Pixel 9a Update: Google च्या आगामी स्मार्टफोनचा फोटो लीक, अशी असेल डिझाइन; कलर ऑप्शनही आले समोर
स्मार्टफोन आणि लोकप्रिय टेक कंपनी Google लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. Google Pixel 9a हा आगामी स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून Google च्या या आगामी स्मार्टफोनबाबत प्रचंड चर्चा सुरू होती. आता या स्मार्टफोनचा एक फोटो सोशल मीडियावर लीक झाला आहे.
Aadhaar Card Update: स्कॅमर्सपासून वाचण्यासाठी वापरा ही ट्रीक, अशा प्रकारे लॉक करा तुमचं आधार कार्ड
एका टिपस्टारने हा फोटो शेअर केला आहे. शिवाय Google च्या आगामी स्मार्टफोनमध्ये किती कलर व्हेरियंट असतील याबाबत देखील माहिती देण्यात आली आहे. कंपनीने अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती शेअर केली नसली, तरी देखील टिपस्टर इव्हान ब्लासने शेअर केलेला फोटो आणि स्मार्टफोनच्या कलर व्हेरिअंटबद्दल दिलेली माहिती वेगाने व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य – X इव्हान ब्लास)
अलिकडच्या अहवालांनुसार, Google Pixel 9a ची जागतिक लाँच तारीख जवळ येत आहे. दरम्यान, कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन मिड रेंजमध्ये लाँच केला जाणार आहे. टिपस्टर इव्हान ब्लास (@evleaks), ने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. Pixel 9a चार रंगाच्या पर्यायात लाँच केला जाणार आहे, अशी माहिती टिपस्टरने शेअर केली आहे. तसेच, मार्केटिंग इमेजमध्ये या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांची झलक देण्यात आली आहे. Google Pixel 9a अलीकडेच यूएस एफसीसी वेबसाइटवर दिसला आणि तो सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करेल अशी अपेक्षा आहे.
Google Pixel 9a Press images leaked.
Source:@evleaks #Pixel9a pic.twitter.com/uozqG9Kmn8
— Tushar Gupta (@TusharG98540565) March 7, 2025
X (पूर्वीचे ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये, टिपस्टरने कथित Google Pixel 9a चे चार फोटो शेअर केले आहेत. हे फोटो अनेक लीकशी जुळतात जे दर्शवितात की Google Pixel 9a मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. परंतु Google Pixel 9 लाइनअपमधील इतर मॉडेल्सप्रमाणे उंचावलेला कॅमेरा मॉड्यूल या आगामी स्मार्टफोनमध्ये नसेल. इमेजमध्ये स्मार्टफोनचा मागील पॅनल आणि साइड्स दिसत आहेत.
Google Pixel 9a आयरिस, ऑब्सिडियन, पियोनी आणि पोर्सिलेन रंगांमध्ये लाँच केला जाण्याची अपेक्षा आहे आणि लीक झालेल्या रेंडरमध्ये हे चारही पर्याय दाखवले आहेत. हँडसेटच्या मागील पॅनलवर पाण्याचे थेंब दिसतात, जे त्याच्या आयपी रेटिंगचे संकेत देतात. मागील अहवालांनुसार, आगामी Google Pixel 9a गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Google Pixel 8a चा हा उत्तराधिकारी असेल आणि हा स्मार्टफोन IP68 रेटिंगसह येईल, जो धूळ आणि पाण्याच्या प्रतिकाराची हमी देतो.
रेंडर व्यतिरिक्त, टिपस्टरने कथित Google Pixel 9a च्या मार्केटिंग इमेजेस देखील शेअर केल्या आहेत, तर उर्वरित इमेजेस हँडसेट आयरिस (पर्पल) रंगाच्या पर्यायात शेअर करण्यात आल्या आहेत. या इमेजेस स्मार्टफोनमध्ये गुगल जेमिनीचा सपोर्ट दर्शवतात. गुगल जेमिनीचा वापर कंपनीच्या गुगल कॅलेंडर सारख्या अॅप्ससह करता येतो. फोटोंमध्ये पिक्सेल ड्रॉप्स देखील हायलाइट केले आहेत. हे स्मार्टफोनच्या कॅमेरा वैशिष्ट्यांना दर्शवितात. फोटोमधे इकोसिस्टमचे फिचर्स देखील नमूद केली आहेत.
मागील अहवालांनुसार, Pixel 9a मध्ये Google ची Tensor G4 चिप असेल, ज्यामध्ये 8GB RAM आणि 256GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज असेल. यात 48-मेगापिक्सेलचा प्राथमिक मागील कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. हा स्मार्टफोन Android 15 वर चालेल आणि त्याला 5,100mAh बॅटरी मिळेल जी 23W (वायर्ड) आणि 7.5W (वायरलेस) चार्जिंगला सपोर्ट करेल.