भारतामध्ये सर्वाधिक वापरले जाणारे AI चॅटबॉट्स! पाचवं नाव वाचून थक्क व्हाल, जाणून घ्या सविस्तर
YouTube चा नवा प्रयोग! शॉर्ट्समधील Dislike बटणाची जागा बदलण्याची शक्यता, कंपनी करतेय मोठं प्लॅनिंग
या लिस्टमधील सर्वात पहिलं नाव AI चॅटबोट चॅटजीपीटीचे आहे. चॅटजीपीटीचे सुमारे 14.5 करोड मंथली ऍक्टिव्ह युजर्स आहेत. चॅटजीपीटीचा वापर रायटिंग, अभ्यासासाठी, कोडींगसाठी, नोकरीसाठी बयोडेटा तयार करण्यासाठी आणि रोजच्या जीवनातील प्रश्न विचारण्यासाठी केला जातो. चॅटजीपीटीचा भारतात सर्वाधिक वापर केला जातो. (फोटो सौजन्य – Pinterest)
या यादीतील दुसरे नाव गुगलचे जेमिनी आहे. गुगलचं जेमिनी प्लॅटफॉर्म देखील युजर्समध्ये लोकप्रिय आहे. गुगल जेमिनीचे मंथली ऍक्टिव्ह युजर्स 10.5 करोड इतके आहेत. या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. गुगल सर्व्हिसमधील इंटिग्रेशनमुळे गुगल जेमिनीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हे प्लॅटफॉर्म लवकरच ChatGPT ला टक्कर देऊ शकते.
जेमिनीनंतर या यादीतील तिसरे नाव परप्लेक्सिटी AI चे आहे. या प्लॅटफॉर्मच्या मंथली ऍक्टिव्ह युजर्सची संख्या सुमारे 2 करोड इतकी आहे. एअरटेल युजर्सना परप्लेक्सिटी प्लॅटफॉर्मचा प्रो प्लॅन फ्री ऑफर केला जातो. या प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर अभ्यास, रीसर्च आणि प्रोफेशनल कामांसाठी केला जातो.
AI प्लॅटफॉर्मच्या या यादीतील चौथ नाव एलोन मस्कची कंपनी Grok AI चे आहे. या चॅटबोटच्या मंथली ऍक्टिव्ह युजरची संख्या सुमारे 50 लाख आहे. या प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक वापर कोणत्याही मोठ्या इव्हेंटवेळी केला जातो. मात्र याचा डेली वापर अद्याप कमी आहे.
यादीतील पाचवे आणि शेवटचे नाव चिनी AI प्लॅटफॉर्म DeepSeek चे आहे. लॉचिंगवेळी या प्लॅटफॉर्मने संपूर्ण जगाला हादरवून टाकले होते. भारतात या प्लॅटफॉर्मच्या मंथली ऍक्टिव्ह युजरची संख्या सुमारे 50 लाख आहे.
Ans: AI Chatbot हा संगणक प्रोग्राम आहे जो मानवी संवादाची नक्कल करतो.
Ans: ग्राहक सेवा, ई-कॉमर्स, एज्युकेशन, हेल्थकेअर आणि सोशल मीडिया मध्ये.
Ans: ChatGPT, Google Bard, Microsoft Copilot इत्यादी.






