
Vince Zampella Death: लाल फरारी बनली आगीचा गोळा! 'कॉल ऑफ ड्यूटी' च्या सह संस्थापकाचा मृत्यू, सोशल मीडियावर Video Viral
Free Fire Max: गेममध्ये फ्री मिळणार लूक बदलणारा यूनीक Nightmare Bundle, असा करा अनलॉक
कॅलिफोर्निया हाईवे पेट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी, 12:45 वाजता ही घटना घडली. विंस यांची गाडी एका बोगद्यामधून बाहेर आली आणि काँक्रिटच्या भिंतीला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचे तुकडे झाले. अपघात होताच गाडीला आग लागली. या गाडीमध्ये विंस जैम्पेला यांच्यासोबत त्यांचा एक मित्र देखील होता. उपचारादरम्यान त्यांच्या मित्राचा देखील मृत्यू झाला. (फोटो सौजन्य – X, Pinterest)
BREAKING: Video shows a Ferrari crashes on Angeles Crest Highway in Southern California, reportedly resulting in the death of driver Vince Zampella. pic.twitter.com/q1gyaM2Flo — Resist Times (@ResistTimes_US) December 23, 2025
कॅलिफोर्निया पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार, गाडीमध्ये दोन लोकं होते. ज्या गाडीचा अपघात झाला ती गाडी लाल फरारी होती. या अपघाताचे नेमके कारण काय आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र असं सांगितलं जात आहे की, गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, वेगाने येणारी कार एका काँक्रीटच्या बॅरियरला धडकली आणि काही क्षणातच कार आगीच्या गोळ्यात बदलली. हा अपघात इतका भयानक होता की, गाडीमधील एक व्यक्ती बाहेर पडला, तर तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी दुसऱ्या व्यक्तीला गाडीतून बाहेर काढलं. या घटनेत गाडीमधील दोन्ही व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलील करत आहेत.
विंस जैम्पेला यांनी व्हिडीओ गेम बॅटलफील्डमध्ये एक नविन रेकॉर्ड बनवला होता. जगभरातील 100 मिलियनहून अधिक लोकं हा गेम खेळत होते. 1990 च्या दशकात शूटर गेम्सपासून सुरुवात केल्यानंतर, त्यांनी 2003 मध्ये कॉल ऑफ ड्यूटी लाँच करण्यास मदत केली. विन्सने 2010 मध्ये रेस्पॉनची स्थापना केली, जी 2017 मध्ये इलेक्ट्रॉनिक आर्ट्सने विकत घेतली.
भारतामध्ये सर्वाधिक वापरले जाणारे AI चॅटबॉट्स! पाचवं नाव वाचून थक्क व्हाल, जाणून घ्या सविस्तर
कॉल ऑफ ड्यूटी एक फर्स्ट-पर्सन शूटर (एफपीएस) व्हिडीओ गेम आहे. यामध्ये प्लेअर्स सैनिकांप्रमाणे युद्धात सहभागी होतात. युद्धावर आधारित असलेल्या या गेममध्ये मिशन आणि अॅक्शन दोन्ही समाविष्ट आहे. या गेममधील विविध घटक दुसरे महायुद्ध, आधुनिक युद्ध आणि भविष्यकालीन लढाया दर्शवितात. हा गेम ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही खेळता येतो. यात मल्टीप्लेअर मोड देखील आहे, ज्यामुळे जगभरातील खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करू शकतात.
Ans: Call of Duty ही लोकप्रिय फर्स्ट-पर्सन शूटर (FPS) गेम सिरीज आहे.
Ans: PC, PlayStation, Xbox आणि Mobile वर उपलब्ध आहे.
Ans: हो, हा गेम फ्री-टू-प्ले आहे, पण इन-अॅप खरेदी असते.