Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Brand BOAT Expands Overseas : भारतीय टेक ब्रँड बोटची सातासमुद्रापार भरारी; श्रीलंका-भूतानमध्ये व्यवसाय सुरू

Tech Brand BOAT Expands Overseas : भारतीय ऑडिओ आणि वेअरेबल्स ब्रँड बोट (boAt) ने श्रीलंका आणि भूतानमध्ये व्यवसाय विस्ताराची घोषणा केली आहे. कंपनी या बाजारपेठांमध्ये वैयक्तिक ऑडिओ उत्पादने, स्मार्टवॉच आणि चार्जिंग सोल्यूशन्स टप्प्याटप्प्याने सादर करणार आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 16, 2026 | 07:36 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • बोटच्या तंत्रज्ञान उत्पादनांना मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता  
  • उत्पादने, डिझाइन आणि नवकल्पना यांच्या बळावर आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा  
  • भारतातील इन-हाउस संशोधन आणि विकास केंद्र ‘बोट लॅब्स’ चे मोठे पाठबळ  
Tech Brand BOAT Expands Overseas : भारतातील अग्रगण्य ऑडिओ आणि वेअरेबल्स ब्रँड बोट (boAt) ने आज १६ ऑक्टोबर श्रीलंका आणि भूतानमध्ये आपल्या व्यवसायाच्या विस्ताराची अधिकृत घोषणा केली असून देशांतर्गत बाजारपेठेत अव्वल स्थान पटकवल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर विकासाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांमधील हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरले आहेत.

बोटच्या तंत्रज्ञान उत्पादनांना मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता

हा विस्तार अशा वेळी होत आहे जेव्हा कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला मोठी गती मिळत आहे। आर्थिक वर्ष २०२६ मध्ये बोटच्या आंतरराष्ट्रीय महसुलात दुपटीहून अधिक वाढ नोंदवली गेली आहे. श्रीलंका आणि भूतानमधील प्रवेशामुळे दक्षिण-पूर्व आशिया आणि जीसीसी क्षेत्रातील बोटची वाढती आंतरराष्ट्रीय उपस्थिती अधिक मजबूत होईल. या दोन्ही देशांमधील तरुण ग्राहकवर्ग, डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि भारतीय ब्रँड्सबद्दल असलेले आकर्षण यामुळे बोटच्या तंत्रज्ञान उत्पादनांना मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

उत्पादने, डिझाइन आणि नवकल्पना यांच्या बळावर आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा

कंपनी टप्प्याटप्प्याने या बाजारपेठांमध्ये वैयक्तिक ऑडिओ उत्पादने, स्मार्टवॉच आणि चार्जिंग सोल्यूशन्स सादर करणार असून स्थानिक ग्राहकांची पसंती आणि मागणीनुसार आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करण्यात येईल. या विस्ताराबाबत बोलताना बोटचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव नैय्यर म्हणाले, “आमच्यासाठी आंतरराष्ट्रीय विस्तार म्हणजे केवळ तीच उत्पादने अधिक बाजारपेठांमध्ये उपलब्ध करून देणे नव्हे, तर प्रत्येक बाजारपेठ समजून घेऊन तेथील ग्राहकांच्या गरजांनुसार ब्रँडला प्रासंगिक बनवणे हे आहे.

आंतरराष्ट्रीय व्यवसायातील मजबूत वाढ या संधीबद्दलचा आमचा विश्वास अधिक दृढ करते. भारतात विकसित झालेल्या बोटला जागतिक ग्राहक जीवनशैली आणि तंत्रज्ञान ब्रँड बनवणे हे आमचे स्पष्ट उद्दिष्ट आहे. उत्पादने, डिझाइन आणि नवकल्पना यांच्या बळावर आंतरराष्ट्रीय बाजारात स्पर्धा करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.”

CNAP Caller: फसवे कॉल रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय? 1 नोव्हेंबरपासून स्क्रीनवर दिसणार कॉलरचं नाव

भारतातील इन-हाउस संशोधन आणि विकास केंद्र ‘बोट लॅब्स’ चे मोठे पाठबळ

बोटच्या या आंतरराष्ट्रीय विस्ताराला भारतातील इन-हाउस संशोधन आणि विकास केंद्र ‘बोट लॅब्स’ चे मोठे पाठबळ लाभत आहे. या सेंटरमध्ये १०० हून अधिक अभियंते कार्यरत असून ते नवनवीन उत्पादने विकसित करत आहेत. मुख्य ऑडिओ व्यवसायासोबतच आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीचा वेअरेबल्स व्यवसाय नफ्यात आला आहे, ज्यामुळे बोट आता एक व्यापक ग्राहक तंत्रज्ञान कंपनी म्हणून वेगाने पुढे येत आहेत.

येत्या काळात बोट विद्यमान आंतरराष्ट्रीय बाजारांमधील स्थान मजबूत करण्यासोबतच दक्षिण आशिया, दक्षिण-पूर्व आशिया आणि जीसीसी क्षेत्रातील इतर उच्च क्षमतेच्या बाजारपेठांमध्ये विस्ताराच्या नव्या संधींचा विचार करत आहे.

6 Best boAt Aavante Soundbars: दिवाळीत घर बनेल मिनी थिएटर! ‘हे’ 6 दमदार Soundbar वाढवतील मनोरंजनाचा आवाज

Web Title: Boat expands business sri lanka bhutan sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2026 | 07:36 PM

Topics:  

  • boat
  • tech event

संबंधित बातम्या

6 Best boAt Aavante Soundbars: दिवाळीत घर बनेल मिनी थिएटर! ‘हे’ 6 दमदार Soundbar वाढवतील मनोरंजनाचा आवाज
1

6 Best boAt Aavante Soundbars: दिवाळीत घर बनेल मिनी थिएटर! ‘हे’ 6 दमदार Soundbar वाढवतील मनोरंजनाचा आवाज

१,५०० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये ५ भन्नाट TWS इयरबड्स; गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, फास्ट चार्जिंग अन् दमदार साउंडने सुसज्ज
2

१,५०० रुपयांपेक्षा कमी बजेटमध्ये ५ भन्नाट TWS इयरबड्स; गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, फास्ट चार्जिंग अन् दमदार साउंडने सुसज्ज

Apple ने लाँच केला पहिला स्मार्ट डिस्प्ले HomeView! फेस रिकग्निशन फीचरने सुसज्ज… जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स
3

Apple ने लाँच केला पहिला स्मार्ट डिस्प्ले HomeView! फेस रिकग्निशन फीचरने सुसज्ज… जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स

Diwali 2026 : बोटची ‘अपग्रेड टू बोट’ मोहीम लॉन्च; रवी किशनसह श्रेया कालरा, सूफी मोतीवाला यांचा सहभाग, ८०% पर्यंत डिस्काउंट
4

Diwali 2026 : बोटची ‘अपग्रेड टू बोट’ मोहीम लॉन्च; रवी किशनसह श्रेया कालरा, सूफी मोतीवाला यांचा सहभाग, ८०% पर्यंत डिस्काउंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.