युनिक डिझाइन आणि दमदार ऑडियो क्वालिटीसह Cyberstud x2 Earbuds लाँच, वाचा किंमत
इयरबड्सचा ट्रेंड सध्या प्रचंड वाढला आहे. आपण वेगवेगळ्या डिझाईनचे आणि आकाराचे इयरबड्स पाहू शकतो. काही इयरबड्सचे डिझाईन अतिशय युनिक आणि आकर्षक असते. असे इयरबड्स एक क्लासी लूक देखील देतात. त्यामुळे अनेकजण अनोखे डिझाईन असलेले इयरबड्स विकत घेतात. असंच अनोख्या डिझाईनवाले इयरबड्स अलिकडेच NU Republic ने लाँच केले आहेत. NU Republic ने काही दिवसांपूर्वी Cyberstud X2 इयरबड्स लाँच केले आहेत.
हेदेखील वाचा- Inflight Internet: हजारो फुटाच्या उंचीवरून इंटरनेटचा आनंद! काय आहे इनफ्लाइट इंटरनेट, कशी झाली सुरुवात? जाणून घ्या
Cyberstud x2 Earbuds चे डिझाईन अतिशय युनिक आणि खास आहे. याची ऑडियो क्वालिटी देखील अगदी दमदार आहे. शिवाय Cyberstud x2 Earbuds चे रिव्ह्यु देखील अप्रतिम आहेत. त्यामुळे तुम्ही नवीन इयरबड्स घेण्याचा विचार करत असाल तर हे तुमच्यासाठी अतिशय बेस्ट आहेत. याची किंमत 2500 रुपये आहे. (फोटो सौजन्य – cyberstud)
इअरबड्स ट्रेंडी डिझाइनमध्ये देण्यात आले आहेत. तसेच, कमी किंमतीत उत्तम वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. जर तुम्ही नवीन इयरबड्स घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Cyberstud x2 Earbuds खरेदी करण्याचा विचार करू शकता.
Cyberstud x2 Earbuds एका अनोख्या डिझाईनसह लाँच करण्यात आले आहेत. अनोखे डिझाइन असलेले हे इयरबड्स लॉकेटप्रमाणे गळ्यातही घालता येतात. यामध्ये बॅटरी लाईट इंडिकेटर उपलब्ध आहे. Cyberstud X4 इयरबड्स आकर्षक आणि आधुनिक डिझाइनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. याचे वजन देखील अत्यंत कमी आहे. त्यांचे वजन 45 ग्रॅम आहे. हे प्लॅस्टिक आणि ग्लॉसी टच सर्फेसमध्ये येतात. CyberStud X2 इयरबड्समध्ये चेन सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यामुळे ते या लॉकेटप्रमाणे गळ्यात घालता येईल आणि युजर्सना इयरबड्स हरवण्याचं टेंशन राहणार नाही.
हेदेखील वाचा- YouTube Premium Subscription: iOS च्या तुलनेत Android वर किती स्वस्त आहे YouTube प्रीमियम सब्सक्रिप्शन?
Cyberstud X2 मध्ये 13mm ड्रायव्हर सपोर्ट आहे. या इअरबड्सची ऑडियो क्वालिटी उत्कृष्ट आहे. त्याचे टच कंट्रोल अतिशय सेंसटिव आहेत. हे कानात सहज बसतात. इअरबड्समध्ये 40ms लो लेटेंसी आहे, जे उत्कृष्ट ऑडिओ अनुभव प्रदान करते. Cyberstud X4 मध्ये 13mm निओडायनामिक ड्रायव्हर सपोर्ट आहे. हे XBass तंत्रज्ञानासह येते. Cyberstud X4 इअरबड्स ड्युअल मोड गेमिंग आणि म्युझिकमध्ये येतात. यात 40ms कमी लेटेंसी मोड देखील आहे. इअरबड्स उत्कृष्ट साउंड क्वॉलिटी देतात.
Cyberstud X2 ला 15 मिनिटांमध्ये 200 मिनिटांचा प्लेटाइम मिळतो. इयरबड्स 64 तासांच्या बॅटरी लाइफसह येतात. Cyberstud X4 इअरबड्सचा प्लेबॅक टाइम 72 तासांचा असतो.
NU Republic Cyberstud X2 इयरबड्सची किंमत 2499 रुपये आहे. NU Republic Cyberstud X4 ची किंमत 1,799 रुपये आहे. इअरबड्समध्ये ENC सपोर्ट देण्यात आला आहे. चार्जिंगसाठी, यूएसबी टाइप सी पोर्ट दिलेला आहे.