OpenAIचा सर्वात शक्तिशाली ‘GPT-6 Astra' लाँच! जाणून घ्या काय आहेत खास फीचर्स
जीपीटी-6 अस्त्रा सादर करताना टेक कंपनी ओपनएआने म्हटलं की, हे नवीन मॉडेल कंप्युटरचा वापर, ब्राउजिंग, सॉफ्टवेयर इंजीनियरिंग, सायबर सिक्योरिटीसह विज्ञान आणि दुसऱ्या प्रोफेशनल कामांमध्ये आतापर्यंतचे जगातील सर्वात ॲडव्हांस मॉडेल मानले जात आहे. नवीन चॅटजीपीटी मॉडेल अस्त्राबाबत असा दावा करण्यात आला आहे की, या मॉडेलने फ्रंटियरमॅथ टियर 4 मध्ये 98% गुण मिळवले आहेत. यासोबतच, हे मॉडेल गणितात दिर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवण्यासाठी देखील मदत करू शकते. तसेच, चॅटजीपीटीच्या लेटेस्ट मॉडेलने एआरसी-एजीआय-3 मध्ये 99.9 टक्के आणि एक्सप्लॉइटबेंचमध्ये 100 टक्के गुण मिळवले आहेत. (फोटो सौजन्य: X)
GPT-6 Astra is the most intelligent and aligned model in the world, and sets a new state of the art for computer use, browsing, software engineering, cybersecurity, science, and professional work. https://t.co/BxTEtJlwLP — OpenAI (@OpenAI) September 3, 2026
ओपनएआयचं असं म्हणणं आहे की, त्यांचे लेटेस्ट जीपीटी-6 अस्त्रा मॉडेल कंप्यूटर आणि ब्राउजरवर अगदी नवीन आणि स्मार्ट पद्धतीने काम करण्यासाठी सक्षम आहे. यासोबतच, प्रोफेशनल काम देखील वेगाने आणि अचुकतेने पूर्ण केली जाऊ शकतात. तसेच, या मॉडेलद्वारे मिळाणाऱ्या निकालातून मागील मॉडेल्सपेक्षा कमी चुका होण्याची शक्यता आहे.
ओपनएआयने लेटेस्ट वर्जन लाँच करताना त्याच्या उपलब्धतेबाबत सविस्तर माहिती शेअर केली आहे. जीपीटी-6 अस्त्रा मॉडेल सध्या निवडक यूजर्ससाठी लाँच करण्यात आले आहे. कंपनीने सांगितलं आहे की, येणाऱ्या काळात हे मॉडेल सर्व पेड यूजर्ससाठी उपलब्ध केले जाणार आहे. ज्यामध्ये चॅटजीपीटी गो, चॅटजीपीटी प्लस, प्रो, बिझनेस आणि एंटरप्राइज सब्सक्रिप्शन वाले यूजर्सचा समावेश असणार आहे. यासोबतच, हे सबस्क्राइबर्ससाठी ओपनएआई एपीआई, माइक्रोसॉफ्ट एज्योर आणि एडब्ल्यूएस बेडरॉक द्वारे उपलब्ध करून दिले जाईल.






