Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dish TV चा धमाका! स्मार्टफोनच्या किमतीत लाँच केला 4K स्मार्ट टीव्ही; आता DTH आणि OTT एकाच छताखाली

डिश टीव्हीने 'VZY' 4K स्मार्ट टीव्ही सिरीज लाँच केली आहे, यात DTH आणि OTT कंटेंट एकाच वेळी मिळेल, त्यामुळे तुम्हाला वेगळ्या सेट-टॉप बॉक्सची गरज भासणार नाही. अधिक माहितीसाठी वाचा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 08, 2025 | 07:17 PM
Dish TV चा धमाका! स्मार्टफोनच्या किमतीत लाँच केला 4K स्मार्ट टीव्ही; आता DTH आणि OTT एकाच छताखाली
Follow Us
Close
Follow Us:

DTH सर्विस प्रोव्हायडर डिश टीव्हीने आता स्मार्ट टीव्ही सेगमेंटमध्ये जोरदार एंट्री केली आहे. कंपनीने भारतात VZY (Vibe, Zone & You) स्मार्ट टीव्ही सिरीज सादर केली आहे. या सिरीजच्या सर्व मॉडेल्समध्ये DTH आणि OTT कंटेंट एकाच वेळी उपलब्ध होणार असल्याने, ग्राहकांना वेगळा सेट-टॉप बॉक्स घेण्याची गरज नाही. DTH कडून कमी होणारा ग्राहकांचा कल पाहता, डिश टीव्हीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

किंमत आणि फिचर्स

डिश टीव्हीची ही नवीन स्मार्ट टीव्ही सिरीज HD आणि 4K UHD (अल्ट्रा एचडी) रेझोल्यूशन डिस्प्लेसह येते. या सिरीजमध्ये 32 इंच, 43 इंच आणि 55 इंच स्क्रीन साईजचे VZY टीव्ही बाजारात आले आहेत. त्यांची किंमत 12,000 रुपये ते 45,000 रुपयांच्या दरम्यान आहे. हे स्मार्ट टीव्ही गुगलच्या Android TV प्लॅटफॉर्म आणि Google TV इंटरफेसवर चालतात. लवकरच डिश टीव्ही स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम आणणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.

काय आहे खास?

डिश टीव्हीने या नवीन स्मार्ट टीव्हीमध्ये DTH आणि OTT कंटेंटला एकत्र आणले आहे. यामुळे, ग्राहक टीव्हीसोबतच डिश टीव्हीचे लाइव्ह चॅनेल पाहू शकतात आणि त्याच वेळी गुगल प्ले स्टोरवरून त्यांचे आवडते OTT ॲप्स डाऊनलोड करू शकतात. टीव्ही खरेदी केल्यावर लाइव्ह टीव्ही पाहण्यासाठी स्वतंत्रपणे DTH कनेक्शन घेण्याची गरज नाही.

हे देखील वाचा: iPhone 17 सीरीज लाँचपूर्वीच घसरली iPhone 16 Pro ची किंमत, खरेदीवर मिळणार आतापर्यंतच सर्वात मोठं डिस्काऊंट! मिस करू नका ही Deal

स्मार्ट टीव्ही खरेदी केल्यावर तुम्हाला डिश टीव्हीचे सबस्क्रिप्शन मिळते, तर OTT सबस्क्रिप्शनसाठी मात्र स्वतंत्रपणे पैसे भरावे लागतील. या सिरीजमधील 32-इंच मॉडेलमध्ये HD रेझोल्यूशन डिस्प्ले आहे, तर इतर दोन्ही मॉडेल्समध्ये 4K UHD रेझोल्यूशन मिळेल. डिश टीव्हीचा हा स्मार्ट टीव्ही ऑफलाइन रिटेलर्सकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. डिश टीव्हीचा स्वतःचा Watcho नावाचा OTT प्लॅटफॉर्म असून, तो या टीव्हीमध्ये प्री-इंस्टॉल्ड असू शकतो.

Web Title: Dish tv launches 4k smart tv smartphone price dth ott combo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2025 | 06:59 PM

Topics:  

  • OTT platform
  • smart TV
  • Tech News

संबंधित बातम्या

New Year 2026: अनोख्या अंदाजात करा नवीन वर्षाचं स्वागत! Google Gemini ने बनवा तुमचे स्टायलिश फोटो, इथे वाचा व्हायरल प्रॉम्प्ट
1

New Year 2026: अनोख्या अंदाजात करा नवीन वर्षाचं स्वागत! Google Gemini ने बनवा तुमचे स्टायलिश फोटो, इथे वाचा व्हायरल प्रॉम्प्ट

‘120 Bahadur’ OTT वर रिलीज: या नवीन वर्षात घरबसल्या पाहा फरहान अख्तरचा चित्रपट, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट
2

‘120 Bahadur’ OTT वर रिलीज: या नवीन वर्षात घरबसल्या पाहा फरहान अख्तरचा चित्रपट, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट

‘Stranger Things 5 Finale चा  ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी थिएटरमध्ये दाखल होणार, OTT वर स्ट्रीम होईल का? जाणून घ्या
3

‘Stranger Things 5 Finale चा ट्रेलर रिलीज, ‘या’ दिवशी थिएटरमध्ये दाखल होणार, OTT वर स्ट्रीम होईल का? जाणून घ्या

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव
4

Truecaller ला टक्कर! CNAP सिस्टममुळे स्क्रीनवर दिसणार कॉलरचं ‘खरं’ नाव, नव्या सिस्टमने बदलणार कॉलिंगचा अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.