Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple पुन्हा सज्ज! महिनाअखेरीस आयोजित केला नवा ईव्हेंट, कोणते डिव्हाईस करणार धमाका? चाहत्यांची उत्सुकता वाढली

Apple Event: काही दिवसांपूर्वीच टेक कंपनीने एका ईव्हेंटचे आयोजन केले होते. त्यानंतर आता कंपनी पुन्हा एकदा एका नव्या ईव्हेंटची तयारी करत आहे. या ईव्हेंट या महिन्याच्या अखेरीस आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये विविध प्रोडक्ट्स सादर केले जाऊ शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 20, 2026 | 01:37 PM
Apple पुन्हा सज्ज! महिनाअखेरीस आयोजित केला नवा ईव्हेंट, कोणते डिव्हाईस करणार धमाका? चाहत्यांची उत्सुकता वाढली

Apple पुन्हा सज्ज! महिनाअखेरीस आयोजित केला नवा ईव्हेंट, कोणते डिव्हाईस करणार धमाका? चाहत्यांची उत्सुकता वाढली

Follow Us
Follow Us:
  • अ‍ॅपल पुन्हा एकदा एक मोठा धमाका करण्यासाठी सज्ज
  • आगामी मिडीया ईव्हेंटसाठी कंपनीने आमंत्रण पाठवण्यास सुरुवात केली
  • ईव्हेंट 28 ऑक्टोबर रोजी आयोजित केला जाणार
Apple October Event 2026: टेकजायंट कंपनी अ‍ॅपल पुन्हा एकदा एक मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीने ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणखी एका ईव्हेंटचे आयोजन केले आहे. या आगामी मिडीया ईव्हेंटसाठी कंपनीने आमंत्रण पाठवण्यास देखील सुरुवात केली आहे. हा नवीन ईव्हेंट 28 ऑक्टोबर रोजी आयोजित केला जाणार आहे.

10,000mAh बॅटरी अन् दमदार फीचर्स! Vivo चा नवा फोन खरेदीची संधी, जाणून घ्या ऑफर्स

प्रो अँड टेल (Pro and tell) अशी कंपनीच्या आगामी ईव्हेंटची टॅगलाईन आहे. या ईव्हेंटदरम्यान कंपनी मॅकबुक प्रो, आयमॅक आणि आयपॅड मिनीसह नवीन डिव्हाईस लाँच करणार असल्याची माहिती मिळत आहे. सर्वात जास्त चर्चा कंपनीच्या पहिल्या टचस्क्रीन ओएलईडी मॅकबुक प्रोबाबत होत आहे. मात्र कंपनीने अद्याप या डिव्हाईसचे स्पेसिफिकेशन्स आणि लाँच डेटबाबत कोणतीही माहिती शेअर केली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest) 

पहिला टचस्क्रीन ओएलईडी मॅकबुक प्रो

रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, कंपनी त्यांच्या आगामी ईव्हेंटमध्ये नवीन मॅकबुक प्रो सादर करू शकते. कंपनी 14 इंच आणि 16 इंच स्क्रीनवाले नवीन मॉडेल सादर करण्याची शक्यता आहे. या डिव्हाईसमध्ये पहिल्यांदा ओएलईडी डिस्प्ले आणि टचस्क्रीन सपोर्ट ऑफर केला जाऊ शकतो. आतापर्यंत मॅकबुकमध्ये ट्रॅकपॅड आणि कीबोर्डसारखे पर्याय पाहायला मिळाले आहेत. या परिस्थितीत, टचस्क्रीनचा समावेश केल्यास मॅकबुकच्या डिझाइनमध्ये आणि त्याच्या वापरण्याच्या पद्धतीत मोठा बदल घडून येऊ शकतो.

इतकंच नाही तर या नव्या मॉडेलमध्ये आयफोनप्रमाणे डायनॅमिक आयसलँड इंटरफेस मिळू शकतो. ओएलईडी पॅनलमुळे अधिक चांगला कॉन्ट्रास्ट आणि डीप ब्लॅक कलर मिळण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, या प्रीमियम मॉडलमध्ये M5 Pro आणि M5 Max चिपसेट पाहायला मिळू शकतो. तर एंट्री-लेवल 14 इंच मॅकबुक प्रोमध्ये M6 चिप मिळू शकतो.

नवा आयमॅक सादर केला जाण्याची शक्यता

कंपनी त्यांच्या आगामी ईव्हेंटमध्ये नवीन 24 इंच आयमॅक देखील नव्या प्रोसेसरसह लाँच करण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, या डिव्हाईसमध्ये M6 चिप मिळू शकते. या डिव्हाईसच्या डिझाईनमध्ये कोणते मोठे बदल होण्याची शक्यता नाही. कंपनीचा फोकस प्रोसेसर आणि परफॉर्मंसवर अधिक असणार आहे.

Tech Tips: बाहेरगावी जाताना घराची चिंता नको! हे स्मार्ट डिव्हाईस करतील तुमच्या घराचं रक्षण, जाणून घ्या सविस्तर

ओएलईडी डिस्प्लेवाला नवा आयपॅड मिनी

कंपनी त्यांच्या नव्या ईव्हेंटमध्ये ओएलईडी डिस्प्लेवाला नवा आयपॅड मिनी देखील लाँच करण्याची शक्यता आहे. काही रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, डिव्हाईसमध्ये ओएलईडी डिस्प्लेसह अपडेटेड A-सीरीज प्रोसेसर दिला जाऊ शकतो. यासोबतच, फ्रंट कॅमेरा लँडस्केप स्थितीत हलवला जाऊ शकतो आणि स्पीकर सिस्टममध्येही बदल केले जाऊ शकतात. यामुळे व्हिडिओ कॉल दरम्यान टॅब्लेट वापरणे अधिक सोपे होऊ शकते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Apple चा आगामी इव्हेंट कधी आयोजित करण्यात येणार आहे?

    Ans: Apple चा आगामी मीडिया इव्हेंट 28 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

  • Que: Apple च्या आगामी इव्हेंटची टॅगलाईन काय आहे?

    Ans: Apple च्या आगामी इव्हेंटची टॅगलाईन ‘Pro and tell’ अशी आहे.

  • Que: Apple च्या आगामी इव्हेंटमध्ये कोणती डिव्हाइस लॉन्च होण्याची शक्यता आहे?

    Ans: या इव्हेंटमध्ये नवीन MacBook Pro, 24 इंच iMac आणि OLED डिस्प्ले असलेला iPad Mini लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Web Title: Apple event on october 28 touchscreen oled macbook pro and ipad mini expected hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 01:37 PM

Topics:  

  • apple
  • tech event
  • Tech News

संबंधित बातम्या

10,000mAh बॅटरी अन् दमदार फीचर्स! Vivo चा नवा फोन खरेदीची संधी, जाणून घ्या ऑफर्स
1

10,000mAh बॅटरी अन् दमदार फीचर्स! Vivo चा नवा फोन खरेदीची संधी, जाणून घ्या ऑफर्स

Tech Tips: बाहेरगावी जाताना घराची चिंता नको! हे स्मार्ट डिव्हाईस करतील तुमच्या घराचं रक्षण, जाणून घ्या सविस्तर
2

Tech Tips: बाहेरगावी जाताना घराची चिंता नको! हे स्मार्ट डिव्हाईस करतील तुमच्या घराचं रक्षण, जाणून घ्या सविस्तर

Google चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांपासून शिक्षकांपर्यंत… कंपनीने केली AI उपक्रमांची घोषणा
3

Google चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांपासून शिक्षकांपर्यंत… कंपनीने केली AI उपक्रमांची घोषणा

BGMI Lite खेळणाऱ्यांसाठी मोठी बातमी! गेमचे नाव बदलले, 1 कोटींहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन… लाँच डेट अद्याप गुलदस्त्यात
4

BGMI Lite खेळणाऱ्यांसाठी मोठी बातमी! गेमचे नाव बदलले, 1 कोटींहून अधिक प्री-रजिस्ट्रेशन… लाँच डेट अद्याप गुलदस्त्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.