YouTube Premium Subscription: iOS च्या तुलनेत Android वर किती स्वस्त आहे YouTube प्रीमियम सब्सक्रिप्शन?
आपण आपल्या दिवसातील बराच वेळ युट्यूबवर घालवतो. युट्यूब लोकप्रिय व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. युट्यूबवर आपण गाणी, सिनेमा, अभ्यास, डान्स, फूड, असे विविध प्रकारचे व्हिडीओ पाहू शकतो. पण हे व्हिडीओ पाहत असताना जर तुम्हाला YouTube मधील जाहिरातींचा त्रास होत असेल तर YouTube सबस्क्रिप्शन तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. कारण, एखादी व्यक्ती Netflix किंवा Amazon Prime सारखे ॲप वापरत नसेल तरी देखील ती व्यक्ति YouTube नक्की वापरते. YouTube वर गाणी ऐकणे असो किंवा कोणतीही बातमी पाहणे, आपण सर्व गोष्टींचा आनंद घेऊ शकतो.
हेदेखील वाचा- Google Map Update: अशा पद्धतीने गुगल मॅपमध्ये मिळणार वेदर अपडेट, एयर क्वालिटी इंडेक्सचीही माहिती मिळणार
तुमच्याकडे YouTube चे सबस्क्रिप्शन नसेल, तर व्हिडीओमध्ये अनेक जाहिराती दिसतात आणि आपला बराच वेळ वाया जातो. या जाहिराती टाळण्यासाठी तुम्ही YouTube चे सबस्क्रिप्शन खरेदी करू शकता. पण तुम्हाला माहीत आहे का, YouTube चे सबस्क्रिप्शन iOS आणि Android वेगवेगळे आहे. सध्या आम्ही तुम्हाला iOS आणि Android साठी YouTube Premium सबस्क्रिप्शनच्या किंमतीतील फरक सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
YouTube Premium युट्यूब व्हिडिओ, संगीत आणि चित्रपटांसाठी जाहिरातमुक्त प्रवेश देते. हे वापरकर्त्यांना ऑफलाइन पाहण्यासाठी व्हिडिओ डाउनलोड करण्यास, बॅकग्राउंडमध्ये व्हिडिओ प्ले करण्यास आणि एकाधिक डिव्हाइसेसवर स्ट्रीम करण्यास अनुमती देते. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये मंथली, क्वार्टरली आणि वार्षिक सब्सक्रिप्शन प्लॅन्स आहेत. कंपनी इंडिविजुअल, स्टूडेंट आणि फॅमिली प्लॅन देखील ऑफर करते.
हेदेखील वाचा- ChatGPT Down: ChatGPT ची सर्विस झाली ठप्प, नेटकरी अवस्थ! सोशल मिडीयावर मिम्सचा पाऊस
वर नमूद केलेल्या किमतींवरून, तुम्ही समजू शकता की iOS साठी सबस्क्रिप्शन प्लॅनच्या किमती Android च्या तुलनेत किंचित जास्त आहेत.
YouTube च्या इंडिविजुअल प्रीमियम प्लॅन ग्राहकांना अनलिमिटेड ad-फ्री व्हिडीओ, ऑफलाइन व्हिडीओ पाहण्याची क्षमता आणि PiP मोड वापरण्याची क्षमता देतात. याव्यतिरिक्त, YouTube Music वर विनामूल्य प्रवेश देखील उपलब्ध आहे.
तुम्ही विद्यार्थी असल्यास, तुम्हाला YouTube Premium प्लॅनचे सर्व फायदे 89 रुपयांच्या सवलतीच्या दरात मिळतात. ही ऑफर केवळ वेरिफाइड फुल-टाइम स्टूडेंट्सना ऑफर केली जाते.
YouTube Premium च्या फॅमिली प्रीमियम प्लॅनची किंमत Android साठी 299 रुपये आहे. यामध्ये इंडिविजुअल प्लॅनप्रमाणेच फायदे मिळतात. तथापि, या योजनेसह, युजर्स 5 पर्यंत अतिरिक्त कुटुंब सदस्यांना Google फॅमिली ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करू शकतात. त्यानंतर तुम्ही YouTube Premium आणि YouTube Music Premium शेअर करू शकता. सर्व सदस्य किमान 13 वर्षांचे असले पाहिजेत.