Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काउंटडाऊन सुरू! टेकविश्वाचे Appleकडे लक्ष, मेगा इव्हेंटमध्ये iPhoneसह नव्या डिव्हाईसवरून उठणार पडदा

Apple Event 2026: टेकजायंट कंपनी ॲपलने आज त्यांच्या बहुप्रतिक्षित ईव्हेंटचे आयोजन केले आहे. या ईव्हेंटमध्ये आयफोनसह इतर काही गॅझेट्स देखीसल सादर केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी ईव्हेंटबाबत यूजर्सची प्रतिक्षा वाढली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 09, 2026 | 12:06 PM
काउंटडाऊन सुरू! टेकविश्वाचे Appleकडे लक्ष, मेगा इव्हेंटमध्ये iPhoneसह नव्या डिव्हाईसवरून उठणार पडदा

काउंटडाऊन सुरू! टेकविश्वाचे Appleकडे लक्ष, मेगा इव्हेंटमध्ये iPhoneसह नव्या डिव्हाईसवरून उठणार पडदा

Follow Us
Follow Us:
  • ॲपलच्या इव्हेंटमध्ये आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स सोबत पहिल्या फोल्डेबल आयफोनची घोषणा होण्याची शक्यता आहे.
  • फोल्डेबल आयफोन ‘आयफोन अल्ट्रा’ नावाने सादर होण्याची शक्यता असून, त्याची किंमत सुमारे 1.9 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते.
  • ॲपल वॉच सिरीज 12 आणि एअरपॉड्स 5 सोबत आयओएस 27च्या उपलब्धतेबाबतही कंपनीकडून माहिती मिळण्याची शक्यता आहे.
Apple Event Updates: संपूर्ण टेकविश्वाचे लक्ष आज ॲपलच्या मेगा ईव्हेंटकडे आहे. आज 9 सप्टेंबर रोजी, टेक कंपनी ॲपलने त्यांच्या बहुप्रतिक्षित ॲन्युअल सप्टेंबर हार्डवेअर ईव्हेंटचे आयोजन केले आहे. या ईव्हेंटची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. विशेष म्हणजेच या ईव्हेंटचे काही लीक्स देखील सतत समोर आहेत.

Jio चे ग्राहकांना खास सरप्राईज! 10व्या वर्धापनदिनानिमित्त उघडला ऑफर्सचा खजिना; आता एकाच प्लॅनमध्ये डेटा, ओटीटी आणि AIचा धमाका

सरप्राईज अँड शाईन या टॅगलाईनसह कंपनीचा ईव्हेंट आज सुरु होणार आहे. कंपनी आयोजित ईव्हेंटमध्ये आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स सादर करणार आहे. यासोबतच ईव्हेंटमध्ये एक गेम-चेंजिंग ‘वन मोर थिंग’ देखील पाहायला मिळणार आहे, हे म्हणजेच कंपनीचा पहिला फोल्डेबल आयफोन. हे फोल्डेबल डिव्हाईस आयफोन अल्ट्रा नावाने सादर केले जाण्याची शक्यता आहे. आयफोन्सव्यतिरिक्त कंपनी या ईव्हेंटमध्ये ॲपल वॉच सिरीज 12 आणि एअरपॉड्स 5 देखील लाँच करू शकते. तसेच ईव्हेंटमध्ये आयओएस 27 च्या उपलब्धतेबाबत अधिकृत माहिती दिली जाऊ शकते.

कधी आणि कुठे पाहू शकता ईव्हेंट?

ॲपलचा सरप्राईज अँड शाईन ईव्हेंट कॅलिफोर्नियाच्या क्यूपर्टिनोमधील ॲपल पार्कच्या स्टीव जॉब्स थिएटरमध्ये शेड्यूल केला आहे. मुख्य भाषण सकाळी 10 वाजता (PT) सुरू होईल, जे भारतात रात्री 10:30 वाजता (IST) सुरु होईल. तसेच तुम्ही स्मार्टफोन किंवा टिव्हीवर देखील हा ईव्हेंट पाहू शकता. यूजर्स ॲपलच्या अधिकृत वेबसाईट आणि युट्यूब चॅनेलवर हा ईव्हेंट पाहू शकणार आहेत. याशिवाय ॲपल टिव्हीवर देखील या ईव्हेंटचे लाईव्ह स्ट्रिमिंग केले जाणार आहे.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स

यावेळी ईव्हेंटमध्ये बेस व्हेरिअंट नाही तर केवळ प्रो व्हेरिअंट लाँच केला जाण्याची अपेक्षा आहे. आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्समध्ये आयफोन 17 प्रो मॉडेल्ससारखे डिझाईन कायम राहण्याची शक्यता आहे. यामध्ये अनुक्रमे 6.3-इंच आणि 6.9-इंच डिस्प्ले मिळणार आहे. समोर आलेल्या लिक्स आणि रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर डायनॅमिक आइलँड थोडा छोटा असू शकतो आणि प्रो मॉडेल्समध्ये अपग्रेडेड एलटीपीओ+ डिस्प्ले मिळू शकतो. दोन्ही आयफोन मॉडेल्समध्ये TSMC च्या 2nm प्रोसेसवर आधारित ॲपलची A20 चिप मिळण्याची शक्यता आहे, जे अधिक चांगला परफॉर्मंस आणि एफिशिएंसी ऑफर करणार आहे. यासोबतच यामध्ये लाइट ब्लू, डार्क ग्रे आणि सिल्वरसह डीप रेड किंवा डार्क चेरी फिनिश मिळू शकते, अशी चर्चा सुरु आहे.

आयफोन अल्ट्रा

कंपनी आयोजित ईव्हेंटमध्ये त्यांच्या पहिल्या फोल्डेबल आयफोनची घोषणा करण्याची शक्यता आहे. हे डिव्हाईस आयफोन अल्ट्रा नावाने लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या बुक-स्टाइल फोनमध्ये बाहेरील बाजूला सुमारे 5.5-इंच डिस्प्ले आणि आतील बाजूला 4:3 आस्पेक्ट रेशिओ वाली 7.8-इंच स्क्रीन मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये टाइटेनियम आणि एल्युमिनियम फ्रेम मिळू शकते. लीक्सनुसार, ॲपल जवळपास न दिसणारी घडी (क्रीज) आणि टिकाऊ बिजागरी (हिंज) विकसित करण्यावरही काम करत आहे. स्लिम डिझाईनमुळे कंपनीच्या फोल्डेबल फोनमध्ये तीन नाही तर केवळ दोन रिअर कॅमेरे आणि फेस आयडीऐवजी टच आयडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याची सुरुवातीची किंमत $2,000 म्हणजेच सुमारे 1.9 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असू शकते.

ॲपल वॉच सिरीज 12

इंटरनल अपग्रेड्ससह कंपनी ॲपल वॉच सिरीज 12 सादर करू शकते. नव्या वॉचमध्ये नवीन एस-सिरीज चिप आमि अधिक चांगली बॅटरी लाईफ ऑफर केली जाऊ शकते. कंपनी नवीन हेल्थ आणि फीटनेस फीचर्सवर देखील काम करत आहे. नवीन फिनिश आणि नवीन बँड ऑप्शन्ससह वॉच सिरीज 12 लाँच केली जाण्याची शक्यता आहे.

OpenAIचा सर्वात शक्तिशाली ‘GPT-6 Astra’ लाँच! जाणून घ्या काय आहेत खास फीचर्स

एअरपॉड्स 5

कंपनी ईव्हेंटमध्ये एअरपॉड्स 5 देखील सादर करू शकते. यामध्ये दोन व्हेरिअंट्स सादर केले जाऊ शकतात. एक एक्टिव नॉइज कँसिलेशन (ANC) सह आणि दुसरे ANC शिवाय.

Web Title: Countdown begins the most awaited apple event will start in few hours these devices launch expected 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • apple
  • iphone
  • tech event

संबंधित बातम्या

इंग्रजीत Apple, मग मराठीत ‘सफरचंद’ का? काय आहे या कश्मीरी फळाची महाराष्ट्रीयन गोष्ट! जाणून घ्या
1

इंग्रजीत Apple, मग मराठीत ‘सफरचंद’ का? काय आहे या कश्मीरी फळाची महाराष्ट्रीयन गोष्ट! जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.