech Tips: तुमच्याही iPhone मध्ये सतत स्टोरेजची समस्या येतेय? आत्ताच फॉलो करा या सोप्या टीप्स
सध्या, या समस्येवर कोणताही अधिकृत उपाय नाही आणि गुगलनेही कोणतेही विधान केलेले नाही. अपडेट येईपर्यंत, युजर्सना त्यांचे डिव्हाइस कायमचे निरुपयोगी होईल का किंवा Google ते दुरुस्त करण्यासाठी पॅच जारी करेल का याची चिंता असते. जर तुम्हालाही ही समस्या येत असेल, तर तुम्ही लवकरच गुगलकडून अपडेटची अपेक्षा करू शकता.